पेरा आणि पिकवा...!

Adv.Saurabh Rajput
0


पेरा आणि पिकवा...!


कित्येक लोक अनेक वेळा असे म्हणतांना आढळतात, ‘त्यांनी माल ....... पगार देऊ केला आहे. त्या पगारात मोठे काम कोण करणार? मला ...... रु. पगार देतील तर मी सर्व कामे करीन.’ अशा प्रकारची समजूत धरणे चुकीचे आहे.


समजा की, एखाद्या विध्यर्थ्याला डॉक्टरच्या पेशाकडे जायचे आहे, पण तो जर म्हणेल, ‘मला जर पुष्कळसे रोगी मिळणार असतील तरच मी डॉक्टर होईन,’ तर तो डॉक्टर कधीच होणार नाही.


एखाद्याला वकील व्हायचे असते. पण तो म्हणतो, ‘मला जर पुष्कळसे अशील मिळणार असतील तरच मी वकिलीचा अभ्यास करीन.’ हा गृहस्थ कधी वकील होऊ शकेल काय ?


एखादा खेडूत जर म्हणेल, ‘या वर्षी जर चांगला पाऊस पडला तर मी धान्य पेरीन,’ तर त्याला कधी पीक मिळण्याचा संभव आहे का ?’


पण तो विद्यार्थी जर डॉक्टरीचा अभ्यास करील, आपल्या रोग्याविषयी आस्था राखील आणि त्यांना चांगले व्हावे म्हणून जरुर ते श्रम घ्यायला तयार होईल तर रोगीच त्याला शोधीत येतील.


वकील होऊ इच्छिनार्‍याला प्रथम कायद्याचा अभ्यास तर करावाच लागतो. त्यानंतर वकिलीची उमेदवारी त्याला करावी लागते. आणि स्वत:च्या व्यवसायात नीट लक्ष घालून तो जर हुशारी दाखवील तर हवे तेवढे अशील त्याला मिळू शकतील.


नोकरीचा संबंध जे पगाराशी जोडतात ते आहेत त्या ठिकाणीच सतत राहतात. कामाबाहेर जे नोकरीचा संबंध जोडतात तेच पुढे जातात. एक काम जो कुशलतापूर्वक पार पाडतो, त्याच्याकडे दुसरे काम सोपविले जाते. जे आपल्याकडे आलेले काम कमी पगाराचे कारण सांगून नाकारतात, त्यांच्याकडे दुसरे काम कधी सोपविले जात नाही. कारण पूर्वी सोपविलेल्या कामालाही ते लायक समजले जात नाहीत. मग दुसर्‍या कामाची जबाबदारी त्यांच्यावर कोण टाकणार ? असा माणूस कोणत्या कामाला लायक आहे आणि त्याच्यात किती क्षमता आहे टाकणार? असा माणूस कोणत्या कामाला लायक आहे आणि त्याच्यात किती क्षमता आहे त्याचा अंदाज तरी कोणाला कसा येणार? हातातले काम करायला जे कार्यक्षम असल्याचे वाटत नाहीत, त्यांच्याकडे वरच्या दर्जाचे काम कोण देण्यार? अशा प्रकारच्या लोकांना हे समजत नाही की, आपल्याला आंबा खायला हवा असेल तर त्याचे झाडे लावावे लागते आणि ते वाढवावे लागते. झाड लावण्यापूर्वीच फळाची खात्री मागणाNयाची इच्छा किवा स्वप्न पुर्ण झाल्याचे आजपर्यंत तरी ऐकवित नाही.


कुठे तरी मी वाचले होते, I f you don't do something than  Nothing will change in your life. तुम्ही काहीच दिले नाहीत तर त्याच्या बदल्यात थोडेही मिळण्याची आशा राखता येत नाही. आणि तशी आशा केली तरी त्यांना मिळते ते काय? काही दिल्याशिवाय मिळविण्याचे काम फक्त भिकारीच करतात. आणि आपण पाहतो की, तसे भिकारी जीवनभर भिकारीच राहतात. त्यांची परिस्थिती कधी सुधारत नाही. प्रथम प्रत्यक्ष कामामधून तुम्ही तुमची क्षमता दाखवा. त्यानंतर जे व्हायचे ते आपोआप होते. ‘लवकरच मला वरच्या अधिकाNयाच्या खुर्चीवर बसायचे आहे’ असा ईर्षेने जो आपल्यावरची जबाबदारी पार पाडतो तो योग्य समयी त्या स्थानावर विराजमान झालेलाच तुम्हांला दिसेल. सध्याच्या कंपनीत जरी ती खुर्ची त्याला मिळाली नाही तरी दुसर्‍या कंपनीत ती खुर्ची तो कालांतराने मिळविलच. त्यात त्याचे नशीब काम करीत नसते. कामासंबंधीचा त्याचा दृष्टिकोन आणि अधिकाधिक जबाबदारी घेण्याची त्याची तयारी, याच गोष्टींचा त्याच्या यशात मोठा भाग असतो. असे असली तरी ‘तो तर नशीबवान आहे’ असे मानणार्‍या आणि बोलणार्‍या त्याच्या सहकार्‍यांची कीव करावीशी वाटते. खरी गोष्ट अशी असते की, स्वत:च्या कामाच्या बाबतीत निकोप दृष्टी असणार्‍याला बढतीकरीता खास प्रयत्न करावा लागत नाही. त्याचे कामच त्याला धक्का मारुन वर चढविते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)