चांगले व आनंदी जीवन जगण्यासाठी काही चांगल्या सवयी.

Adv.Saurabh Rajput
0


चांगले व आनंदी जीवन जगण्यासाठी काही चांगल्या सवयी.


या चांगल्या सवयी आपण आपल्या जीवनात चालू केल्यास आपल्याला त्याचा नक्कीच फयदा होईल.


एका वेळेस एकच गोष्ट करा

कोणतीही गोष्ट मन लावून करा. उत्तमप्रकारे करा. कामामुळे मिळणा-या समाधानाची प्रचिती घ्या. नंतरच दुसरे काम हाती घ्या. एकावेळी अनेक जबाबदारींचे काम संगणक करु शकेल; परंतू मानवाला अद्याप त्यात यश मिळवावयचे आहे. निष्काळजीपणामुळे चुका होतात. अविश्वसनीय कार्य-क्षमता प्रकट होते. त्यामुळे डोळेझाक करणे, हे तर सर्वात वाईट होय, हा काही योग्य मार्ग नाही. तुम्ही जे काम करता, ते एकलव्याच्या एकाग्रतेने करा. त्यासाठी पुरेसा वेळ काढा; व येणा-या अनुभवाचा आनंद उपभोग घ्या.


रोज टाकाऊ वस्तू  फेकून द्या

तुमच्या घरात अनेक टाकाऊ, अडगळीच्या वस्तू असतात, घराप्रमाणे कार्यालयात, दुकानात अशा टाकाऊ वस्तू असतात. अशा टाकाऊ, निरर्थक वस्तू घरातील, कार्यालयातील जागा अडवतात, त्यामुळे आवश्यक वस्तूंना पुरेशी जागा मिळत नाही. अशा टाकाऊ वस्तूंचा मोह बाळगू नका. वास्तववादी बना. जर तुम्ही अशा वस्तूंचा वापर करीत नसाल, तर त्या टावूâन द्या. दररोज अनावश्यक, निरुपयोगी वस्तू शोधा व पेâवूâन द्या. विंâवा ज्याला त्याचा उपयोग असेल, त्याला देऊन टाका. त्यामुळे घरात मोकळी जागा वाढेल, तुमचे मन प्रसन्न होईल, जीवन सुखी होईल.


छोटे स्नेहमेळावे घ्या

मोठ्या पाट्र्या या खर्चिक आणि वेळ खाऊ असतात. त्यात कामांचा ताणही भरपूर पडतो. इतकेच नव्हे तर, जर तुम्ही प्रत्येकाशी बोलू शकत असला तरी प्रत्येकाशी केवळ औपचारिक त्रोटक बोलणे होऊ शकेल. लहानलहान पाट्र्या आयोजित करणे सोपे असते, कमी खर्चाचे असते व कामाचा ताणही पडत नाही. परिणामी तुम्ही आलेल्या मोजक्या पाहूण्यांशी दिलखुलासपणे गप्पा मारु शकता. कमीत कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त वेळा समरस व्हा म्हणजे मन प्रसन्न होईल मोठ्या पाट्र्या आयोजित करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच होय.


कृपया, पुरेशी झोप घ्या

तुम्ही झोपेला फसवू शकत नाही. तुम्हाला विश्रांती मिळाली नाही, तर त्याची विंâमत तुम्हाला मोजावी लागते. तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. डोळे पेंगुळतात, स्वभाव चिडचिडा बनतो. अशावेळी झोपेचे कर्ज तुम्हाला सव्याज पेâडावेच लागते. रात्री लवकर झोपा व सकाळी लवकर उठा. सर्वसाधारणपणे आठ तासांची झोप मनुष्याला पुरेशी होते. आठ तास झोपून उठल्यावर ताजेतवाने होऊन नव्याने कामाला लागा. तुमच्या अंगात उत्साह संचारेल.


जीवनात हळूहळू बदल करा

आहार अचानक कमी करु नका. कोणतेही काम, कामाचे नियोजन तडकाफडकी करु नका. तुमच्या स्वभावात अमुलाग्र बदल करु नका. तुम्ही कशाप्रकारे अचानक केलेला बदल काही काळ टिकवू शकाल, पण तो बदल दीर्घकाळ टिकू  शकणार नाही. खरा बदल हा अगदी छोट्या प्रमाणात व विचारपूर्वक केलेला असतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा म्हणजे नंतर विचार करण्याची, पश्चातापाची पाळी येणार नाही. तुम्हाला त्रास होणार नाही परिणामी तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकेल. कोणतीही कृती घाईने न करता अधिकारपदावर टिवूâन राहण्याचे कौशल्य आत्मसात करा. ‘अति घाई, मसणात जाई’ अशी मराठीत म्हण आहे, त्यात खूप तथ्य आहे.


जबाबदार व्यक्तींवर जबाबदारी सोपवा

एखादे काम व्यवस्थित न करणे, कामात दिरंगाई विंâवा टाळाटाळ करणे यासाठी लंगड्या सबबी सांगण्यात काही जण तरबेज असतात. या उलट असेही लोक असतात, की जे कोणतेही काम करतांना स्वत:ला झोवूâन देतात, कार्यक्षमपणे व कौशल्य पणाला लावून काम करतात. हा काही नशीबाचा भाग नसतो तर अंगावर टाकलेल्या जबाबदारीचा असतो, जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते. तुमच्या मुलांची, घराची, इतर महत्त्वाच्या जबाबदारी तुम्ही कोणावर सोपवाल? नेहमी पराभूत मनोवृत्ती झटवूâन टाका व विजेत्याची साथ घ्या.


जगाचे ओझे खांद्यावर घेऊ नका

या जगात आपल्याला नैराश्येच्या गर्तेत दररोज लोटणारी गुन्हेगारी, उपासमार, बेकारी, भ्रष्टाचार भरपूर प्रमाणात आढळतो. अशा या जगात बदल घडवून आणण्यासाठी आपल्यापैकी काहीजण एकेकटे प्रयत्न करतील असे समजू नका उलट आपल्यापैकी प्रत्येकजण स्वत:च्या जीवनापासून भरपूर काही करावे लागते. इतराशी प्रेमाने वागावे लागा, त्याच्या भावना समजून घ्या या कार्यास स्वत:पासून, स्वत:च्या घरापासून प्रारंभ करा. आणि मग काय होते ते पाहा. जगात लक्षणिय बदल झालेला आढळेल. जेव्हा प्रत्येकजण यासाठी आपापले योगदान देईल त्यावेळी जगात बदल झाल्याचे सूचित होईल. यासाठी स्थानिक समस्यावर लक्ष वेंâद्रित करावे.


सुडौल बांधा ठेवा

‘वेळ नाही’ ही अंगडी सबब व्यायामाला चालत नाही. या उलट तुम्ही तुमच्या शरीराचा बांधा सुडौल राखल्यास तुमची शारिरीक व मानसिक क्षमता इतकी वाढेल की, तुम्हाला व्यायामासाठी काढलेल्या वेळेचा फायदाच होईल; तुम्ही तुमचे जीवन अधिक आनंदाने उपभोगू शकाल. नियमित व्यायामाबरोबरच तुम्ही सकस आहाराची सवय ठेवल्यास तुम्ही अधिक निरोगी व उत्साही व्हाल. शरीरिक दुर्बलतेमुळे तुम्ही कुटूंबाकडे दुर्लक्ष करु लागला तर तुमचा मानसिक ताण अधिक वाढेल. म्हणून तंदुरुस्त राहा.


