दोन हातांपेक्षा एकच हात अधिक शक्तीमान !

Adv.Saurabh Rajput
0

 


दोन हातांपेक्षा एकच हात अधिक शक्तीमान !


माझ्या परिचितांपैकी एकाच्या उजव्या हाताला काहीतरी रोग जडला होता. डॉक्टर त्याला म्हणाले की, ‘‘तो हात कापून टाकावा लागेल. नाहीतर तो रोग संबंध शरीरभर पसरेल.’’ त्या गोष्टीला संमती देऊन त्याने आपल्या उजवा हात कापून घेतला. त्यानंतर एका हाताने आपल्या सर्व दैनिक क्रिया करायचा त्याला सराव व्हायला थोडा वेळ लागला. पण तो आपली हिंमत हरला नाही. एकदा निश्चय केल्यावर एकाच हाताने सर्व दैनिक क्रियांची सवय करायला त्याला फार वेळ लागला नाही. लहानपणी मुले जशी कक्काची बाराखडी गिरवतात तशी डाव्या हाताला सवय करुन त्या हाताने तो लिहू ही लागला.


मी त्याला विचारले, ‘‘एक हात गमावल्यानंतर जीवनाबद्दल तुझा काय ग्रह झाला ?’’


त्यावर तो म्हणाला, ‘‘शेवटी एक हात तर सहीसलामत आहे ना? एका हातापेक्षा दोन हात चांगले ही गोष्ट खरी. एका हाताने काम करण्याची थोडी अडचण पडते. पण अडचणीवरही मात करण्यात एक प्रकारचा निराळाच आनंद असतो. खरे सांगायाचे म्हणजे दोन हात असूनही मन दु:खी असण्यापेक्षा एकच हात असून जगण्यात ईर्षा वाटणे ही गोष्य जास्त महत्त्वाची आहे. तसे म्हणाल तर एक हातवाला दोन हातवाल्यालाही मागे पाडू शकतो. कारण त्या दुसNयाचे दोन्ही हात दुबळे असतात. पण माझ्यासारख्याचा एक हात दोन हातांची गरज भागवतो.’’


तुमच्या तब्येतीची कारणे महत्त्वाकांक्षेच आड येऊ नये म्हणून पुढील उपायांचा विचार करा.


१. तुमच्या तब्येतीच्या चर्चेत कधी उतरु नका. साधारण सर्दी झाली असेल, आणि तिची तुम्ही चर्चा कराल तर त्या सर्दीचा तुम्हाला अधिक त्रास वाटेल. कामात गुंतलेले असतांना सर्दीकडे लक्ष देऊ नका. तब्येतीविषयी कोणी जर बोलले तर तो एक सहज उल्लेख समजून बोलण्याचा विषय बदला. स्वत:च्या तब्येतीचे रडगाणे गाण्याची सवय चांगली नाही. या गोष्टीला लोक वंâटाळतात. लोक तुमच्याशी संपर्वâ ठेवतात त्याचे कारण तुमच्यापासून त्यांना आनंद हवा असतो. त्याऐवजी तुमच्या प्रकृतीचे रडगाणे जर त्यांना ऐकावे लागेल तर ते तुम्हाला टाळणारच. अशा तNहेने तुम्ही स्वत:चा मान गमावता.


२. स्वत:च्या प्रकृतीची चिंता करीत राहण्याची वृत्ती सोडून द्या. प्रकृतीत जर खरोखर बिघाड झाला असेल तर त्यावर योग्य उपचार करुन घेण्याचा प्रयत्न करा. केवळ काल्पनिक बिघाडावर चिंता करीत बसण्यात काय अर्थ आहे ?


३. नेहमी असा विचार करा - ‘होय, शरीर आहे, त्यात मधून मधून केव्हातरी बिघाड होणारच. आपल्या सायकलला कधी पंक्चर होते. म्हणून आपण ती तशीच ठेवून देत नाही. पंक्चर काढू काढून आपण ती लगेच वापरायला काढतो. ‘सायकलला पंक्चर झाले, आता कसे होणार, आता काय करायचे?’ असे आपण रडत बसत नाही. तसेच शरीरातील दु:ख दूर करण्याकरीता जे करण्याची आपल्याकडून अपेक्षा असते ते आपल्याला करावेच लागते. जरा काही झाले की, मानसिक खाटेवर आडवे पडून राहण्याची वृत्ती भूषणावह नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)