‘मी पुरेसे शिक्षण घेतले नाही, ही गोष्ट माझ्या आड येते .....
पण आता त्या बाबतीत काय करु शकणार ?’
काही दिवसांपूर्वी एका कंपनीचा एक रिपोर्ट माझ्या हाती आला होता. सहज मी त्याची पाने चाळून पाहिली. कायद्याप्रमाणे लिमिटेड कंपनीचा तिच्यातील मासिक रु. ६००० वर पगार असलेल्यांची नांवे, त्यांचा पगार, त्यांचे शिक्षण आणि पात्रता, कंपनीत ते कोणते काम करतात वगैरे अहवाल तयार करुन पाठवायचा असतो. ती यादी पाहून इतरांच्याप्रमाणे मलाही आश्चर्य वाटले. त्या यादीतल्या नावांपैकी बरेच जण असे होते की, त्यांच्या शिक्षणाच्या आणि तत्सम लायकीचा विचार केला तर इतक्या मोठ्या पगारात ते लायक आहेत विंâवा काय याबद्दल कोणालाही शंका वाटावी. त्या यादीत फक्त मॅट्रिकपर्यंत शिकलेल्यांचीही नावे होती. तसेच ज्यांचे कॉलेजचे शिक्षण पुरे झाले होते नव्हते त्यांचीही नावे होती. ही यादी पाहिल्यावर दुस-या कंपन्यांचेही अशाच प्रकारचे अहवाल पाहाण्याची इच्छा झाली. हीच गोष्ट मला काही मोठ्या वंâपन्यांच्या अहवालातही दिसून आली. अर्थात, त्या यादीत शिक्षणाच्या दृष्टीने खूप मोठी लायकी असणा-यांचा काही तोटा नव्हता. पण त्याच नामावळीत आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी न मिळणाNयांनीही स्थान पटकाविले होते. कोणत्याही कंपनीचा या संबंधीचा अहवाल तुम्ही पाहिलात तरी कमी शिकलेल्यांची आठ-दहा तरी नांवे तुम्हांला आढळतील.
कित्येक लोक सांगतांना आढळतात गोष्टी वाचून एक गोष्ट स्पष्टपणे समजून आली. शिक्षण आणि यश यांचे एकमेकांशी सरळ आणि निकटचे संबंध असतात असे मानता येत नाही. तसे असते तर जगात, सर्वात अधिक माणसेच सर्वोच्च पदावर विराजमान झालेली दिसली असती, आणि न शिकलेली विंâवा पाच-सात इयत्तेपर्यंत शिकलेली माणसे जीवनात गोतेच खात बसलेली दिसली असती. जीवनात पुढेच सरकलीच नसती.
अर्थात मनुष्याने शिकू नये असे मी म्हणत नाही. घेता येईल तितके शिक्षण प्रत्येकाने घेतले पाहिजे. शिकण्याची जी जी संधी मिळेल तिचा उपयोग करुन घेतला पाहिजे. कारण तुमच्या विकासाच्या बाबतीत शिक्षण ही एक महत्त्वाची गुंतवण आहे. पण शाळेच्या विंâवा कॉलेजच्या पाठ्यपुस्तकांतच शिक्षण सामावलेले आहे असा गैरसमज करुन घेऊ नका.
पाठ्यपुस्तकांशिवाय दुसरी अनेक पुस्तके असतात, की जी, तुम्हाला चांगल्याप्रकारे शिक्षण देण्याची कामगिरी करतात. अनेक लोक शिक्षणाची शाळा कॉलेजमध्ये घालविलेली वर्षे आणि मिळविलेली डिग्री यांच्याशी सांगड घालतात. शिक्षण सर्वांनाच मदतरुप असते, पण सर्टिफिकेट विंâवा पदवी यांतच शिक्षणाचा शेवट होत नसतो. शिक्षणाचा तो थोडासाच भाग असतो. अनेक लोकांचे शिक्षण शाळा आणि कॉलेज सुटल्यावर सुरु होते. कारण की, मनुष्य तेव्हाच सुशिक्षीत समजला जातो तेव्हा त्याच्या मनाचा आणि बुध्दीचा योग्य दिशेने विकास होतो. इतिहासातल्या तारखा आणि भूगोलातील महितीच डोक्यात ठासून भरण्याला शिक्षण म्हणता येत नाही.
कॉलेजचे शिक्षण तुम्ही घेऊ शकला नसलात तर त्याबद्दल तुम्हांला कमीपणा वाटण्याचे कारण नाही. कॉलेजमध्ये मिळणारे शिक्षण मिळविण्याची तुम्हांला हौसच असेल तर इतरत्रही तुम्हांला मिळू शकते. एखाद्या चांगल्या लायब्ररीचे सभासद होण्याने घरबसल्याही तुम्हांला विपुल ज्ञान संपादन करता येतो. अर्थात त्यामुळे तुम्हाला पदवी संपादन करता येणार नाही. पण वाचनाचा प्रभाव तुमच्या बोलण्या-चालण्यात आणि वागण्यात दिसून आल्याशिवाय राहणार नाही. कॉलेजची पदवी हा नोकरी मिळविण्याचा एक पासपोर्ट झालेला आहे. तेवढाच तिचा उपयोग. पदवीच्या आधारावर चांगली नोकरी मिळेलच अशी हमी देता येत नाही. पर चांगल्या वाचनाने परिश्रमपूर्वक मनाला आणि बुध्दीला तयार कराल तर त्याचा उपयोग तुम्हांला फक्त नोकरी-धंद्यातच होईल असे नाही, तर जीवनातल्या सर्व व्यवहारांत आणि लोकांचे सहाय्य मिळविण्यातही तुम्हांला त्याची मदत होईल.