‘मला खूप काही करायची इच्छा आहे; पण माझी नरम प्रकृती माझ्या आड येते.’
काही वर्षांपूर्वी एका पुस्तकात वाचलेली गोष्ट मला आठवते.
एक सद्गृहस्थ (Luxury) आराम बसमधून प्रवास करीत होता. त्याच्याच बाजूला एक दुसरा प्रवासी बसला होता. त्याच्या शरीरातून कुठून तरी टकटक असा आवाज येत होता. मोठ्या घड्याळाच्या लंबकाचा विंâवा टाइमपीसचा जसा टकटक आवाज येतो तसा तो आवाज होता. पहिल्या गृहस्थाला तो आवाज कसला असावा ते समजले नाही. तेव्हा त्याने त्या गृहस्थाला विचारले, ‘‘कसला तरी टकटक आवाज एकू येत आहे. तसा आवाज येणारे तुमच्याकडे काही आहे का ?’’
तो शेजारचा प्रवासी थोडेसे स्मित करुन म्हणाला, ‘‘तीनच आठवड्यांपूर्वी माझे एक ऑपरेशन झाले. माझ्या डॉक्टरांनी एक व्हॉल्व्ह बसविला आहे. त्याचा तो आवाज आहे. अर्थात तो आवाज फार दिवस राहणार नाही. कालांतराने शरीरात त्या व्हाल्व्हवर नव्या पेशी बनतील आणि त्या त्याच्या सभोवती लपेटून राहतील. त्यानंतर तो आवाज बंद होईल. तोपर्यंत तुमच्यासारख्या शेजारी बसणार्याला थोडा त्रास होईल. पण त्याला माझा नाईलाज आहे.’’
तो विचारणारा दुसरा गृहस्थ लगेच म्हणाला, ‘‘छे, छे! त्याचा काही त्रास नाही. तो अगदी अस्पष्ट आणि मामुली आवाज आहे.’’ तसे बोलल्यावर अधिक ओळख करुन घेण्याच्या हेतूने घेण्याची डॉक्टरांनी मला सूचना केली आहे. पण लवकरच मी पहिल्यासारखा होईन. मला पुढे कायद्याचा (एल.एल.बी.चा) अभ्यास करायचा आहे. तो पुर्ण करायला चार वर्षे लागतील. त्यानंतर वकिली करण्याचा विचार आहे. मी लहान होतो, तेव्हा माझे काका वकील होते. त्यांची वकीली खूप जोरात चाले. त्यामुळे त्यांना सगळीकडे मानमरातब मिळे. पहिल्यापासून मला वाटे की, मी पण मोठा झाल्यावर वकील होईन. आजही त्या स्वप्नाचा मला विसर पडलेला नाही. मध्यंतरी माझी परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे पुढे शिक्षण घेण्याचे मला सोडून द्यावे लागले. तीन-चार वर्षे मी नोकरी केली. पण आता वकिलीचाच अभ्यास करायचे मी ठरविले आहे............ एक नामांकित वकील म्हणून मला नांव मिळवायचे आहे.‘‘
या प्रवाशाच्या बोलण्यावरुन वाटत होते की, त्याचा आत्मविश्वास दांडगा होता. त्याच्या हृदयाचे ऑपरेशन ही जणू एक शुल्लक बाब आहे अशाच थाटात तो बोलत होता. आपल्या बोलण्यात एकदाच काय तो त्याने ऑपरेशनच्या गोष्टींचा शेवटच कधी झाला नसता.