प्रकृतीचे रडगाणे गाऊ नका.

Adv.Saurabh Rajput
0


https://saurabhrajput01.blogspot.com/



प्रकृतीचे रडगाणे गाऊ नका

 

कित्येक लोकांच्या बाबतीत त्यांची नाजुक आणि नादुरुस्त प्रकृती इतकी आड येते की, अगदी सामान्य गोष्टीही करायला आपण लायक नाही, असेच त्यांना वाटत असते. ते स्वत:च्या मनाशी आणि दुस-यांशीही असे बोलतात, ‘पण माझी तब्येतच ठीक नसते ना!‘ ‘का कोण जाणे, शरीरात काहीतरी बिघाड झालाय असे वाटते‘, ‘पाहिल्यासारखी आता माझी आता माझी तब्येत नाही’, ‘तब्येत जर सुधारली तर एक नाही हजार कामे मी करीन.’ ही समजूत स्वत:च्या जबाबदारीच्या आणि कामाच्या आड असे धरीत आहोत. आपल्या प्रगतीला तो निकालातच काढतो. तब्येतीचे कारण आपण अनेक गोष्टींत सांगू शकतो. पण ते योग्य असते का? यशस्वी माणसांना तशी कारणे सांगता येणार नाहीत असे नाही. पण तशा कारणांना ते आपल्या जबाबदारीच्या विंâवा कामाच्या आड येऊ देत नाहीत. स्वत:च्या ध्येयाच्या मार्गावर असतांना, स्वत:च्या तब्येतीचा शुल्लक विचार ते आपल्या मनात येऊ देत नाहीत. त्यांचे सर्व लक्ष सफलता मिळविण्याकडे असते. १९३८ साली एका गावात ‘इण्डियन नॅशनल काँग्रेस’चे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनाचे सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष होते. अधिवेशनाच्या अगदी ऐनवेळी त्यांना तापाने घेरले. त्यांना तसेच वाटले असते तर ‘माझी तब्येत ठीक नाही’ असे सांगून अधिवेशनामध्ये हजर राहण्याचे टाळता आले असते. पण अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या कामात त्यांनी भाग घेतला, आणि चार डिग्री ताप असतांनाही स्वत:चे भाषण स्वत:च करण्याचा त्यांनी आग्रह धरला. त्यांचा उत्साह इतका दांडगा होता की डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवून त्यांनी भाषण स्वत:च केले.


एकदा एक डॉक्टर माझ्याशी बोलतांना म्हणाला, ‘‘कोणताही मनुष्य अगदी शंभर टक्के तंदुरुस्त आहे असे कधी होत नाही. प्रत्येकाच्या शरीरात लहान मोठ्या प्रमाणात काहीना काही तरी दोष असतोच. केव्हाना केव्हातरी त्याच्या शरीरात दु:ख निर्माण होतेच. काही वेळेला नैसर्गिकरित्या ते घालविण्याकडे त्याच्या शरीराची हालचाल होते. दातांत काही कण अडकला तर तो काढून लावण्याकरीता जीभ आटोकाट प्रयत्न करीत असते. अशी लहान सहान दु:खे येतात आणि निघूनही जातात. त्यांची क्वचितच दखल घेतली जाते. या बाबतीत त्या त्या मनुष्याच्या वृत्तीवर सर्व अवलंबून असते.


अशी एक दंतकथा आहे. मलेरियाच्या तापाला यमदेव एकदा म्हणाला, ‘‘मला दोन हजार मृत्यू पाहिजेत. तेव्हा दोन हजार माणसांच्या शरीरात तू प्रवेश कर आणि त्यांना इकडे घेऊन ये.’’ पण झाले असे की, दोन हजारांऐवजी बावीस हजार माणसे मृत्युमुखी पाडून यमाकडे आली. यमाने मलेरियाला त्याबद्दल ठपका दिला. तेव्हा मलेरिया यमाला म्हणाला, ‘‘मी फक्त दोन हजार माणसांच्या शरीरात दाखल झालो. पण बाकीची वीस हजार माणसे ‘मला मलेरिया झाला नसेल ना ?’ या भीतीने पछाडली गेली आणि मेली. ती माझ्यामुळे नाही मेली; त्यांच्यातल्या भीतीमुळे मेली. यात माझा काहीच दोष नाही.’’ अर्थात गोष्ट केवळ काल्पनिक आहे. पण त्यात एक मोठे सत्य दडलेले आहे. सुदृढ मनुष्याने जरी मानले की, त्याची तब्येत ठीक नाही तरी रोगाशिवाय तो आजारी पडू शकेल. आणि त्याच्यात त्या त्या रोगाची सर्व चिन्हे दिसायला वेळ लागणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)