बोलत रहा

ते काय बोलतात, हे तुम्हाला माहीत नाही? मग त्यांना विचारा. ते काय बोलतात, त्याला मान डोलावू नका. तुम्ही त्यावर बोला. तुमचेही मत त्यांच्या इतकेच योग्य असू शकते. फक्त मुर्खासारखे प्रश्न विचारु नका. लोक अनेकदा असे गृहीत धरतात की, ते जे काही करतात त्याची पूर्वकल्पना इतरांनाही आहे. ही त्यांची चूक आहे, तुमची नाही. म्हणून ते जेव्हा असंबध्द बडबडतात, त्यावेळी त्यांना प्रतिवाद करा; त्यांच्या विधानाचे खंडन करा, त्यांना योग्य काय ते सांगा. मुलभूत व अचूक प्रश्न विचारा. विचारांना चालना द्या.


निरर्थक वेळेच्या मर्यादा काढून टाका

आपले जीवन अशा वेळेच्या निरर्थक मर्यादेने व्यापलेले आहे. आपण स्वत:वर आणि इतरांवर वेळेचे बंधन घालतो. अशामुळे फक्त मानसिक ताण वाढू शकतो अगदी संयुक्तीक कारणाचा अपवाद सोडला तर तुम्ही प्रत्येक कृतीला वेळेच्या चौकटीत बध्द करु नका. विशेषत: एखाद्या कामास किती वेळ लागू शकेल याचा अंदाज तुम्हाला असेल तर वेळेचे बंधन लादू नका. त्याऐवजी, हाती घेतलेला प्रकल्प काळजीपूर्वक पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवा. असा प्रकल्प व्यावसायिक दृष्टी ठेवून, अत्यंत समाधानकारकरित्या पूर्ण करा, दुसNया शब्दात सांगायचे झाल्यास, असे म्हणता येईल की, जोपर्यंत योग्यपध्दतीने काम होत नाही तोपर्यंत करा. तुमचा उत्साह टिकवून ठेवा. उतावीळपणा करु नका.


मुले एकत्रित खेळत नसतील तर त्यांना स्वतंत्रपणे खेळू द्या

मुले आपापसात भांडत असतील तर तुम्ही त्यांच्यावर किती वेळा रागावणार? तुम्ही फक्त एकदाच रागवू शकता. त्यानंतर ही ते भांडू लागली तर त्यांना एक एकटे खेळू द्या. भांडणावर तोडगा निघेपर्यंत त्यांना परस्परात मिसळू देऊ नका. त्यामुळे त्यांना परस्परांबद्दल ओढ निर्माण होईल. व तुम्हाला अपेक्षित परिणाम साधता येईल. मुले जेव्हा भांडतात ‘फोडा व विजयी व्हा’ हे तत्त्व अंमलात आणा.


जीवनाला रहाटगाडे समजू नका

जीवन रहाटगाडे समजल्यास तुमचे जीवन वंâटाळवाणे, नीरस व चाकोरीबध्द होईल. प्रत्यक्षात हे जीवन तसे नाही. त्याऐवजी जीवनाकडे भविष्याचा वेध घेत सरळ पाहा. जीवनात अशा काही घटना घडतात की, ज्या पूर्वी कधीही घडल्या नव्हत्या. इतकेच नव्हे तर सुट्टीचा दिवस, पारंपारिक सणाचे दिवस तुम्हाला ताजेतवाने करतात, मन प्रसन्न करतात. जीवनाकडे पाहण्याची पूर्वग्रहदूषित दृष्टी काढून टाका. जीवन हे वैविध्यपूर्ण आहे. त्याच्या अनेक छटा आहेत. जीवनात तुम्ही जितका रस घ्याल, तितकी तुम्हाला त्याची आसक्ती वाढेल. तुम्ही आनंदी व्हाल. सुखी व्हाल.


इतरांच्या वेगळ्या विचारांचा आदर बाळगा

तुमच्या दृष्टिकोनातून इतरांवर मात करण्याचा प्रयत्न तुम्ही तुमचे आयुष्य खर्च करता. पण सत्य हे आहे की, तुम्हाला त्यात यश मिळत नाही. किमान प्रत्येकाच्या बाबतीत तरी नाही. इतकेच नव्हे तर, जरी तुम्ही अगदी तर्वâसंगत युक्तीवाद केला तरी काही लोकांना तुमचे विचार पटणार नाहीत. कदाचित त्यांना गर्व असेल, ते मूख असतील विंâवा काही प्रसंगी तुम्ही विचार करायचे थांबवणार का? एकदम बदला जा प्रयत्न करण्यात वेळ खर्च करु नका त्या ऐवजी, त्याच्या बरोबरीने काम करा, त्यांच्यासोबत राहा. आणि या जगात सगळेच तुमच्यासारखे लोक नाहीत याबद्दल परमेश्वराचे आभार माना.


वारंवार विश्रांती घ्या

कंटाळवाण्या कष्टाच्या कामात आनंद नसतो. त्यामुळे मनाला प्रसन्नता प्राप्त होत नाही की समाधानही मिळत नाही. अशा कष्टाच्या कामाचे अनेक लहान-लहान भाग पाडा. थोडे थांबा व त्या कामपासून काही दिवस दूर रहा. या काळात इतर कामात स्वत:ला गुंतवून ठेवा नंतर कष्टाच्या कामाकडे वळा. असे तुम्ही ज्या ज्या वेळी कराल, त्या प्रत्येकवेळी तुम्हाला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल. उत्साह द्विगुणीत झाल्याचे जाणवेल. आणि तुमच्या लक्षात येण्यापूर्वीच तुमचे काम संपलेले असेल म्हणजे काम केव्हा संपले, हे तुम्हालाही कळणार नाही.


सज्ज रहा, तयार रहा

परिपूर्ण तयारी करण्यासारखे दुसरे यश नाही. तयारी केल्याने तुमची कार्यक्षमता वाढते, तुमचा आत्मविश्वास अधिक वाढतो. इतकेच नव्हे तर अनपेक्षित घटनांना तोंड देण्याची ही तयारी ठेवा, म्हणजे तुम्ही त्याच्याशी अधिक समर्थपणे मुकाबला करा. सर्वसाधारणपणे लोक तयार नसल्याने, सज्ज नसल्याने अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाते, तुम्हाला तुमचे आयुष्य भरकटत जावे असे वाटते का? नाही ना? मग कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी पूर्ण नियोजन करा. तरच तुम्हाला काम केल्याचे समाधान मिळेल.


