कोर्डेलने कसे यश मिळविले?

Adv.Saurabh Rajput
0

 


कोर्डेलने कसे यश मिळविले ?

अमेरिकेत कोर्डेल हल नावाचा एक सुप्रसिध्द राजकारणी पुरुष होऊन गेला. तो बारा तेरा वर्षांचा झाला. तेव्हा त्याचे वडील म्हणत, ‘हा माझा मुलगा कोर्डेल याचे काय होणार आहे हे समजत नाही. स्वभावाने तो इतका हळवा आहे की, एखाद्या शाळेत तो शिक्षक होईल असे वाटत नाही. तो इतका दणकटही नाही की मजुरी करुन तो स्वत:चे पोट भरु शकेल. त्याला डॉक्टर होता येईल असा मनमिळावू स्वभावही नाही. त्याचा आवाज असा गोड नाही की, तो पादरी म्हणून काम करु शकेल,’ पण तोच कोर्डेल हल अमेरिकेच्या राज्यमंत्रीपदापर्यंत जाऊन पोहोचला. त्या हुद्द्यावर पोहोचेपर्यंत त्याला अनेक भाषणे करावी लागली होती. तो नेहमी म्हणायचा, ‘‘माझ्या आयुष्यातले माझे सर्वांत महत्त्वाचे भाषण मी चौदा वर्षांचा असतांना केले.’’


कोर्डेलच्या वडिलांना एवंâदर पाच मुले. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. पण मुलांना शिक्षण देण्यात त्यांना उत्साह होता. त्यामुळे त्यांनी नक्की केले, ‘एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च मी करु शकतो, आणि त्याला मोठ्या शहरात पाठवून त्याचे पुढचे शिक्षण मला करायलाच हवे.’


वडिलांचा हा इरादा कोर्डेलला माहीत होता. त्याने मनात ठरविले, ‘शिकायला मीच जाणार, पण या बाबतीत वडिलांचे मन वळवायचे कसे? त्याला सतत वाटे, ‘मी काय करु की, ज्यामुळे वडील मलाच शहरातल्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला पाठवतील?’


त्यामुळे वडिलांवर छाप पाडण्याकरीता तो गावातल्या एका चर्चा मंडळात सामील झाला. त्या मंडळात त्याने खूप रस घेतला.


एकदा त्या चर्चामंडळातर्फे एक मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत भाषण करणार्‍यांना आपल्या भाषणांत सिध्द करायचे होते, ‘कोलंबसने अमेरिका शोधून काढण्यात जेवढे यश मिळविले त्यापेक्षा अधिक यश वॉशिंग्टनने अमेरिकेचे रक्षण करण्यात मिळविले.’


कोर्डेल जाणत होता की, ही स्पर्धा खूप रसप्रद होणार होती. ती ऐकण्याकरीता सबंध गाव लोटणार होते. त्यांत त्याचे वडील हजेरी लावणार नव्हते असे होणार नव्हते. त्यामुळे आपल्या वडिलांवर छाप पाडण्याकरीता की, ज्यामुळे त्याला शहरातल्या कॉलेजमध्ये जायला मिळेल त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे त्याने नक्की केले.


त्या प्रसंगी करण्याचे भाषण तयार करण्याच्या तो मागे लागाल. त्याकरीता त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली. इतिहासाची पाने त्याने चाळली. अनेक प्रसंगाची त्याने माहिती मिळविली. शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाला जाऊन तो भेटला. आणि भाषणाच्या विषयाची त्याने त्यांच्याजवळ चर्चा केली. शिक्षकांकडून त्याला जी माहिती मिळाली त्याचे टिपण त्याने तयार केले. अशा रीतीने त्याने आपल्या भाषणाची तयारी केली, आणि स्वत: जेव्हा एकटा असे, तेव्हा ते भाषण बोलण्याचा त्याने सराव केला.


त्याचा परिणाम असा झाला की, भाषणाच्या स्पर्धेत तो जिंकला. त्याच्या भाषणाची ढब पाहून त्याचे वडील थक्क झाले. अर्थातच पुढच्या रीतीने कॉलेजमध्ये जाण्याची संधी कोर्डेलने स्वत:च उभी केली आणि तिचा पुरेपुर फायदा करुन घेतला.


राजकारणात पडण्याची त्याला तीव्र इच्छा होती. राजकारणात पडायचे म्हणजे अस्खलित भाषण करता यावे लागते. त्या दृष्टीने त्याने खून मेहनत घेतली. एक काम केल्याबद्दल त्याला सहा पौंड मिळाले. त्यातून त्याने एक घोडागाडी भाड्याने घेतली आणि लोकसभेच्या एका सभासदाबरोबर स्वत:च्या खर्चाने तो गावोगाव हिंडला. कशाकरीता ? तो सभासद काय बोलतो, आपले भाषण तो कशा तर्‍हेने रुजू करतो, ते सर्व त्याला  शिकून   घ्यायचे होते. रोजच्या रोज भाषण करण्याची संधी त्याने स्वत:च उभी केली.


त्या जमान्यात वकील लोकच राजकारणात भाग घेत असत. म्हणून त्याने स्वत: वकिलीचा अभ्यास सुरु केला. त्या वेळी त्याचे वय तीस वर्षांचे असेल. इतक्या अल्पवयी वकिलाला अशील कोण मिळणार? पण तो स्वस्थ बसला नाही. कायद्याचा पुढचाही अभ्यास त्याने चालू ठेवला. जुन्या आणि मोठ्या वकिलांच्या बरोबर त्यांचे अनुभव व त्यांची शिकवण तो समजून घेत होता.


आणि आता स्वत:करीता संधी उभी करता करता अमेरिकेच्या राज्यमंत्र्यांच्या हुद्द्यापर्यंत तो पोहोचला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)