मनाच्या कोठारातून कोणती गोष्ट तुम्ही बाहेर काढून घ्याल ?
मनाच्या कोठारात सुखद विचार जमा करण्याच्या गरजेविषयी आपण विचार केला. त्याबरोबरच मनाच्या कोठारातून काही काढून घेण्याची गरज पडेल तेव्हा सुखद विचारच काढून घेण्याचे ठरवा.
एकाच गोष्टीकडे प्रत्येक व्यक्ती निरनिराळ्या तर्हेने पाहते. मी एकदा दोन कैद्यांची गोष्ट वाचली होती. ते कैदी असल्यामुळे एका बंद खोलीतच त्यांना राहावे लागत होते. पण त्या खोलीला एक मोठी खिडकी होती आणि तिच्या गजांमधून दूरवर नजर पोहोचत होती. त्या दोघांपैकी एक कैदी नेहमी खालीच नजर ठेवून आपले सर्व व्यवहार करीत असे. त्यामुळे त्याची नजर तुरुंगाबाहेर असलेल्या नजीकच्या जमीनीवर चिखलाच्या खड्ड्यावरच ठहरे. त्याला वाटे, ‘तुरुंगाच्या बाहेर तरी काय ? जिकडे पाहावे तिकडे चिखलच दिसत आहे,’ तो दुसरा कैदी मात्र आपली नजर कधी खाली ठेवीत नसे. बाहेर जरा दूरवर असलेली झाडे तो पाहात असे आणि त्यांचे सौंदर्य तो निरखीत असते. झाडावर बसलेल्या पक्षांचा किलबिलाट तो ऐकत असे. सकाळी आणि संध्याकाळी झाडांमधून येणारे कोवळे किरण पाहून त्याचे हृदय आनंदाने भरुन येत असे. पण त्या दुसर्या काइड्याची दृष्टी रस्त्यावरच्या चिखलापलीकडे जाऊ शकत नव्हती. चिखलाशिवाय त्याला दुसरे काहीच दिसत नव्हते.
अशीच एक गोष्ट एका मानसरोगचिकित्सकाची आहे. त्याने एक चित्र तयार करुन घेतले होते. त्या चित्रकाराने मोठ्या कुशलतापूर्वक ते चित्र काढले होते. त्यांत पर्वतांची रांग दाखविली होती. त्याच्या पाठीमागे सूर्य दाखविला होता. ते चित्र सूर्योदयाचे होते की सूर्यास्ताचे होते ते ओळखण्याची जबाबदारी ते चित्र पाहणार्यावर टाकलेली होती. त्या मानसरोगचिकित्सकाने ते चित्र आपल्या रोग्यांना दाखविले आणि त्यांचे मत विचारले. त्यावरुन तो रोग्यांचा जीवनाविषयक दृष्टिकोन जाणून घेत असे. बहुतेक जण ते सूर्यास्ताचे चित्र आहे असे मानीत असत. त्या मानसशास्त्रज्ञाकडे एक बाई आली. तिला त्याने ते चित्र दाखविले आणि तिचे मत विचारले, ‘थोड्याच वेळाने मोठे वादळ होण्याचा संभव आहे असे हे चित्र दाखविते,’ असे ती म्हणाली.
तो मानसरोगचिकित्सक त्यानंतर त्या बाईच्या इतिहासात थोडा खोल उतरला. त्या बाईचे वय साधारणपणे तीस एक वर्षांचे असावे. तिला दोन मुले होती. जीवनात तिला रस वाटत नव्हता. ती अतिशय हताश आणि थकलेली वाटत होती. जीवनात प्रत्येक प्रसंग तिला दु:खच वाटत होता. आपले बालपण, आपली विद्यार्थीदशा, आपले लग्न, आपली मुले, ज्या ठिकाणी ती राहत होती ती जागा, या सर्व गोष्टींमधून कटूताच शोधून काढून ती जणू मनामध्ये साठवीत होती.
प्रत्येक दु:खद प्रसंगावर एक एक वेळचा केलेला विचार जखम उघडी करुन तिच्यावर मीठ चोळण्याचे काम करतो. भूतकाळात घडलेला असतो. त्याचे प्रत्यक्ष दु:ख आता राहिलेले नसते. पण तो प्रसंग भूतकाळात घडलेला असतो. त्याचे प्रत्यक्ष दु:ख आता राहिलेले नसते. पण त्याचा विचार करीत राहिल्याने त्या दु:खाचा आपण मनात पुन्हा अनुभव घेत असतो. मूळचे लहान दु:खही पुढे मोठे स्वरुप घेत असते. ते तुमच्या मनाची एवढी पकड घेते की, त्याच्या कचाट्यातून सुटणे तुम्हाला मुश्कील होते. त्यामुळे वर्तमानकाळातील सुखाचा आनंद अनुभवण्याची संधी तुम्ही घालवून बसता.
त्या बाईवर त्या मानसरोगचिकित्सकाने निराळेच उपचार करण्याचे ठरविले. तो म्हणाला, ‘आज घडलेला एखादा सुखदायक प्रसंग सांगा.’ त्यांनतर ‘तुम्हाला आवडणारी काल घडलेली एखादी गोष्ट सांगा.’ असे तो तिला म्हणाला. तसे सांगून त्याने तिच्याकडून एका मागून एक सुखद गोष्टीच वदविल्या. याप्रमाणे भूतकाळातील कटू प्रसंग तिला विसरायला लावून व सुखद गोष्टीचे स्मरण तिला करायला लावून त्यापासून तिला आनंद मिळवून देण्याचा उपचार त्याने सुरु केला. सहा एक महिन्यांनी या प्रकारच्या उपचारांने तिच्या हताशपूर्ण आणि दु:ख वृत्तीत बरीच सुधारणा झाली. त्यानंतर ती बाई आपल्या मनाच्या कोठारात दु:खी विचारांऐवजी सुखी विचार साठवू लागली. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन पार बदलून गेला.
मानशास्त्राचा एक नियम आहे की, मनुष्याच्या मनाला दु:खाच्या स्मृती आवडत नसतात. तशा स्मृती तो टाळण्याचाच प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही मनाला सहकार दिलात तर तशा कटू स्मृती तुम्ही मनातून काढून टावूâ शकता. तुमचे मन आपले कठोर कटू स्मृतींचा केरकचरा झाडून साफ करुन टाकील. अप्रिय गोष्टींची पुन्हा आठवण काढण्याचे आपण जर नाकारु तर त्या गोष्टी विसरुन जाणे सहज शक्य आहे. तेव्हा तुमच्या मनाच्या कोठारातून सुखद स्मृतीचा सदा काढीत राहणे हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. तसे केल्याने न रुचणाNया आणि दु:खद स्मृतींची गरज न वाटता त्या आपोआप लुप्त होतात.