नको असेल तर खाऊ नका

हॉटेलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पदार्थ वाढले जातात. त्यामुळे तुम्ही पैसे वसूल करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पदार्थ खाता. ज्यांनी आपल्याला हॉटेलमध्ये पार्टी दिली आहे, तो नाराज होऊ नये म्हणून तुम्ही जास्त खाता. डिशमध्ये पदार्थ टाकण्याचा तुम्हाला संकोच वाटतो. कारण काहीही असले तरी तुम्ही प्रमाणाबाहेर खाता हे स्पष्ट होते, त्यामुळे अपचन होते. अनावश्यक वॅâलरीज वाढतात. हे टाळण्यासाठी भूकेपेक्षा चार घास कमी खावे, अति खाण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.


योग्य वस्तू योग्य ठिकाणी ठेवा

कपड्याचा साबण बैठकीच्या खोलीत व फ्लॉवर पॉट स्वयंपाक घरात ठेवू नका. विंâवा गॅस लायटर टिव्हीजवळ आणि बॉलपेन, वृत्तपत्रे बाथरुममध्ये ठेवू नका, त्यामुळे वेळेस या वस्तू सापडत नाहीत परिणामी मनस्ताप होतो, कोणती वस्तू कोठे ठेवली याचेही विस्मरण होते. त्यामुळे शोधाशोध करण्याचे काम वाढते. चीड-चीड होते. योग्य ठिकाणी वस्तू ठेऊन तुम्ही हे टाळू शकता.


चालणे आवश्यक

चालण्यासारखा दुसरा कोणताही उत्तम व्यायाम नाही. चालण्याला पैसे पडत नाहीत. अगदी सहज, सुलभ असा हा व्यायाम प्रकार आहे. पहाटे फिरण्याची वेळ सर्वात चांगली असते. त्यामुळे शुध्द हवा मिळते. चालण्यामुळे रक्ताभिसरण घडते. दिवसभर माणूस उत्साही राहतो. मन प्रसन्न राहते. मन प्रसन्न राहिल्यामुळे मानसिक तणाव राहात नाही. ज्यांना पहाटे फिरायला जमत नसेल त्यांनी सायंकाळी तासभर फिरावे. चालणाNयाचे भाग्य चालते असे म्हटले जाते. मात्र चालण्याच्या बाबतीत आळस करु नये. आळस हा व्यायामाचा शत्रू असतो हे लक्षात ठेवा.


घाईने निर्णय घेऊ नका

जर तुम्हाला खात्री नसेल विंâवा निर्णय घेऊ शकत नसाल तर निर्णय घेऊ नका. अशावेळी बहुसंख्य लोक निर्णय लांबणीवर टाकतात. वस्तुस्थिती पूर्णपणे समजेपर्यंत प्रतीक्षा करा घाईन जर निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकते. विचार करुन निर्णय घ्या, निर्णय घेतल्यावर पश्चाताप करण्याची पाळी येऊ नये याची काळजी घ्यावी. दिवाळीच्या तोंडावर दुकानदार सवलतींची घोषणा करतात. ‘सेल’ लावतात. ‘सेल’ ची मुदत संपेल म्हणून तुम्ही घाईने खरेदी कराल तर पदरी निराशा येईल. ज्याची खात्री नसेल ती गोष्ट मान्य करु नका.


अपेक्षाभंग कसा टाळाल?

माणसाने आशावादी राहावे. स्वत:च्या कार्यक्षमतेबद्दल आत्मविश्वासही बाळगावा. मात्र फाजील आत्मविश्वास बाळगू नये. कारण त्यामुळे अपेक्षाभंग होऊ शकतो. आणि अपेक्षाभंगाचे दु:ख जास्त असते. असा अपेक्षाभंग होऊ नये यासाठी वास्तववादी बना. विसाव्या वर्षी तुम्ही १० मैल पळत असाल तर साठाव्या वर्षीही तितकेच पळू शकाल अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. एखादा विद्यार्थी भरपूर अभ्यास करतो परीक्षेत ९० टक्के मार्वâ पडतील अशी त्याला खात्री असते. प्रत्यक्षात ७० टक्के मार्क्स पडतात व त्याच्या पदरी अपेक्षाभंगाचे दु:ख येते म्हणून वास्तववादी विचार करा. नेहमी नकारात्मक विचार करा म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. अपेक्षा बाळगतांना स्वत:कडे तटस्थपणा पाहण्यास शिका. मूर्खासारखे वागायला तुम्हाला झालंय काय?


जीवनात चमत्कारीक स्थिता येऊ शकते, हे मान्य करा

तुम्ही काहीही काळजीपूर्वक नियोजन केलेले असेल, विंâवा तुम्ही काही गृहीत धरले असेल, तरीही काही वेळा तुम्ही गोंधळून जाता, अस्वस्थ होता. मात्र त्याचे स्पष्टीकरण तुम्ही करु शकत नाही, कदाचित स्पष्टीकरण करण्याची तुमची मनस्थिती नसेल, ग्रहदिशा कारणीभूत असू शकते. विंâवा तुमची शारीरिक क्षमता तितकी नसेल.

काहीही असो, जी चमत्कारिक अवस्था निर्माण झाली असेल ती वस्तुस्थिती म्हणून स्विकार करा. तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे, असे समजा, आणि परिस्थिती पूर्वपदावर येईल यावर विश्वास ठेवा. व तसे घडल्याचेही तुम्हाला अढळेल.

पुरेशी संधी द्या !

आजकाल प्रत्येकाला झटपट निर्णय हवा असतो. आणि आपली मनोवृत्ती ही त्याच पध्दतीने तयार होते. एखादे पुस्तक वाचतांना तत्क्षणी ते आत्मसात व्हावे, असे वाटत असते. जेव्हा तुम्ही शिकत असता विंâवा एखाद्याशी भेटता तेव्हा काही उपयोग होत नाही. म्हणून लगेच त्याचा त्याग करु नका, तसे करण्याने तुमचा तोटा होण्याचीच अधिक शक्यता असते. मात्र तुम्ही त्याला चिकटून राहिल्यास कालांतराने त्याचा तुम्हाला फायदा झाल्याचे आढळून येईल. म्हणून कोणत्याही बाबतीत संयम ठेवा, उतावीळपणा करु नका. कोणत्याही निर्णयाप्रत येण्यापूर्वी त्यावर विचार करण्यास वेळ द्या.


जर सकाळचा वेळ पुरत नसेल तर पहाटे उठा

‘मला सकाळी पुरेसा वेळ मिळत नाही’ अशी तक्रार आपर अनेकवेळा अनेकांच्या तोंडून ऐकतो. अशावेळी वेळ हवा असेल तर सकाळच्या ऐवजी पहाटे उठा म्हणजे अधिक वेळ मिळेल. खाण्यापिण्याला भरपूर वेळ द्या. म्हणजे कोणतेही काम घाईने उरकण्याची गरज पडणार नाही. पहाटे लवकर उठणे शक्य व्हावे, यासाठी लवकर झोपण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे.


सुखाला विलंब नको

लोक आयुष्यभर सुखाची प्रतिक्षा करीत पुâकट वेळ वाया घालवितात. कारण सुख त्यांच्याभोवती असते. जेव्हा शिक्षण पूर्ण करतात, नोकरी मिळाल्यावर लग्न करतात, मुले होतात. बायका व मुलांसाठी घर घेतात व शेवटी निवृत्त होतात. या मार्गाने तुम्ही जाल तर आयुष्यात कधीही सुखी होणार नाही. बाह्य घटनांमधून आनंद मिळण्याची, सुख मिळण्याची अपेक्षा करण्यापेक्षा अंतरंगात दडलेल्या सुखाचा अनुभव घ्या म्हणजे सदैव समाधानी राहाल, सुखी व्हाल.


