शंकराच्या मंदिरात कासव का बर ?
एक पौराणिक गोष्ट आहे. एका इंद्राने शंकराला स्वर्गात येण्याचे अमंत्रण दिले आणि शंकरासारखी महान शक्ती स्वर्गात येणार आहे म्हणून त्याने सर्व प्रकारची पूर्वतयारी करायला आरंभ केला. इंद्राकडे वैभवाची कमतरता नव्हती. त्याने सर्व स्वर्ग सुंदर, शोभायमान व विलोभनीय बनवला आणि शंकराचे भव्य स्वागत केले. इंद्राचा दरबार भरला. आमोद प्रमोदासाठी स्वर्गीय नृत्यपीठावर अलौकिक सौंदर्यवान अप्सरांचे नृत्य झाले. गंधर्वांनी गायन, वादन केले. सर्वजण सात्विक आनंद अनुभवित होते. परंतु, इंद्र राजाने पाहिले शंकर मात्र प्रसन्न दिसत नाही. इंद्राला वाटले, आपण केलेल्या स्वागतात काही कमी राहिले की काय? तेवढ्यात तेथे नारद येऊन पोचले. इंद्र राजाने नारदांना विचारले, महाराज नारदजी, आपण ब्रम्हा, विष्णु, महेश सर्वांकडे वारंवार जाता तेव्हा आपणांस त्यांच्या आवडीनिवडी विषयी सर्व काही माहिती असेल. महाप्रयासाने शंकरांनी माझे निमंत्रण स्विकारले आणि ते माझ्याकडे आले. मी ही त्यांचा अंतरूकरणापासून सत्कार केला, त्यांच्या मनोरंजनासाठी नृत्य-गीतांचा कार्यक्रम ठेवला. परंतु शंकरांच्या मुखावर प्रसन्नता दिसत नाही. सांगा, मी काय केले म्हणजे शंकर प्रसन्न होतील.
नारद म्हणाले, ‘स्वर्गात राहणारे तुम्ही सर्व देव भोगवादी आहात. तुमच्या क्रीडेत शंकराचे मन रमत नाही आणि रात्रंदिवस कल्पवृक्ष, अप्सरा व अमृत या तीन वस्तूंशिवाय दुसरा कोणता विचार तुमच्या मनात येत नाही. शंकर तर पशुपतिनाथ आहे. तेव्हा तुम्ही मृत्यूलोकातून सर्व पशुंना येथे स्वर्गात घेऊन या आणि त्यांना आपापली कला दाखविण्याची विनंती करा. ते आपापली कला दाखवतील तेव्हा कदाचित शंकर प्रसन्न होतील. शंकरांना प्रसन्न करणे तसे कठीणच आहे. तरीही मी सांगतो तसे करुन पाहा.’ हे ऐकताच इंद्र राजाने तात्काळ आज्ञा दिली आणि पृथ्वी लोकातून सर्व पशुंना स्वर्गात बोलावून घेतले. सर्व पशूंची सर्वहृस स्वर्गात जमा झाली. त्यानंतर इंद्रराजाच्या आज्ञेप्रमाणे एक एक प्राणी स्वर्गीय मंचावर हजर होऊ लागला. स्वतरूचे कौशल्य दाखवू लागला. शंकर हे सर्व पहात होते. उत्पत्ती, स्थिती, लय करणाछया महान शक्तीसमोर कौशल्य सादर करण्याचे महत्भाग्य अनुभवू लागले. सिंह, वाघ, हत्ती, उंट, डुक्कर, कोल्हे वगैरे पशूंनी स्वतरूचे कौशल्य दाखविले. परंतू शंकराच्या मुखावर काही फरक दिसला नाही. त्यामुळे इंद्रराजा थोडा निराशच झाला. एवढ्यात रंगमंचाच्या रोखाने हळूहळू चालत येत असलेलं एक कासव त्यांनी पाहिलं. कासव रंगमंचावर येण्याचा प्रयत्न करीत आहे, हे पाहताच सर्व पशूंनी ओरड केली. त्यात एकजण म्हणाला, अरे! हा तर स्वर्गीय रंगमंच आहे. येथे सर्व फर्स्ट क्लास पशूंनी कौशल्य दाखविले आहे. येथे तुझ्यासारख्या क्षुद्र कासवाचे काम नाही. खाली उतर! कासव थांबले, परंतु तेवढ्यात नारदाची नजर त्याच्यावर पडली. नारद म्हणाले, या स्वर्गीय रंगमंचावर कासवाला येऊ द्या. तुम्ही त्याला अडवू नका! झाले! आता कासवाला कोण अडवणार? कासव हळूहळू चालत मंचावर चढले. ते पाहून वाघ, सिंह, हत्ती सर्वजण गुरगुराट करु लागले. सिंहाने सांगितले, हा तर स्वर्गीय रंगमंच आहे. येथे आमच्यासारखे प्रथम श्रेणीचे लोक स्वतरूचे कौशल्य दाखवायला