आत्मश्रध्दा वाढविण्याचे तीन मार्ग
सफल होण्याचे पहिले पाऊल आहे, ‘मी सफल होणारच.’ ही विचारसरणी ही समजूत किवा श्रध्दा कशी घडवायची? ती घडविण्याचे हे आहेत तीन मार्ग -
१. सतत सफलतेचाच विचार करा. निष्फलतेच्या विचारापासून नेहमी दूर राहा, कधी ना कधीतरी ‘जीवनात मी सफल होणारच’ हा मंत्र मनात सदा जपत जा. सफलतेच्या विचारापासून ‘कदाचित’ या शब्दाला दूर ठेवा. जेव्हा एखादे अवघड काम हाती घ्याल तेव्हा, ‘मी हे नक्की करु शकेन’ असाच विचार करा. ‘ठीक आहे जमले तर करीन’, ‘नाहीतरी त्यात माझे काय नुकसान आहे?’ अशा दुबळ्या विचारांना शंभर योजने दूर राखा. एकदा तुम्ही सफल होण्याचा निश्चय केलात की, कशा रीतीने सफल व्हायचे त्याची किल्ली तुम्हांला आपोआपच मिळेल याची खात्री बाळगा.
२. कित्येक वेळेला मनुष्य स्वत:तील क्षमतेला विंâवा शक्तीला बरोबर ओळखत नाही. आपल्यातील क्षमतेचा तो योग्य तो उपयोगही करीत नाही. स्वत:मध्ये किती शक्ती आहे त्याचा अंदाजही त्याला कधी कधी नसतो. पणी तेवढीच क्षमता आणि शक्ती आहे त्याचा अंदाजही त्याला कधी कधी नसतो. पण तेवढीच क्षमता आणि शक्ती असलेली दुसरी एखादी व्यक्ती आपल्या क्षमतेचा आणि शक्तीचा कुठे आणि कसा उपयोग करुन घ्यायचा याचा शोध घेत राहते. त्यामुळे तिने मिळविलेली सफलता त्याच्या नजरेत भरते. तसे पाहिले तर सफल झालेली माणसे, माणसेच असतात. ती कोणी देव विंâवा महापुरुष नसतात. आणि एक मनुष्य जे काम करु शकतो ते काम दुसरा मनुष्य करु शकतोच. कधी कधी तुमच्या परिचितामधील एखादा सफल होतो. पण तुम्ही सफल होत नाही. त्याचे कारण ? क्षमतेच्या प्रमाणातील फरक हे एक त्याचे कारण असू शकेल. क्षमतेचे प्रमाण कमी अधिकही असू शकते. पण गोष्ट अशी असते की, सफल मनुष्य स्वत:तील क्षमतेचा आणि शक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करतो आणि त्यामुळे तो सफल होतो. काही कारणामुळे का होईना, पण निष्फळ मनुष्य स्वत:च्या क्षमतेचा आणि शक्तीचा उपयोग करीत नाही. त्यामुळे आसपासचे लोक समजतात की, ‘त्याच्यात तशी क्षमता नाही’ आणि कालांतराने क्षमता धरणारा मनुष्यही मानू लागतो की, ‘आपल्यात तेवढी क्षमता नाही.’
३. जीवनात मनुष्य किती सफल होऊ शकतो? त्याचे माप कसे काढायचे? एकाच गोष्टीवरुन ते मिळते. मनुष्य स्वत:चे ध्येय किती उच्च ठेवतो त्यावरुन त्याच्या सफलतेची झेप ठरत असते. जे आपले ध्येय कमी प्रतीचे ठेवतात, त्यांना त्या प्रमाणात कमी प्रतीची सफलता मिळते. ज्यांची नजर उच्च ध्येयावर लागलेली असते, त्यांची सफलता विंâवा त्यांचे यश तितक्याच उच्च प्रकारचे असते. कमी प्रतीचे ध्येय कधी ठेवू नका. जे विद्यार्थी फक्त पन्नास टक्केच मार्वâ मिळविण्याची तयारी करतात. ते तितक्याच प्रमाणात मेहनत घेतात आणि मार्वâही पन्नास टक्क्यांच्या आसपासच मिळवितात. पण जे विद्यार्थी ‘काही झाले तरी सत्तर टक्के मार्वâ मी मिळवीनच’ अशी महत्त्वाकांक्षा बाळगतात त्यांचे सर्व प्रयत्न सत्तर टक्के मार्वâ मिळविण्याच्या दिशेनेच होत असतात. आपले ध्येय उच्च ठेवल्यामुळे ज्या ज्या विषयांमध्ये त्यांना कमी मार्वâ मिळवतात त्या त्या विषयांत अधिक मार्वâ कसे मिळविता येतील त्याकडेच त्यांचे लक्ष असते, आणि जोपर्यंत त्यांना सत्तर टक्के मार्वâ मिळत नाहीत तोपर्यंत आपल्या प्रयत्नात ते काहीच कसूर करीत नाहीत.
तुमच्या सफलतेचे मोजमाप, कामासंबंधात निकोप प्रवृत्ती
शेकडो लोकांपैकी फक्त मर्यादित व्यक्तीच सफल होतात. बहुसंख्य लोक निष्फळच होत असतात.
या दोन वर्गांमधील लोकांत एक महत्त्वाची तफावत पहायला मिळते. ती म्हणजे कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. सफलतेसंबंधी काही काही सिध्दांत कालपरत्वे कदाचित बदलत असतात. पंचवीस वर्षांपूर्वी सफलतेच्या बाबतीत जे सिध्दांत उपयुक्त ठरले ते आजच्या परिस्थितीत उपयुक्त ठरणार नाहीत असेही होऊ शकेल. पण कामासंबंधीच्या दृष्टिकोनाच्या बाबतीत जे होते ते आजही असते.