संस्कृती साठी बलिदान
महाभारताचे युध्द चालु असतांना द्रोणाचार्यांनी पाहिले की, चक्रव्युह भेदण्याची शक्ती अर्जुनात व कृष्णातच आहे. त्यातून कृष्णतर लढणारच नाही. तेव्हा त्यांच्या गैरहजेरीत चक्रव्युह रचला तर पांडवांना हरविण्याचे काम होऊन जाईल म्हणून युक्ती योजून कृष्णाला व अर्जुनाला लढत लढत त्यांनी खूप दूर नेले आणि मग व्यूह रचला. संध्याकाळ पर्यंत चक्रव्युहाचा भेद झाला नसता तर पांडव हारले असे ठरणार होते. अर्जुन चक्रव्युह भेदू शकणार होता पण तो तेथे हजर नव्हता. अभिमन्यूने ते पाहिले. त्याचे वय काय? त्यावेळी अभिमन्यू अठरा वर्षाचा होता. तरूण अभिमन्यु विचार करतो की, कौरवांनी व्युह रचला आहे. अंधार पडण्यापूर्वी चक्रव्युह भेदला पाहिजे. मला चक्रव्युह भेदता येतो पण त्यातून बाहेर कसे पडायचे ते माहीत नाही. आता तर आणीबाणीचा प्रश्न निर्माण झाला. येथे मानव संस्कृतीचा प्रश्न आहे. आमचा पक्ष विजयी झाला नाही व कौरव जिंकले तर सिध्द होईल की भगवंताशिवाय समाज सुखी राहू शकतो. हा वैश्विक सिध्दांताचा प्रश्न आहे. हा विचार करून त्याने चक्रव्युह भेदण्याचा निश्चय केला. त्याला माहीत होते की, आपण चक्रव्युह भेदून आतगेलो की, आपला मृत्यु अटळ आहे. अभिमन्युला चक्रव्युह भेदता येत होता. पण त्यातून बाहेर कसे पडायचे ते तो शिकला नव्हता. अर्धे ज्ञान नेहमीच भयंकर असते. आज वेदांताचेही अर्धवट ज्ञान आहे आणि भक्तिचेही अर्धवट ज्ञान म्हणूनच त्यात मुर्खपणा घुसला आहे. एखाद्याला धंद्यात नुकसान झाले की, लागला भक्ति करायला. तो भजन गातो म्हणून झाला भक्त! पुढे जाऊन संत शिरोमणी, संत श्रेष्ठही होतो! माणसाला धंदा करता येत नाही. म्हणून तो भक्तिच्या क्षेत्रात घुसला. असा नमुना जगात कोठेही जन्माला नसेल, लोक म्हणतात देखील की, त्याला विरक्ती आली आहे. तिरस्कार मधून जन्मलेल्या विरक्तीचा अर्थ तो काय? अभिमन्युने सांगितले, माझे जीवन नाश पावले तरी चालेल पण जगात भगवंता शिवायही समाज सुखी राहु शकतो हा विचार दृढ होता कामा नये. अभिमन्यु धर्मराजापाशी गेला आणि म्हणाला, ‘का द्रोणाचार्यांनी चक्रव्युह रचला आहे तो मी भेदला नाही तर पांडवांचा पराजय निश्चित आहे. पांडवांचा पराजय हा तत्वज्ञानाचा पराजय आहे. मी जीवंत असताांना तो होऊ देणार नाही. तुम्ही मला चक्रव्यूह भेदण्याची आज्ञा द्या.’ युधिष्ठिराला वाटले, जर अभिमन्युला लढाईला जाण्याची आज्ञा दिली तर अर्जुनाला काय सांगू? अर्जून विचारील माझ्या कोवळ्या अभिमन्युला तुम्ही का पाठवले? आणि जर अभिमन्यूला पाठविले नाही तर कृष्ठाला काय उत्तर देऊ? अभिमन्युला पाटविले तर पाहिजे ! शेवटी युधिष्ठिर म्हणाला, अभिमन्यू जा ! तुझ्या आईला सुभद्रेला विचार. तीने आज्ञा दिली तर जा! अभिमन्यु सुभद्रेला विचारायला आला, ‘आई ! हा संस्कृतीचा प्रश्न आहे. तेव्हा तू मला जाण्याची आज्ञा दे!’ अहो शहरात हुल्लड झाली तरी आई मुलाला घराच्या बाहेर जाऊ देत नाही. सुभद्रेला माहीत होते. अभिमन्यु जर चक्रव्युहात गेला तर जीवंत येणार नाही. पण काय करायचे? अश्या नाजुक प्रश्नाचे उत्तर द्यायला तत्वज्ञानाची गरज नाही, करू की नको? बोलु की नको ? ह्या वाटेने जाऊ की नको ? माणसाच्या जीवनात असे प्रश्न सतत उभे राहतात. त्या प्रश्नांची योग्य उत्तरे माणूस देत नाही म्हणूनच तो दुरूखी होतो. अशा प्रसंगात हॅम्लेट मेला व अर्जुन जीवंत राहिला. विजयी झाला. त्याचे कारण भगवंताची गीता. आपण गीतेचे महत्व खुपच कमी केले आहे. अशी एक म्हण आहे, जेव्हा दाढी झाली ढवळी तेव्हा घरात गीता खोलली. माणूस म्हतारा झाल्यावर हातात गीता घेतो. माणसाच्या जीवनात असे प्रसंग सतत येणारच. करू की नको ? बोलू की नको ? तत्यावेळी योग्य निणर्यय घेण्याएवढी शक्ती बुध्दीत नसते. सुभद्रेतही निर्णय घेण्याची शक्ती नव्हती. अभिमन्युला जा म्हणायचे म्हणजे मुलाला मारून टाकायचे. जाऊ नको म्हणायचे तर हा प्रश्न एका तत्वज्ञानाचा आहे. कौरव विजयी झाले तर मानववंश कायम सांगत राहिल, की मानवी जीवनात सौख्यासाठी, विकासासाठी, समृद्धीसाठी भगवान नावाच्या तत्वाची गरज नाही.