सर्वकाही समजले पाहिजे असा प्रयत्न करु नका

तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजू शकत नाही. म्हणून तुम्हाला नेमके काय समजणे आवश्यक आहे, त्यावर लक्ष वेंâद्रीत करा. तुमचे आयुष्य सुसह्य, सुखी व उपयुक्त कशामुळे होईल, यावर लक्ष केन्द्रित करा. इतरांना माहिती असलेल्या गोष्टी शिकण्यासाठी मनावर दडपण घेऊ नका. ही काही स्पर्धा नाही. तुम्हाला अशा अनेक गोष्टी माहिती आहेत की, त्या इतरांना माहिती नसतात. तुमची ज्ञानलालसा सतत कायम ठेवा व त्यावरच अधिक लक्ष केन्द्रित करा.


अति पुढाकार घेऊ नका

तुमच्या स्वत:च्या कार्यक्षमतेपेक्षा अधिक काम करु नका. जेवढा वेळ तुम्ही देऊ शकता तेवढाच द्या. स्वयंसेवकाप्रमाणे कोणत्याही बाबतीत पुढाकार घेऊन काम करणे हे केव्हाही चांगले. मात्र कुटूंबाकडे दुर्लक्ष होईल इतका जास्त वेळ कामात गुंतवून घेऊ नका. अन्यथा तुम्ही तुमची कौटूंबिक कर्तव्ये पूर्ण करु शकणार नाही व त्या चुकीबद्दल तुम्हाला कोणी क्षमा करणार नाही. जर कामही तितकेच महात्त्वाचे असेल तर सरळ नकार द्या. कारण तुमच्याइतकी तुमच्या कुटूंबाची उत्तम काळजी कोणीही घेऊ शकणार नाही. तेव्हा कोणत्याही कामात झोवूâन देतांना आपली घरी वाट पाहणारे कोणीतरी आहे हे कायम लक्षात ठेवा.


विघ्नसंतोषी लोकांपासून दूर रहा

प्रत्येक गोष्टीत दोष शोधणारे लोक कोण आहेत, हे तुम्हाला चांगले माहित आहे, की जे तुमच्यावर नेहमी अनिष्ट प्रसंग ओढवू इच्छितात. तुमच्या सुखी जीवनाला ते नेहमी दु:खाच्या डागण्या देत असतात. तुम्हाला सतत नाउमेद करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून तुम्ही संबंध तोडल्याखेरीज, त्यांच्यापासून चार हात नेहमी दूर राहिल्याखेरीज तुम्ही तणावमुक्त जीवन जगू शकणार नाही. असे लोक तुम्हाला सतत खाली ओढण्याचा प्रयत्न करतील. तुमचे जीवन अंध:कारमय करुन सोडतील. त्यांच्याप्रमाणेच तुमचेही जीवन दु:खी करण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांची कोणाला गरज आहे? अशांशी तुम्ही संबंध तोडले नाहीत तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच असे म्हणावे लागेल.


मोठ्या सुट्टीवर जा

सलग ३-४ महिने विंâवा त्यापेक्षा जास्त दिवस तुम्ही काम केले तर तुम्ही सुट्टी घेतली तर वंâपनीत फार मोठी अडचण होईल, काम विस्कळीत होईल, मालाचा पुरवठा व्यवस्थित होणार नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सुट्टीवर गेला विंâवा कायमची नोकरी सोडली तरी वंâपनी बंद पडणार नाही हे लक्षात ठेवा. तुमच्याविना वंâपनीचे काही बिघडणार नाही. म्हणून सलग ५-६ महिने काम करावे लागले तर वातावरण बदलासाठी, मन पुन्हा प्रसन्न होण्यासाठी मोठी सुट्टी घ्या व कौटूंबिक वातावरणात मजेत दिवस घालवा. गरज पडली तर रजा आणखी वाढवा. नैराश्याचे ढग दूर होण्यास हे आवश्यक आहे. तेव्हा सुट्टी न घेण्याचा मूर्खपणा करु नका.


स्थानिक बातम्या वाचू नका

वृत्तपत्रातून दररोज खून, दरोडे, बलात्कार आणि बातम्या प्रसिध्द होतात. स्थानिक पातळीवरील तिखटमीठ लावून रंगविल्या जातात. नको तितक्या भडक दिल्या जातात. अंकाचा खप वाढावा हा त्यामागील एकमेव संकुचित दृष्टिकोन असतो. अशा बातम्या पाहिल्याने वाचल्याने नैराश्य येते, मनात घाबराट निर्माण होते. कोठे बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. तुम्ही स्वत:च्या घरातच नजरवैâदेत पडता. जगाबाबत विपरीत मत बनू लागते. चांगल्या, दिलासा देणाNया बातम्या तुम्हाला क्वचित सापडतील. वाईय बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरले जातात. मग अशा बातम्या वाचायच्या तरी कशाला? पटतंय ना मी सांगतो ते?


रोज किमान ५ सूर्यनमस्कार घाला

शारीरिक तंदुरुस्तीसाठी व दिवसभर मन प्रसन्न राहावे यासाठी रोज सकाळी विंâवा संध्याकाळी सूर्यनमस्कार घालावेत. विंâवा आवडेल तो व्यायाम करावा. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. किमान ५ सूर्यनमस्काराने सुरुवात करावी व ती संख्या हळूहळू वाढवावी. कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुषांना फक्त पाच सूर्यनमस्कार घालणे मुळीच अवघड नाही. मात्र त्यात टाळाटाळ केली तर परिस्थिती अवघड बनू शकते. ५ सूर्यनमस्कारासाठी जेमतेम अडीच मिनिटे लागतात. तेवढा वेळ तुम्ही दिवसभर काढू शकत नाही का?


वामकुक्षी घ्या

आजच्या धकाधकीच्या जीवनात, वामकुक्षीचा चांगला उपयोग होऊ शकतो अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनातून असे सिध्द झाले आहे की, जे लोक दुपारी वामकुक्षी घेतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. जेमतेम २० मिनिटे ते अर्धातासाची झोप तुमच्या जीवनात चमत्कार घडविण्यास पुरेशी असते व वामकुक्षीच्या विपरीत परिणाम तुमच्या रात्रीच्या झोपेवर होत नाही. दुपारी दारे, खिडक्या बंद करुन छानपैकी वामकुक्षी घ्या. म्हणजे त्याचा परिणाम तुम्हाला जाणवू शकेल.


