सफलतेचा जन्मही मानवी मनातून होत असतो.
सफलतेचा जन्म मानवी मनातूनच होत असतो. निष्फलतेचा जन्मही तेथेच होतो. जो नेहमी सफलतेचाच विचार करीत असतो त्याला सफलता मिळतेच. ज्यांना निष्फलतेचाच विचार करायची सवय असते, ते आपल्या कामातही निष्फलच होतात.
सफलतेचा विचार कोण करतात ? ज्यांची स्वत:वर श्रध्दा असते ते जे आपल्या श्रध्देचे परिवर्तन महत्त्वाकांक्षेत घडवून आणतात ते. ‘मी सफल होईनच’, असे मानणारा, ज्या क्षणी तो तसे मानण्याची सुरुवात करतो त्या क्षणीच आपल्या सफलतेचे बी पेरीत असतो. बाभळीचे बी पेरणारल्या बाभूळच मिळते आणि आंब्याचे बी / रोप पेरणारल्या आंबा मिळतो, या न्यायाने सफलतेचे पेरणारल्या तो सफल होईल की नाही, असा प्रश्नच पडत नाही. पुढे त्याला बीतून येणार्या रोपट्याला पोषण करायचे असते. त्याकरीता लागणारी शक्ती त्याला त्याच्या महत्त्वाकांक्षेतून मिळत असते. तिच्यातून त्याला क्षमता आणि चैतन्य सापडते. ‘मी सफल होणारच’ असे जेव्हा तुम्ही मानता तेव्हा आपोआपच तुमची बुध्दी ‘कशारीतीने सफल व्हायचे’ या दिशेने काम करु लागते. तुमची महत्त्वाकांक्षा तुमच्या मनाला कधी आळस करु देतच नाही. ती तुम्हांला सतत सफलतेचा मार्ग शोधून काढण्याच्या कामात गुंतवले. माणसाचे विचारच त्याला सफल होण्याच्या मार्गाकडे घेऊन जातात, या विषयी तुम्हांला अजूनही थोडी शंका असेल तर त्या बाबतीत पुरावा दाखविणारी काही उदाहरणे आपण पाहू.
त्या आजारी माणसात नवे बळ आले कुठून?
काही वर्षांपूर्वी एका आजारी मनुष्याची गोष्ट माझ्या वाचण्यात आली. मनातून त्याला वाटे की, आपण खूप अशक्त झालो आहोत. उठण्या - बसण्याचीही पंचाईत झाली आहे. बस! हाच एक विचार त्याच्या मनात घर करुन राहिला. त्याचा परिणाम काय झाला ? तो मनुष्य चोवीस तास अंथरुणातच पडून राहू लागला. आपण आजारी आहोत, अशक्त आहोत, या विचाराने त्याला इतके घेरले की शौच, लघवी वगैरे क्रिया अंथरुणातच करण्याचा तो आग्रह धरु लागला. कोणी त्याला भेटायला आले की, सदा आपल्या अशक्तपणाचेच रडगाणे तो गायचा, अंथरुण सोडण्याची त्याची कधी तयारीच नव्हती. आपल्या आजारावर एक दोन डॉक्टरांची, एका वैद्याची औषधेही त्याने घेऊन पाहिली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर त्याचा एक स्नेही त्याला एकदा भेटायला आला. आजर्याचे मन तो स्नेही बरोबर जाणत होता. तसा तो खास काही बोलला नाही, पण तिसNया दिवशी तो पुन्हा आपल्या आजारी मित्राकडे आला, आणि खिशातून एक रबराचा साप काढून हळूच तो त्या आजारी मित्राच्या बिछान्याजवळ त्याने ठेवला. लगेच त्याने बोंबाबोंब केली, ‘साप-साप!’ मग काय झाले त्याची तुम्ही कल्पना करु शकता का? त्या आजारी मनुष्याला मरण नको होते, पण सतत तो आपल्या आजाराचाच विचार करीत होता. त्यामुळे अंथरुणातच उठून बसण्याइतकीही त्याला शक्ती वाटत नव्हती. ही सर्व त्याच्या मनाचीच स्थिती होती. पण जेव्हा ‘साप-साप’ अशी बोंब त्याच्या कानावर पडली आणि प्रत्यक्ष (रबराचा) सापच जेव्हा त्याच्या नजरेस पडला तेव्हा आपले आजारपण तो कुठल्याकुठे विसरुन गेला. त्याच्या मनात एकच विचार आला, ‘सापापासून आपला बचाव करायचा’ त्या विचाराबरोबरच, ‘काय केले म्हणजे सापापासून आपला बचाव करता येईल?’ हाही विचार विजेच्या वेगाने त्याच्या मनात चमवूâन गेला आणि एका दमात त्याने आपल्या बिछान्याबाहेर उडी मारली आणि शेजारच्या खोलीत तो पळाला. ज्या मनुष्याला अंथरुणात उठून बसणेही मुश्कील वाटत होते, त्याच्यात बिछान्याबाहेर उडी मारण्याची शक्ती आली कुठून? त्या शक्तीचे मूळ कशात होते? मनात की दुसNया कशात? आपल्या आजाराचाच तो तेव्हा विचार करीत होता तेव्हा आपण अंथरुणात उठून बसू शवूâ असेही त्याला वाटत नव्हते. जेव्हा स्वत:चा जीव वाचवायचा विचार त्याच्या मनात आला आणि तो कशा रीतीने वाचवायचा त्याची कल्पना जेव्हा त्याच्या मनात आली, तेव्हा त्या विचाराबरोबर आणि कल्पनेबरोबरच त्याच्यात चेतना आणि शक्ती निर्माण झाली. अशा रितीने पूर्वी म्हटल्याप्रमाणे सफलतेचा विचार करणार्यालाच सफल होण्याची क्लुप्ती सुचते आणि निष्फलतेचा विचार करणार्यालाच आपल्या निष्फलतेबद्दल काहीतरी निमित्त किवा कारण सांगण्याचे विचार सुचतात. ज्या मनुष्याला स्वत:च्या सफलतेविषयी शंका वाटते त्याच्या वाट्याला सफलता कधीच येत नाही. कारण सफलतेकरीता लागणारा प्रयत्नच तो करीत नसतो. सफलतेचा विचार करण्याऐवजी निष्फलतेचे निमित्त कारणे तो शोधीत बसतो.