रुझवेल्टचा लाख रुपये मोलाचा सल्ला

Adv.Saurabh Rajput
0



रुझवेल्टचा लाख रुपये मोलाचा सल्ला


भारतात पंतप्रधानाला जो हुद्दा असतो तसा हुद्दा अमेरिकेत तिथल्या अध्यक्षाला असतो. एकेकाळी थिओडोर रुझवेल्ट हे अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यांना एकाने, एक कुतूहल म्हणून, एकदा विचारले, ‘‘आपण निष्णात राजकारणी आहात, कुशाग्र बुध्दीचे आहात, तेव्हा तुम्हांला एक गोष्ट विचारायची आहे. दररोज तुम्हांला काहीना काही निर्णय घ्यावे लागतच असणार. पण त्यातले किती टक्के निर्णय बरोबर असतात?’’ विंâचित विचार करुन रुझवेल्टनी उत्तर दिले, ‘‘मला वाटते, माझे पंचवीस एक टक्के निर्णय बरोबर ठरतात.’’


हे ऐकल्यावर विचारणारा मनुष्य थक्कच झाला. सुरुवातीला त्याला वाटले की, आपल्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. रुझवेल्टच्या सांगण्याचा अर्थ असा होता की, अंदाजे त्यांचे ७५ टक्के निर्णय चुकीचे ठरतात. शक्यच नाही. तसे होईलच कसे ?


प्रश्न विचारण्यार्‍याच्या  चेहर्‍यावरचे भाव ओळखून आपल्या सांगण्यात थोडी सुधारणा करण्याच्या इराद्याने रुझवेल्ट म्हणाले, ‘‘शक्य आहे की तीस-एक टक्के माझे निर्णय निर्दोष असतील. त्यांची टक्केवारी मी कधीच काढली नाही. त्यामुळे अचूकपणे मी काही सांगू शकणार नाही. पर माझ्या निर्णयांपैकी तीस टक्क्यांपेक्षा अधिक निर्णय बरोबर असतील असे मला वाटत नाही. निर्णय घेतांना आपण त्या वेळेची विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन तिच्या विविध अंगांचाही विचार करतो. पण त्या शिवाय समाजात किवा राजकारणात निराळ्यात गोष्टी विंâवा प्रवाह उत्पन्न होत असतात. त्यांच्याविषयी आपल्यात अज्ञान असते किवा त्यांच्यापर्यंत आपली दृष्टी पोहोचत नाही असेही होते. त्यामुळे आपले निर्णय चुकतात. म्हणून मी म्हणतो की तीस टक्केच माझे निर्णय बरोबर असतात.’’

प्रश्न विचारणारा अजूनही गोंधळातच होता. रुझवेल्टचा सांगण्यावर काय बोलावे ते त्याला सुचत नव्हते. त्याची ती स्थिती ओळखून रुझवेल्टनी त्याला विचारले, ‘‘तुम्हाला काय वाटते? तुमचे स्वत:चे तीस टक्के विंâवा साठ टक्के बरोबर असतात असे कसे म्हणू शकेल? त्यामुळे काही उत्तर न देता तो गप्पच बसला. पण आपले बोलणे पुढे चालू ठेवून रुझवेल्ट म्हणाले, ’’हे पहा, तुम्हाला जर वाटत असेल की, आपले पन्नास टक्के निर्णय बरोबर असतात तर मी सांगतो तसे करा.‘‘

प्रश्न करण्यार्‍याने जरा भीतभीतच विचारले, ’’काय?’’

‘‘हेच की, तुम्ही आजच वॉलस्ट्रीट (शेअर बाजार) वर जा. आणि त्या ठिकाणी खरेदी विक्री करा. त्यांत तुमचे पंचावन्न टक्के निर्णय बरोबर ठरले आणि पंचेचाळीस टक्के निर्णय चुकीचे ठरले तरी सहा महिन्यांत तुम्ही अब्जाधिश किवा कोट्याधीश व्हाल. आणि सरासरीने दहा टक्के निर्णय जरी बरोबर ठरले तरीही तुमच्याकडे संपत्तीचा ढीग पडेल.’’


एके काळी साठ कोटी प्रजेवर अविरत हुकूमत चालविणारा आणि जगातल्या त्या वेळेचा सर्वात सामर्थ्यवान  तीन व्यक्तीपैकी एक, अशा जोसेफ स्टॅलिनने एके ठिकाणी म्हटले आहे, ‘‘मुख्य गोष्ट ही की, मनुष्याला स्वत:च्या चुकांची जाणीव असली पाहिजे आणि त्या चुका कमीत कमी काळात सुधारण्याचे त्याच्या अंगी बल असले पाहिजे.‘‘

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)