दूरध्वनीवर उत्तर द्यायचे नसेल तर देऊ नका

तुम्हाला कोणाचा फोन आला, तर हातातले काम टावूâन फोन घ्या, जेवतांना फोन आला तर ताटावरुन उठून फोन घ्या, विचारांची तंद्री भंग करुन फोन घ्या, टीव्हीवर चांगली मालिका पाहात असला तरी त्यात व्यत्यय आणून फोन घ्या असा काही नियम नाही. फोन घेण्याची जोपर्यंत तुम्हाला इच्छा नसेल तोपर्यंत मुळीच फोन घेऊ नका. शक्य झाल्यास ‘कॉलर आय.डी.’ ची सुविधा असलेला टेलिफोन घ्या म्हणजे फोन करणारी व्यक्ती कोण आहे, हे तुम्हाला कळेल व त्यावरुन फोनवर बोलायचे की नाही हे ठरविता येईल. फोन घ्यायचा नाही, हे एकदा निश्चित केल्यावर कितीही वेळ फोन वाजत राहिला, तरी त्याची फिकीर करु नका.


गरज नसल्यास खरेदी करु नका

कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वत:ला दोन प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, ‘‘मला खरोखर याची गरज आहे का?’’ आणि दुसरा प्रश्न, ‘‘ही वस्तू खरेदी करणे मी आणखी एक आठवडा, महिनाभर, वर्षभर लांबणीवर टावूâ शकतो का?’’


जर तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असाल, तर कितीतरी वस्तूंची खरेदी करण्यास तुम्ही विलंब केला विंâवा टाळले आहे, हे पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल. त्यापैकी तुम्ही किती पैसे वाचवू शकला हेही तुमच्या लक्षात येईल, व आहे त्याच गोष्टीत तुम्ही कसे मागवू शकला हे कळून येईल.


परिस्थितीवर मात करा

आयुष्यात चढउतार हे प्रत्येकाच्या वाट्याला येतात सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, परंतू त्यामुळे खचून जाऊ नका उलट, हिंमत करुन परिस्थितीवर मात करा. त्यासाठी आत्मविश्वासासारखा दुसरा विश्वासू मित्र नाही. स्वत:मधील आत्मविश्वास कायम जागृत ठेवला पाहिजे. परीक्षेत एकदा नापास झाल्याने सर्व काही संपत नाही. नव्या जिद्दीने परीक्षेला बसल्यास चांगले यश मिळेल. प्रेमभंग झाल्यावर अनेक प्रेमी आत्महत्या करतात. पण तेही चुकीचे आहे. त्या धक्क्यातून स्वत:ला सावरणे अत्यंत आवश्यक असते मला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे, अशी ओढ मनात असली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा तरच तुम्ही परिस्थितीवर मात करु शकेल.


रागाशिवाय वागा

मनाविरुध्द गोष्ट घडली की राग येतो. मुलांनी सांगितलेले काम केले नाही की आई वडील रागावतात, अभ्यास न केल्यास शिक्षक रागावतात, अभ्यास न केल्यास शिक्षक रागवतात, पती वेळेवर घरी न परतल्यास पत्नी रागावते. असे हे रागाच्या विविध छटा आहेत. राग बोलून व्यक्त होतो विंâवा न बोलताही प्रकट होतो. प्रेम, राग या दोन भिन्न प्रकारच्या भावना आहेत. त्याचे प्रकटीकरण होत असतेच. मात्र रागाच्या प्रकटीकरणातून जो रागावतो आणि ज्याच्यावर रागवतो अशा दोघांनाही त्याचा त्रास होतो. ‘अति राग मसणात जाय’ अशी एक म्हण मराठीत रुढ झाली आहे. अतिरागामुळे माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. राग अनावर झाल्यास रक्तदाब वाढू शकतो. म्हणूनच रागाशिवाय वागा.


लोकांशी संपर्क कमी झाल्यास स्वत:ला दोष देऊ नका

वर्षानुवर्षे तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात राहिला त्यांच्याशी संबंध चांगले राहावेत म्हणून प्रयत्न करण्यात आयुष्य खर्च करता. शक्य असेल तर असे करणे चांगलेच आहे. पण ते अनावश्यक व अव्यवहार्य ही आहे, हे लक्षात ठेवा, जे तुमच्यापासून दूर गेले आहेत, ते दुरावले आहेत, ही वस्तुस्थिती स्विकारा, मान्य करा. निश्चितपणे एकेकाळी तुम्ही त्यांचे व ते तुमचे होते. कदाचित भविष्यात तुम्ही पुन्हा एकत्रही याल. कदाचित येणारही नाही. काही असले तरी परस्परांना आठवण तर होईलच, म्हणून कोणी तुमच्यापासून दुरावल्यास त्याबद्दल स्वत:ला दोष देऊ नका, असे घडणे अगदी स्वाभाविक असते.


मासिकांपेक्षा भरपूर पुस्तके वाचा

न्याहरी आणि जेवण यात फरक असतो. न्याहरीने पोटाला आधार मिळतो तर जेवणाने पोट भरते. निरोगी आरोग्याला जेवणच आवश्यक असते. न्याहरीचे काम वृत्तपत्रे व मासिके करतात. त्यात असणारी माहिती अद्ययावत असली तरी त्रोटक असते. त्यामुळे ज्ञानलालसा पूर्ण होत नसल्याने मानसिक समाधान मिळत नाही. या उलट पुस्तके आपल्याला सखोल व तपशीलवार माहिती देतात. आजचे वृत्तपत्र, मासिक उद्या रद्दी होते. पुस्तके ही पिढ्यान् पिढ्या तुमची सोबत करतात. पुस्तकांच्या वाचनाने माणसाची समज वाढते. बौध्दिक पातळी उंचावते, माणसाची उंची एव्हरेस्ट शिखरापेक्षा जास्त वाढते. पुस्तकाच्या वाचनाने माणूस किची उंजी गाठू शकतो हे ज्यांना पाहावयाचे असेल त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन बारकाईने अभ्यासावे.


असलेल्या वस्तू खरेदी करु नका

ज्या वस्तू आधीच आपल्याकडे आहेत, त्या खरेदी करु नये, हे अगदी स्वाभाविक आहे, तथापि आपल्या घरात अनेक वस्तू दोन-दोन असतात. घरात किती वस्तू असतात की ज्याची नावेही आपल्याला माहीत नसतात. म्हणून घराबाहेर शॉपिंगसाठी पडण्यापूर्वी घरात कोणकोणत्या वस्तू आहेत, कोणत्या नाहीत, ज्या नाहीत, त्यापैकी कोणत्या आत्ताच खरेदी करणे आवश्यक आहे, याची खात्री खरावी म्हणजे शॉपींग करतांना वेळ जाणार नाही व अनावश्यक वस्तूंची खरेदी होणार नाही. तसेच ज्या वस्तू खरेदी करण्याचे ठरविले असेल, त्याची यादी करा व त्या विकत आणल्यावर घरात कोठे ठेवायच्या याचाही विचार करा म्हणजे ऐनवेळी गोंधळ होणार नाही असे करण्याने तुमचे पैसे व ऐनवेळी होऊ शकणारा मनस्तापही टळेल.