ईश्वरोऽहमहं भोगी.........आता काय करायचे?
आई म्हणाली,‘तू म्हणतोस ते खरे आहे. पण तू माझा मुलगा आहे. मी तुला उत्तर दिले पाहिजे परंतु ज्या दिवशी तू लग्न केलेस त्या दिवसापासून तू उत्तरेचा झला आहेस. मला अधिकार आहे हे खरे असले तरी देखील माझ्याहून अधिक अधिकार उत्तरेचा आहे. तू तिला विचारून ये!’ सर्वांना माहीत होते की, चक्रव्युहात गेल्यानंतर अभिमन्यु परत येणार नाही. अभिमन्यू उत्तरेकडे आला आणि म्हणाला, आज एक कसोटीचा प्रसंग येवून ठेपला आहे. हे एक वैश्विक कार्य आहे. मला माहीत आहे की,चक्रव्यूहात मी आत गेलो की मरणार आहे कारण, मी बाहेर निघू शकणार नाही. परंतू हा त्याग आहे. संस्कृतीवरील प्रेमाखातर मला गेलेच पाहिजे. माझे शरीर जाणार आहे हे मला माहीत आहे. तू जर मला जाण्याची परवाणगी देशील तरच आईही मला जाण्याची परवाणगी देईल. आईने परवाणगी दिली तर काकाही नाही म्हणणार नाही. बोल तू काय म्हणतेस?’ उत्तरा नवविवाहीता होती. तिच्या पोटात आठ महिण्याचा गर्भ होता. तिला माहीत होते की, चक्रव्यूहात गेल्यानंतर आपला पती परत येणार नाही . तो चक्रव्यूह भेदील पण परत येणार नाही. पण तो सायंकाळपर्यंत कौरव सैन्य आडवू शकेल. संध्याकाळी दोन्ही बहादूर वासुदेव अर्जुन येतील. त्यांना देऊ द्या....! सगळेखरेय पण उत्तरा काय उत्तर देणार ? उत्तरेने सांगितले,‘लढाई मोठ्या लोकांची गोष्ट आहे. आपण लहान बालके आहोत.’ अभिमन्यु म्हणतो,‘सिंहाचा बालक कधी लहान असतो ? तो जन्मताच मोठा असतो. त्याला पाहून सर्व श्वापदे पळू लागतात. क्षत्रियाचा बालक कधी लहान असत नाही.’ अभिमन्यूने जेव्हा हे सांगितले, त्यावेळी उत्तरेतील सिंहीण जागी झाली. उत्तरा महणाली,‘तुम्ही सिंहाचा बालक असला तर मी देखील सिंहणीचा बालिका आहे. मी तुम्हाला वुंहृकुम तिलक करते’, असे सांगुन उत्तरेने त्याला वुंहृकुम तीलक केला. उत्तरेला दिसत असते. स्वतरू विधवा होणार! अभिमन्युलाही दिसते, आपण मरणार ! पण दुसरा पर्याय नव्हता. उत्तरेने वुंहृकुम तीलक केल्यानंतर अभिमन्यू धावत गेला. चक्रव्यूह भेदून स्वतरूचे हवन केले. संस्कृतीसाठी केलेला हा त्याग पाहून भगवान कृष्णाच्याही डोळ्यात पाणी आले ! अभिमन्यूच्या पायाजवळ उभा असलेल्या कृष्णाच्या डोळ्यातून अश्रू येतात. अभिमन्यूचा भव्य त्याग आहे. त्याला काय मिळवायचे होते ? संस्कृती उभी रहावी, भगवंताची विचारधारा उभी राहावी. म्हणून जे लोक करतात, तो त्याग दैवी संपत्तीचा त्याग आहे. अशी संस्कृतीच सुवर्णपृष्ठे ठरणारी चरित्रं फक्त या भूमीतच पहायला मिळतात म्हणूनच, ‘दुर्लभं भारते जन्मरू!’