एका मॅनेजरबरोबर झालेल्या बोलण्यात त्याने वाचलेली एक गोष्ट मला सांगितली. तो म्हणाला, ‘‘एका अमेरिकन कंपनीची गोष्ट माझ्या वाचण्यात आली. स्वत:च्या कर्माच्यार्यांच्या प्रगतीकरीता त्या कंपनीने एक निराळीच पध्दत ठरविली. त्या वंâपनीतले एक दोन अधिकारी, कर्मचाNयांना आपल्या भेटीचा हेतू न सांगता, त्यांना भेटत असत. आपण सहज बोलतो त्याप्रमाणे वंâपनीच्या कामकाजाविषयी ते त्यांना काही वर वर प्रश्न विचारीत. त्यांना कर्मचाNयांच्या अडचणी आणि मुश्कीली समजावून घेण्यात रस आहे, अशा रीतीने ते त्यांच्याशी निरनिराळ्या प्रश्नांवर चर्चा करीत. त्या चर्चेच्या आधारावर ते आपल्या कर्मचार्यांचे दोन वर्ग पाडीत, ‘अ’ वर्ग आणि ‘ब’ वर्ग. ‘ब’ वर्गातल्या कर्मचार्यांशी झालेल्या चर्चेतून अशा गोष्टी प्रगट होत. कंपनीने ओव्हरटाईमच्या पगारात वाढ केली पाहिजे, कर्मचार्याच्या आजारीपणात त्यांना करण्याच्या मदतीच्या बाबतीत कंपनीने आपले धोरण अधिक उदार ठेवले पाहिजे, कंपनीने कर्मचार्याच्या सध्याच्या पगारात स्केलमध्ये सुधारणा केली पाहिजे, वगैरे. कंपनीचे व्यवस्थापनखाते या सर्व गोष्टीत काय करु इच्छिते हाच ‘ब’ वर्गाशी झालेल्या चर्चेचा मुख्य विषय असे. त्याचप्रमाणे आपले काम किती त्रासदायक आहे इतरांपेक्षा आपल्याला किती अधिक काम करावे लागते. दुसरे कशी मजा मारीत असतात, आणि स्वत:चे काम कधी संपतच नाही, अशा तर्हेच्या गोष्टी त्या चर्चेत आल्याशिवाय राहत नसत. कर्मचार्यांपैकी ऐंशी टक्के कर्मचारी या ‘ब’ वर्गात येत असतात.
पण ‘अ’ वर्गातील कर्माच्यार्यांशी झालेल्या चर्चेतील गोष्टींचे विषय निराळेच असत. आपल्या कंपनीचा विकास कसा साधायचा या गोष्टीचीच चर्चा चाले. या वर्गातील करमचयर्यांना सध्यापेक्षाही अधिक जबाबदारी आणि अवघड काम हाती घेण्याची ईर्षा असते. त्यातून त्यांना स्वत:ची शक्ती आणि क्षमता आजमावण्याची संधी हवी असते. ऑफिसचे काम अधिक कुशलतेने चालण्याकरीता ते मधून मधून काही सूचनाही करीत.
या दोन वर्गातील कर्माच्यार्यांच्या मुलाखतीसंबंधीचा दृष्टिकोनाही निरनिराळ्या प्रकारचा असे. ‘ब’ वर्गातल्या कर्माच्यार्यांना ही मुलाखत म्हणजे केवळ नाटके वाटे. पण ‘अ’ वर्गातले कर्मचारी या पध्दतीची प्रशंसा करीत. या पध्दतीमुळेच कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये दळणवळण राहते आणि व्यवस्थापनाला कर्माच्यार्यांचा दृष्टिकोन आणि कर्माच्यार्यांना व्यवस्थापनाचा दृष्टिकोन समजून घेता येतो असे त्यांना वाटे.
अशा मोकळ्या वातावरणात घेतलेल्या अनौपचारिक मुलाखतीमुळे खालच्या स्तरातील कर्माच्यार्यांच्या बढतीसंबंधीचे निर्णय घेणे सोपे जाई.
सगळा आधार वरच्या अधिका-यांच्या दृष्टिकोनावर!
बढतीची अशा प्रकारची पध्दती ठरविण्याचे कारण ? एक गोष्ट अशी की, वरच्या अधिका-याचा आपल्या कामाच्या बाबतीत जो दृष्टिकोन त्यांच्या हाताखाली काम करण्यार्या इतर कर्मचा-यांचा असायला पाहिजे. वरचे अधिकारी जर आपल्या कामाचा वंâटाळा करीत असतील तर त्याचे पडसाद त्यांच्या हाताखालच्या माणसांरवरही पडल्याशिवाय राहणार नाहीत. वरचे अधिकारी जर आपल्या कामात चोख असतील तर त्यांच्या हाताखालच्या कर्मचार्यांनाही आपल्या कामात चोख राहण्याशिवाय गत्यंतर नाही. वरचे लोक जर कामचुकार असतील तर खालचे लोकही कामचुकारच होणार. वरच्या अधिकार्यांप्रमाणेच खालच्या लोकांचे वळण राहणार.
हे सर्व समजणे कठीण नाही. गांधीजी जेव्हा अखिल भारताचे नेते होते, तेव्हा त्यांच्या सरळ आणि सच्चेपणाने वागण्याचे पडसाद भारतातील सर्व लोकांवर पडत होते. त्यामुळे त्यांना लोकांना खास असे काही (स्वराज्य मिळवून देण्याच्या वचनाखेरीज) द्यावे लागत नव्हते. त्यांच्या एका हाकेसरशी हजारो लोक सत्यग्रहात सामील होत असत आणि अहिंसेच्या तत्त्वाप्रमाणे वागत असत. स्वत: लालबहादूर शास्त्रींनी लोकांना आवाहन केले होते, ‘दर सोमवारी एकवेळ भात खायचे सोडून द्या.’ त्यांच्या त्या हाकेला बहुसंख्य लोकांनी ‘ओ’ दिली आणि जे कायद्याने किवा दुसर्या कोणत्या मार्गाने करता आले नसते, ते त्यांच्या एका शब्दाने केले. हजारो लोकांनी सोमवारी एकवेळ भात खायचे सोडून दिले. त्यांनतर जे नेते आले त्या बहुतेकांत स्वार्थत्यागाची प्रवृत्ती नसल्यामुळे त्यांच्या सांगण्याचा परिणाम लोकांवर फारसा दिसून आला नाही हे आपल्याला माहीत आहेच.