तुम्हाला काहीतरी करायचंय अशी भावना सतत ठेवू नका

काहीही न करण्यात चुकीचे काही नाही. वास्तविक पाहता, काहीही न करण्यासाठी दिवसाकाठी थोडा वेळ काढण्यातही गैर नाही. काहीही करण्याची वेळ म्हणजे विश्रांतीची वेळ होय. या वेळी मनतील सर्व विचार काढून टाका. मनाची पाटी अक्षरश: कोरी ठेवा. सर्वप्रथम काळजी वाटावयास लागणार्‍या गोष्टी मनातून काढून टाका. त्यामुळे मन ताजेतवाने व प्रसन्न होण्यास मदत होईल. अशावेळी तुम्ही वेगळेच काहीतरी करीत असल्याचे तुम्हाला जाणवेल; तर्क करा बघू काय असेल? तुम्ही घोड्यावर स्वार होऊन जात आहात वेगळाच आनंद मिळेल. मनावर नियंत्रण ठेवण्यास शिकणे अवघड असले तरी तसा प्रयत्न करावा. जगणे म्हणजे काहीतरी करणे नव्हे जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगा.


मेजवानीचा बेत साधा ठेवा

विविध घरगुती समारंभाच्या निमित्ताने आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रांना घरी मेजवानीला अनेकदा बोलावतो ही चांगली गोष्ट आहे. पण अशावेळी नातेवाईक व मित्रावर ‘इम्प्रेशन’ मारण्यासाठी आपण मेजवानीस विविध पदार्थ ठेवतो. असे करुन तुम्ही त्यांना मुर्खात का काढता? मेजवानीस आलेले पाहूणे कोणताही पदार्थ पूर्णपणे संपवित नाहीत. पदार्थांची नासाडी होते. त्यामुळे तुमचे पैसेही वाया जातात व ते पदार्थ करण्यासाठी वेळही अनाठायी खर्च होतो. त्याऐवजी मेजवानीचा साधा बेत ठेवा. तो रुचकर बनवा म्हणजे पाहुणे चवीने खातील. वाया जाणा नाही. परिणामी तुमचा वेळ व पैसा दोन्हीही वाचेल. पदार्थ चवदार होतील याची मात्र काळजी घ्या. त्यामुळे एका मिनिटात अफवा वाNयापेक्षा अधिक वेगाने पसरतात व जेव्हा ती अफवा असल्याचे लक्षात येते, त्यावेळी पश्चाताप करण्याची वेळही निघून गेलेली असते. अशाप्रकारे पश्चाताप  करण्याची पाळी तुमच्यावर येऊ नये असे वाटत असेल तर कोणतीही कृती करण्यापूर्वी दोन्ही बाजूने समजून घ्या.


शब्दसंपत्ती वाढवा

एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसल्यावर माणूस निराश होतो. जेव्हा शब्दाचा अर्थ माहीत नसतो तेव्हा आपण काहीतरी विचार करीत असतो विंâवा दुस-या व्यक्तीस त्याचा अर्थ विचारतो, असे नैराश्य येऊ नये यासाठी दररोज नवीन शब्दाचा अर्थ शिका. केवळ शब्दाचा अर्थ समजणे पुरेसे नाही, तर त्या शब्दाचा उच्चार कसा करायचा, वापर कसा करायचा याचीही माहिती होणे तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आपली शब्द संपत्ती वाढवली तर तुम्हाला झटपट शब्दांचे अर्थ सांगता येतील. तुम्ही त्या शब्दाचा अर्थ सांगू शकाल, त्याचे स्पष्टीकरणही देऊ शकाल.


आठवले की लगेच लिहून काढा

कोणाला भेटायला जायचे असेल, तर त्याचे नांव, हॉटेलमध्ये जायचे असेल तर हॉटेलचे नांव डायरीत लिहून ठेवावे म्हणजे ऐनवेळी विस्मरण झाले तरी आठवण्यात वेळ जात नाही. दिवसभरात आपल्याला जी कामे करायची असतात, त्याचीही नोंद ठेवावी. ऐनवेळेला विस्मरण झाले की, लवकर आठवत नाही. आपल्या ओठावर ज्याला भेटायला जायचे आहे, त्याचे नाव असते पण आठवत नाही, असा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असतो. अशावेळी अवस्था बिकट होते. सर्व काही डोक्यात असूनही ते वेळेवर आपल्याला आठवत नाही. म्हणून आठवता क्षणीच डायरीत लिहून ठेवण्याची सवय लावून घ्या.


चांगले, वापरात नसलेले कपडे गरिबांना देऊन टाका

तुमच्या घरात तुमचे असे अनेक कपडे असतील की, ज्याचा तुम्ही सध्या वापर करीत नाही. तुमची पॅन्ट, शर्ट उंचीला कमी, तंग होत असतील, त्यामुळे तुम्ही ते वापरत नाही, कपडे चांगले असतात, पण आता ते तुमच्या उपयोगीचे नसतात. साड्या, ड्रेस, गाऊन जे तुम्ही वापरत नाही, अशा कपड्यांची गाठोडी म्हणजे एक प्रकारची अडगळ असते. तेव्हा अशा कपड्यांची ज्या गरिबांना खरी गरज आहे, अशांना ते देऊन टाका. त्यामुळे घरातली अडगळ कमी होईल व ज्यांना ते कपडे मिळतील त्यांनाही त्याचा आनंद होईल. घरातल्या अडगळीच्या कपड्यांनी दुसNयाच्या जीवनात आनंद निर्माण होत असेल तर जुन्या कपड्यांना कवटाळू नका.


सावकाश जेवावे

अन्न हे पूर्णब्रह्म आहे. तो एक आनंद देणारा निर्झर आहे. अन्नामुळे तुम्ही तणावमुक्त होता. कुत्रे पाठीमागे लागल्याप्रमाणे घाईने जेवण करुन तुम्ही या आनंदावर विरजण का घालता? नेहमी सावकाश जेवावे. प्रत्येक घास ३२ वेळा चावून खावा, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. घाईघाईत जेवण्याची सवय फक्त मानवात आहे. गाय, म्हैस, बैल हे प्राणी संथपणे रवंथ करीत असतात. सावकाश जेवावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी सावकाश जेवावे, असे आहार तज्ञांचेही मत आहे. लग्नाच्या पंक्तीत म्हणूनच सावकाश जेवण्याचा आग्रह केला जाते, त्या मागेही हेच कारण आहे. कितीही घाई असली तरी जेवतांना घाई करु नये, घाई केली तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. अपचन होते, पोट बिघडते. हे टाळण्यासाठी सावकाश जेवण करीत अन्नाचा आस्वाद घ्यावा.


क्षमाशील व्हा !

दुसरा चुकतो कोठे, यावर टपून बसू नका, प्रत्येकाच्या हातून केव्हा ना केव्हा तरी लहान मोठ्या चुका होतात. ‘चुकतो तोच शिकतो’ हे लक्षात ठेवा. एखादी व्यक्ती चुकली तर त्या क्षणी तुमच्या मनातील भावना व्यक्त करु नका. ‘तुम्ही त्या ठिकाणी असाल तर?’ असा विचार सर्वप्रथम करा. एखादी व्यक्ती चुकली, तर त्याला रागावणे हे फार सोपे असते, पण त्याची चूक, त्याच्या लक्षात आणून देऊन त्याला क्षमा करणे अवघड असते. त्यासाठी माणसाचे मन मोठे असावे लागते. चुका करणाNया माणसावर बोलून जो परिणाम होणार नाही, तो न बोलता, त्याला माफ करुन होतो, हे लक्षात ठेवा. वास्तववादी व्हा.


