आत्मीय भाव ... !
पूर्वीच्या काळात लोक खूप सुखी होते असे आपण ऐकतो. पण जरा विचार केला तर असे दिसते की पूर्वीच्या काळापेक्षा आताच्या काळात समृध्दी जास्त आहे. भौतिक सुखसोईंचा हत्ती आज प्रत्येकाच्या घरापुढे झुलतांना दिसतो आहे. पूर्वी खाण्यापिण्याची ददाद होती. आज सगळीकडे सुबत्तर दिसते आहे. असे जर आहे तर मग आजचा माणूस दुरूखी का ? खोलवर विचार केला तर पूर्वीच्या आणि आजच्या माणसात एक फरक दिसतो तो म्हणजे आजचा माणूस भोगवादाच्या मागे लागलेला दिसतो. भोगासाठी नातेसंबंध ही तो विसरतो. त्याच्यातला भाव जाऊन कोरडे पणा आला. माणसे सगळीकडे एकत्र दिसतात पण वैयक्तिक जीवनात मात्र माणूस एकाकी पडलेला आहे. माणसाच्या जीवनात भाव निर्माण झाला तर तो निश्चितच सुखी होऊ शकतो, पूर्वीच्या काळी माणसाचे भावजीवन समृध्द होते. माणूस भोग भोगून सुखी होतो ही कल्पना अपूर्ण आहे. कित्येक जीवने हृदयापासून जगायची असतात. वस्तुच्या विपुलतेतूनच सुख मिळते असे नाही तर माणसाने भावनेही श्रीमंत असले पाहिजे. भाव वाढविण्यासाठी शास्त्रकार लोकसंग्रह करायला सांगतात. एका कुटुंबातील एका स्त्रीने आपल्या मृत्युनंतर आपल्या एकुलत्या एक मुलाला प्रमाने मोठे केले. खूप शिकविले. शिकल्यानंतर त्याला मोठी चांगली नोकरी मिळाला. उत्तरोत्तर प्रगती होत गेली. जिल्ह्याच्या मुख्य गावी रहात होता. दारी मोटर आली, सुंदर, कोमल मुलीशी लग्न झाले. त्या नव्याने लग्न झालेल्या श्रीमंत बापाच्या आपल्या सुनेला रोज सासू काही ना काही काम सांगत असे. सुनेला वाटे की मी चार नोकर घरी ठेवले आहेत तरी ही सासुची कटकट काही मिटत नाही. तिला सासूचा भाव ओळखता आला नाही. म्हणून आता ती, सासूच्या तोंडावर तिला दुरुत्तरे करु लागली. तेवढ्यात भाऊबीजेचा दिवस उजाडला. सासूप्रमाणेच नांदेशी ही ती तशीच वागू लागली. महाराष्ट्रात भाऊबीजेचा दिवस भाऊ बहिणीच्या प्रेमाचा पवित्र दिवस मानला जातो. बहिणीच्या हातातले मंगल निरांजन पाहायचे आणि त्या पवित्र मंगलमय प्रकाशात परस्परांचे निर्मळ प्रेम न्याहाळायचे. फक्त पाच रुपये ओवाळणीच्या तबकात टावूहृन मोकळे होण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज नव्हे !
