टीकांमधून कधी कधी फायदाही होतो !

Adv.Saurabh Rajput
0

 

टीकांमधून कधी कधी फायदाही होतो !


टीकांमधून कधी कधी फायदाही होतो !


अर्थात काही टीकांमधून आपल्याला काही शिकायचे असते. सर्वच टीका दुस-यांच्या हेव्यामुळे विंâवा अपयशामुळे होते असेही नाही. कमळाच्या पानावर पाणी ठरत नाही. तुमच्यावर होणार्‍या हतोत्साह टीकेच्या बाबतीतही तुम्ही कमळाच्या पानाप्रमाणे असले पाहिजे. टीका कोणालाही आवडत नाही किवा रुचत नाही. पण कधी कधी आपले वर्तन चुकीचे असते विंâवा आपण एखादी चूक करुन बसतो. अशा वेळी जर आपल्यावर टीका झाली तर ती स्विकारण्याची आपल्याला तयारी ठेवावी लागते.


जीवनात आपण जसजसे पुढे जात असतो, तसतशा लोकांच्या आपल्याविषयी अपेक्षा वाढत जातात. नुसत्या अपेक्षाच नाही, टीकापण. त्यामुळे टीकेविषयी आपला निकोप दृष्टिकोन असणे आपल्या सफलतेच्या दृष्टीने आवश्यक असते. पुढे दिलेले म्हणणे कोणाचे आहे ते मला आठवत नाही, पर बहुतकरुन ते आईनस्टाईनचे असावे. तो म्हणतो, ‘‘मला तुम्ही असे सांगू नका की, मी जे करतो ते सर्व बरोबर असते. ते सर्व मी जाणतो आणि समजतोही. पण मला जी आवश्यकता वाटते ती कोणीतरी माझी चूक मला समजून सांगावी त्याची.’’ आईनस्टाईन हा जगातला एक महान शास्त्रज्ञ होता. आपण त्याच्याहीपेक्षा वरचढ आहोत असे मानण्याची कोणी हिंमत करील अशी शक्यता नव्हती. तरीपण आईनस्टाईनसारखा पुरुष, ‘माझे डोळे उघडण्याची तुम्हांला जरुर वाटली तर तसे मला अवश्य सांगा’ असे सांगायला कचरत नव्हता.


ऑफिसमधल्या एखाद्या कर्माच्यार्‍याच्या हातून काही चूक झाली आणि आपल्या चुकीबद्दल स्वत:चा बचाव न करता तो जर आपल्या वरच्या अधिकार्‍याची टीका एकूण  घेईन तर त्यावरुन असे समजण्यास काही हरकत नाही, त्याने स्वत:ची चूक मान्य केली आहे. त्यामुळे तशा प्रकारची चूक पुन्हा त्याच्या हातून होणार नाही. तो स्वत: सुधारु इच्छितो आणि वरची पायरीच चढण्याची संधी त्याच्याकडे चालून येण्याचा संभव खूपच वाढतो. वरच्या जागेवर कुणाची शिफारस करण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्याच्या वरचा अधिकारी कोणाची निवड करतो? जो आपल्यावर झालेल्या टीकेचा आनंदाने स्विकार करुन स्वत: सुधारु इच्छितो त्याची की आपल्यावरच्या टीकेला आपला वैमनस्याचे बनवितो त्याची?


आपण आईनस्टाईच्या बाबतीत पाहिले त्याप्रमाणे काही लोक आपल्यावरील टीकेचे स्वागत करतात; ते ठीक. पण काही लोक आपल्या टीकेला आमंत्रण देतात आणि तरीपण आपली प्रशंसा व्हावी अशीच मनातून इच्छा धरतात. ही वृत्तीपण चांगली नाही. मागायचे एक आणि त्यामागचा हेतू मात्र अगदी निराळा. या बाबतीत पंडित जवाहरलाल नेहरु एकदा जे म्हणाले होते ते लक्षात घेण्यासारखे आहे. ते म्हणाले होते, कोणी व्यक्ती कितीही जरी मोठी असली तरी ती टीकापात्र नाही असे समजू नये.


अमेरिकेत फ्रॅंकलिन रुझवेल्ट नावाचा अध्यक्ष होऊन गेला. त्याच्या पत्नी एलिनॉर रुझवेल्टने आपले अनुभव एका पुस्तकात दिले आहेत. अमेरिकेत ‘प्रथम सन्नारीचे’ स्थान असणार्‍या या बाईने टीकेविषयी खूप चांगले लिहिले आहे; ती लिहिते, ‘नवनवीन अनुभव घेण्याची इच्छा आणि धाडसी वृत्ती या गोष्टींची माझ्या जीवनात सर्वात अधिक मदत झाली आहे. दुस-यांना काय वाटेल ? ते काय म्हणतील ? या गोष्टीची पूर्वी मला भीती वाटे. पण समग्र जीवनाचा आस्वाद घेण्याची आणि नवनवीन अनुभव घेण्याची माझी वृत्ती इतकी तीव्र होती की, दुसर्‍यांच्या टीकेची किवा अनुमतीची पर्वा न करता माझे पाऊल सदा पुढेच पडत गेले. त्याचा परिणाम असा झाला की, हळूहळू स्वतंत्रतेची आणि आत्मविश्वासाची भावना माझ्या ठिकाणी जागृत झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)