वाढत्या वयाची चिंता नको

बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि म्हातारपण या सजीवांच्या चार प्रमुख नैसर्गिक अवस्था आहेत. त्यामुळे वृध्दत्व येणे अपरिहार्य असते, त्यामुळे वय वाढल्याने आपण आता वृध्द होऊ लागलो याची चिंता करु नका. चिंता करण्याने वृध्दत्व टळत नाही. वाढत्या वयात तुम्ही किती खाता, किती व्यायाम करता, जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन कसा आहे हे महत्त्वाचे आहे. चिंता करीत बसल्याने केवळ तुमच्या मनातील वृध्दत्वाची भावना अधिक बळावते. तुम्ही काम करा विंâवा करु नका, आमचा दिवस मावळून उद्याचा सूर्योदय होणारच असतो. ही प्रक्रिया तुम्ही थांबवू शकत नाही. येणा-या प्रत्येक क्षणाचा उपयोग कसा करायचा हे तुमच्या हाती असते.


प्रतीक्षा सत्कारणी लावा

प्रतीक्षा करावी लागते म्हणून चिडू नका, संतप्त होऊ नका. तसे केल्यास प्रतीक्षेचा कालावधी आणखी वाढत जात असल्याचे वाटेल. परिणामी तुम्हाला होणारा मनस्ताप आणखी वाढेल. त्या ऐवजी प्रतीक्षेच्या कालावधीचा उपयोग करा. त्यामुळे जेव्हा तुम्ही वाहतूकीच्या कोंडीत अडकता, बससाठी रांगेत उभे राहता, एखाद्याची वाट पाहात असता, तेव्हा ते प्रतीक्षेचे क्षण संधी समजून त्याचा उपयोग करा. ते क्षण अडथळे समजू नका. प्रतीक्षेच्या काळात दिवसभराच्या कामाचे नियोजन करा. सभोवतालच्या जगातील सौंदर्याचे निरीक्षण करा. दुसNया शब्दात सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की, प्रतीक्षेच्या कालावधीचा फायदा करुन घ्या.


स्वत:साठीच पैसे वापरु नका

बहुसंख्य लोक जे कमावतात ते स्वत:वरच, स्वत:च्या कुटूंबियांसाठीच खर्च करतात. आणि असे करणे अगदी स्वाभाविक आहे, मानवी स्वभावास धरुन आहे. परंतू सर्वच पैसे स्वत:साठी खर्च करण्याचा मोह टाळला पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण एक घटक आहोत याचे विस्मरण होता कामा नये. सामाजिक बांधिलकीची जाणिव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि या भावनेतून समाजासाठी आपल्या उत्पन्नातील काही रक्कम खर्च करावी, भूवंâप, महापूर या सारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होते तेव्हा आपण मदतीचा हात पुढे केला पाहिजे. देण्यात आनंद असतो, हे तुम्हाला दिल्याशिवाय कळणार नाही, अनुभवास येणार नाही. म्हणून सर्वच पैसे स्वत:वर खर्च करण्याचा वेडेपणा करु नका.


शिस्तीचा अतिरेक नको

घरातील लहान मुले बेशिस्ताने वागत असतील तर तुम्हाला राग येईपर्यंत प्रतीक्षा करु नका. त्यांची वेळीच कान उघाडणी करा. मुले बेशिस्तपणे वागू लागली तर त्यांना शिक्षा करा. मात्र अशी शिक्षा राग आल्यावर करण्यापेक्षा राग येण्यापूर्वी करा कारण राग येण्यापूर्वी केलेली शिक्षा योग्य ठरते. पण रागाच्या भरात केलेली शिक्षा अनर्थ घडविणारी ठरु शकते. मुले जेव्हा बेशिस्तीने वागतात तेव्हा त्यांना शिक्षा करण्याऐवजी त्यांना प्रथम ताकीद करावी, पुन्हा असे वागल्यास मार मिळेल अशी समजही त्याला द्यावी, म्हणजे पुढच्या वेळेस तो तसे वागणार नाही. शिस्तीमुळे मुलांना कसे वागावे हे शिकायला मिळते. मात्र शिस्तीचा अतिरेक करु नये. करड्या शिस्तीने मुले बिघडू शकतात.


स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी घ्या

कुटूंबातील लोकांना, सहकार्‍यांना, सरकारला इतकेच नव्हे तर प्रत्येकाला दोष देणे अगदी सोपे असते. मनासारखी गोष्ट घडली नाही की, त्याचे खापर इतरांच्या माथी मारणे सोपे असते. वास्तविक पाहता, दुसर्‍यांकडे बोट दाखविण्याची आपल्या समाजाला सवयच लागलेली आहे. परंतू जेव्हा एक बोट समोरच्या व्यक्तीकडे करतो, त्यावेळी तीन बोटे स्वत:कडे वळतात याचे विस्मरण होता कामा नये. तुम्ही आयुष्यात जे बरे-वाईट निर्णय घेता, त्याच्या परिणामाची जबाबदारीही तुम्ही स्विकारली पाहिजे. तुम्ही जितक्या लवकर कृती कराल तितक्या लवकर तुम्हाला त्यातील चुका लक्षात येतील व त्या चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. चुकांचे समर्थन न करता त्या चुकांची जबाबदारी स्विकारा व पुन्हा त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या.


त्याग पाहून दान करा

आपल्या भारतीय संस्कृतीत शिबि राजापासून दानशूरांची थोर परंपरा आहे. एका हाताने दिलेले दान दुसNया हाताला कळता नये, असेही म्हटले जाते. दान फक्त संपत्तीच्या माध्यमातून दिले जात नसून अन्नदान, नेत्रदान, रक्तदान, विद्यादान, भूदान आदि दानाचे विविध प्रकार आहेत. दान देतांना त्यामागे स्वार्थ असता कामा नये. एखाद्या कॉलेजला १० लाख देऊन स्वत:चे नाव देणे हा एक प्रकारचा सौदा झाला ती देणगी ठरत नाही. आयकरात सवलत मिळावी म्हणून दिलेली देणगी ही देणगी विंâवा दान ठरत नाही. त्यामागे स्वार्थ असतो. दुसरी गोष्ट म्हणजे दान हे सत्पात्री माणसालाच करावे. त्याग पाहून दान करावा. ‘वृथा दानम् धनाढेश्यु’ असे संस्कृत सुभाषित आहे. आपण जे दान देणार आहोत व ज्याला देणार आहोत, त्याचा तो उपयोग योग्य कारणासाठी करेल काय? याचाही विचार करा.