त्या मुलाची बहीण देखील दीड एक मैलावर राहत होती. म्हणून त्याने बहिणीच्या भेटीस जाण्याची तयारी केली. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, ‘दिवाळीच्या दिवसात तुम्ही कोठे चालला ? सर्व लोक पैशाचे पूजक आहे. तुमच्याकडे चार पैसे आले आहेत म्हणून सर्वजण बोलावताहेत. आपल्या नोकराबरोबर बहिणीकडे भाऊबिजेचे पाच ते दहा रुपये पाठवून द्या !’ पत्नीच्या सल्ल्यानुसार त्याने नोकराकरवी पैसे पाठवून दिले. बहिणीच्या मनात आले. आज भाऊबीजेच्या दिवशी देखील आपला भाऊ आला नाही. केवळ पैसे पाठवून दिले. तिला खूप दुरूख झाले पैशाची काय किम्मत ? प्रत्येक गोष्ट काय पैशांनीच मिळते ? तिने नोकराला, भाऊबीजेचे पैसे मी तिकडे येऊनच घेईन असे सांगून त्याची रवानगी केली. संध्याकाळी गाडी करुन बहीण भावाच्या घरी गेली. अंगणात उतरल्या उतरल्या तिने आईला विचारले, आज भाऊ का आला नाही ? आई उत्तरली, तो येण्यासाठी निघालाच होता पण अचानक काही काम आले म्हणून तो येऊ शकला नाही. भावाने ते ऐकले. त्याला वाटले माझ्यासाठी आई धडधडीत खोटे बोलत आहे. त्यात त्याला आईचे हृदय दिसले. आपल्या मुलाविषयी बहिणीच्या मनात किम्लीष निर्माण होऊ नये ह्यासाठी खोटे बोलण्यात पाप नाही आईने मुलीला त्या रात्री मुक्काम करुन दुसछया दिवशी जायला सांगितले. रात्री सुनेला टाईफॉईडचा ताप चढला. १०५ डिग्री ताप होता. एक दिवस झाला, दोन दिवस झाले, तीन दिवस झाले तरी ताप उतरला नाही. बहिणीने घरी (सासरी) आपण येऊ शकणार नाही. असा निरोप पाठविला. तिने वहिनीचे पाय दाबले, बर्फाची पिशवी डोक्यावर ठेवली. अशा रीतीने रात्रभर तिची सेवा केली. वहिनीला पटले, की हे सर्व पैशाचेच सोबती आहे हा आपला समज चुकीचा आहे ! भावजय नणंदेला म्हणाली, ‘तू इकडे राहिली आहेस, पण तुझ्या घरचे तुझी वाट पहात असतील.’ नणंद उत्तरली, ‘तुला ह्या परिस्थितीत टावूहृन माझ्याने कसे जाववेल?’ भावजय खुपच अशक्त झाली होती. सासू शुशृषा करते आहे. नणंद रात्रभर जागून काढते आहे पण ताप उतरण्याचे नाव नाही. सासूही अख्खी रात्र जागत सुनेच्या उशाशी बसली. सुनेची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती. सासू उठून बाजूच्या देवघरात गेली. देवाला विनवू लागली, ‘भगवान! माझ्या सुनेला वाचव. तिच्या बदली मला घेऊन जा. माझी सून किती सद्गुणी आहे! हो तिच्यात काही दोष आहेत, पण किती तरी कुणी आहेत!’ हे शब्द सुनेने ऐकले. तिच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या. थोड्याच दिवसात सुनेला बरे वाटले. ती बरी होताच बहीण आपल्या गावी जावयास निघाली. सून म्हणाली, ‘तुम्हाला मी आता जाऊ देणार नाही! त्या दिवशीचे भाऊबीजेचे जेवण आज होणार. आज भाऊबीज साजरी करुनच जेवून जा. आज मी माझ्या देवाची पूजा करणार आहे.’ बहिणीने विचारले, ‘कोणता देव?’ भावजय म्हणाली, ‘आजपर्यंत देव फक्त दगडाच्या मूर्तीत आहे अशीच माझी समजूत होती. पण तो जिवंत मूर्तीतपण आहे. हे मला माहीत नव्हते असे बोलून सून उठली आणि तिने सासूचे पाय धरले आणि आपल्या भावाश्रुंनी सासुबाईचे पाय धुतले! आत्मीयता ही अशी वेगळीच गोष्ट आहे. तुम्ही विश्वात घरोघरी फिरा. तुमचा अभ्यास पक्का होईल. ही एक सामान्य गोष्ट आहे. प्रभूच्या उपकारासाठी फिरणे ही मात्र मोठी गोष्ट आहे. जितके अधिक फिराल तितके अशा प्रकारचे भावुक प्रसंग अनुभवायला मिळतील. जितकी अधिक माणसे जीवनात येतील तितके अधिक भावप्रसंग अनुभवायला मिळतील. लोकांजवळ जा, त्यांच्या हृदयाला हात घाला. माणसामाणसांत दैवी भ्रातृभाव जागा करा.