आले आहेत. त्याला येथे येण्याचा परवाना कोणी दिला? हा तर आमचा अपमान आहे! तरीही कासव हळूहळू पुढे गेले आणि त्याने शंकराजवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यानंतर ते रंगमंचाच्या मध्यभागी आले आणि सर्व पशूंना उद्देशून म्हणाले, तुम्ही सर्वजण मोठे, समर्थ व शक्तीशाली असे प्रथम श्रेणीचे लोक एकत्रीत झालेले आहात. तुम्ही श्रेष्ठ आहात यात शंका नाही. तुम्ही सर्वांनी मला येथे येतांना अडवले. तुम्हाला शोभेल असेच तुम्ही केले. तरीही मी इथे आलो. आता माझे काम पूर्ण झाले. तुम्हाला माझे जे काय करायचे असेल ते करा! हे ऐकताच क्रोधाने संतप्त झालेला सिंह एकदम उडी मारुन रंगमंचावर आला. कासवाला मारण्यासाठी त्याने पंजाही उगारला. शंकर तसेच सर्व देव ते पहात होते. कासवाने त्याचे काही वाकडे केले नाही, प्रतिकारही केला नाही. सिंहाने पंजा मारताच त्याने स्वतरूचे अवयव तात्काळ आत ओढून घेतले. कासवाच्या पाठीवर सिंहाचा पंजा पडला पण त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. सिंह मारमारुन थकला. त्यानंतर सर्व पशूंनीही त्याच्या पाठीवर फटके मारुन पाहिले, परंतु कासवाच्या दगडासारख्या पाठीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. शेवटी खजील होऊन सर्व पशु रंगमंचावरुन खाली उतरले. कासवाचे कौशल्य पाहून शंकर हसले आणि अत्यंत प्रसन्न झाले. इंद्रराजाही खूष झाला. शंकरांनी सांगितले, आजच्या क्रीडा स्पर्धेतील प्रथम स्थान या कासवाला मिळालेले आहे. हे ऐवूहृन कासवाने शंकरांना नमस्कार केला त्या दिवसापासून शंकराच्या सर्व मंदिरात कासवाला स्थान मिळाले. कासवाचे दर्शन घेतल्याशिवाय शंकराचे दर्शन घडत नाही. फोकटलाल शेठ स्वतरू आठ लाखांच्या मोटारीत बसून शंकरांना नमस्कार करायला येतो खरा, पण तो कासवाला नमस्कार करीत नसेल तर शंकर त्याचा नमस्कार स्विकारणार नाही. कासव एक महान शक्तीचे प्रतिक आहे. मग त्या सभेत शंकरांनी सर्वांना सांगितले, या कासवाची पाठ इतकी मजबुत कशी झाली व ते मी तुम्हांला सांगतो. या कासवाकडे त्याच्या आईने अत्यंत प्रेमाने व भावपूर्ण नजरेने पाहिलेले आहे. म्हणून त्याची पाठ इतकी मजबुत झाली आहे. खरोखर! जगदंबेजी अत्यंत प्रेमपूर्ण, भावपूर्ण व वात्सल्यपूर्ण दृष्टी ज्याच्यावर पडते आणि ती जेव्हा, ‘शाब्बास बाळ!’ म्हणत पाठीवर एक थाप मारते, तेव्हा त्याची पाठ अभेद्य बनते. मग त्याला कोण हरवू शकणार? ज्याची पाठ अभेद्य बनलेली असते, अशा भक्ताला कनक, कांता विंहृवा किर्ती यांचे आघात विचलीत करु शकत नाही. कासावाजवळ स्वतरूचे अंग आत ओढून घेण्याची शक्ती आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी गीतेसारख्या ग्रंथातही त्याचा दृष्टांत दिलेला आहे.
यदा संहरते चायं वूहृर्मोगानीव सर्वशरू।
इंद्रियाणी न्दियार्भेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।।
विषयांकडे ओढ असलेल्या माणसांची बुध्दी स्व-स्थान सोडून चंचल बनते, इंद्रिये विषयांच्या गोडीमध्ये फसून जातात व बुध्दी चंचल असेल तर इंद्रिये स्वैरविहार करतात. बुध्दी स्थिर करण्याचा एक मार्ग हा आहे की, इंद्रियांना विषयांच्या आक्रमणापासून वाचवून आत ओढून घेणे, ही गोष्ट समजावण्यासाठी या श्लोकात कासवाचा दृष्टांत दिलेला आहे.