जे प्रथम करणे आवश्यक आहे, ते प्रथम करा

जे सर्वप्रथम करणे आवश्यक आहे ते आपोआप झाले पाहिजे. परंतू अनेक कारणास्तव आपण कमी प्राधान्याच्या गोष्टी प्रथम करतो व महत्त्वाच्या गोष्टी लांबणीवर टाकतो, त्यामुळे केवढे मोठे प्रश्न रेंगाळत पडतात असे नव्हे. तर त्यामुळे आपला बहुमूल्य वेळ, शक्ती विनाकारण खर्च होते; म्हणून आपल्या अत्यंत महत्त्वाचे काम सर्वप्रथम हाती घेतले पाहिजे. रोज सकाळी दिवस भरातील कामांची यादी तयार करा व त्याचा प्राधान्यक्रमही ठरवा. व रोजची कामे रोज पूर्ण करण्याची सवय स्वत:ला लावून घ्या. एकावेळी एकच काम हाती घ्या. हातातले काम पूर्ण झाल्याखेरीज दुसNया कामाला हात लावू नका. अन्यथा ‘एक ना धड, भराभर चिंध्या’ अशी तुमची अवस्था होईल.


तुटले, पुटले असल्यास वेळीच जोडा

इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘‘स्टीच इन टाईम, सेव्हज् नाईन‘‘ याचा अर्थ वेळीच एक टाका घातल्यास पुढचे नऊ टाके घालण्याचे वाचतात. किरकोळ दुरुस्तीकडे आपण दुर्लक्ष करतो. ‘चालतयं तोपर्यंत चालवून घ्यायचं’ ही मानवी प्रवृत्ती असते; व तीच प्रवृत्ती मानवी स्वभावातील सर्वांत मोठा दुर्गुण ठरतो. घरातील बाथरुम, संडासात पाय घसरुन कमरेचे हाड मोडल्याखेरीज स्वच्छता करायची नाही अशी प्रतिज्ञा जणू काही आपण केलेली असते. वेळच्या वेळी काम करण्याची सवय अंगी बाळगावी. त्याचा भविष्यात तुम्हाला फायदाच होईल. कुकरच्या दांडाचा एखादा स्व्रूâ निघाला तरी दुसरा स्व्रूâ निघेपर्यंत त्याची दुरुस्ती करण्याचे आपण नाव घेत नाही. घरातल्या वस्तू जिथल्या तिथे ठेवण्याचे मन प्रसन्न होते.


काम पूर्ण झाल्याविना पैसे देऊ नका

घराच्या विविध कामासाठी तुम्ही रंगारी, सुतार, प्लंबर, वायरमन, वंâत्राटदार यापैकी कोणाला ना कोणाला काम सांगता. त्या कामाचे किती पैसे द्यायचे ते काम सुरु करण्यापूर्वी ठरलेले असते. जस जसे काम पूर्ण होईल तस तसे त्याचे पैसे हप्त्याहप्त्याने द्या. मात्र शेवटचा हप्ता काम पूर्ण झाल्याखेरीज मुळीच देऊ नका, काम पूर्णपणे समाधानकारक झाल्याची खात्री करुन घ्या. काम चालू असतांनाच जर तुम्ही सगळेच पैसे आधी दिले तर तुम्हाला केवळ मनस्ताप सहन करावा लागेल. कारण सुतार, गवंडी या मंडळींनी मध्येच दांडी मारली म्हणजे ८-८ दिवस त्यांची वाट पाहावी लागते अर्धवट काम दुस-याकडूनही पूर्ण करुन घेता येत नाही. कारण पैसे आधीच दिले असतात. आपली केवळ चिडचिड होते. म्हणून काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे देऊ नका.


दुस-याला पुस्तके देऊ नका

पुस्तके व वृत्तपत्रे दुस-याला वाचायला देऊ नका. कारण उधार उसने दिलेल्या पैशाप्रमाणे उधार दिलेली पुस्तके परत न करण्याकडे अशा लोकांचा कल असतो. पुस्तके उधारण मागणा-यास ग्रंथालयाचा मार्ग दाखवावा. समोरच्या व्यक्तीला राग आला तरी चालेल, एकवेळ पुस्तके देत नाही म्हणून मैत्री तोडली तरी ही चालेल पण अशांना पुस्तके देऊ नका. ज्यांचे पुस्तकांवर प्रेम असते, तो कधीही दुस-याला पुस्तके देणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुध्दा आपली पुस्तके इतरांना वाचायला देत नव्हते. काहींना ग्रंथालयातून पुस्तके चोरण्याची सवय असते. ही सवय वाईट आहे. एकदा एका ग्रंथ प्रदर्शनास गेलो असता, संयोजक म्हणाला की सेक्सची पुस्तका चोरण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यांनी ज्ञानेश्वरी, दासबोध चोरण्याचा प्रयत्न केला असता, तर मी त्यांना भेट दिली असती, थोडक्यात तुमची पुस्तके कोणालाही उधार देऊ नका. अशी पुस्तके परत मिळत नाहीत.


अति भिडस्तपणा काय कामाचा ?

अति परखडपणा, स्पष्टवक्तेपणा हा जसा प्रगतीला मारक असतो, त्याप्रमाणे अति भिडस्तपणा सुध्दा हानीकारक असतो. तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे याचा बहुसंख्य लोकांना अंदाज येत नाही. ते स्वत:च्या कामात किंवा स्वत:चीच प्रतिमा जपण्यात मग्न असतात. तुम्ही कोणते कपडे घातले आहेत, कोणते दागिने घातलेले आहेत, याकडे फारसे लक्ष नसते. आणि भिडस्तपणामुळे तुम्हीही त्याकडे इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकत नाही. या भिडस्तपणामुळे जीवनात तुमची खूप पिछेहाट होते. अति परखडपणा तुमच्या अंगी नसला तरी त्यामुळे फारसे बिघडत नाही, त्यामुळे तुमचे नुकसानही होत नाही, परंतू अति भिडस्तपणा हा तुमच्या प्रगतीच्या मार्गातील गतिरोधक होतो.


लोक ऐनवेळी नकार देतात हे गृहीत धरा

आजच्या व्यवहारी जगात कोणावरही फाजील विश्वास ठेवू नका. इतकेच नव्हे तर स्वत:च्या बायका मुलांवरही विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवायचा तो फक्त स्वत:वरच! कारण लोक ऐनवेळी नकार देतात. असा नकार हा त्यांच्यावरील विश्वासामुळे निश्चितपणे धक्कादायक असतो. कारण ज्यांच्यावर आपण विश्वास टाकलेला असतो, ती व्यक्ती नकार देऊ शकते हे आपण गृहीत धरतच नाही. तुम्ही लग्नासाठी अनेकांना निमंत्रण दिले असते. मात्र त्यापैकी अगदी जवळचे काही मित्र, नातेवाईक लोक लग्नास येत नाहीत, विंâवा येऊ शकत नाहीत, त्यामुळे त्याचा राग त्यांच्यावर काढणे योग्य नाही ते कोणत्याही समारंभाचे १०० जणांना बोलावले तर त्यापैकी २०-२५ जण येत नाहीत, कृतीतून नकार देतात हे गृहीत धरा म्हणजे चिडचिड होणार नाही.


कोठे वस्तू ठेवल्या, त्याची नोंद ठेवा

पेन, चष्मा, रुमाल यासारख्या नेहमी लागणाNया वस्तू आपण कोठे ठेवल्या आहेत, ते लक्षात ठेवावे. जर लक्षात ठेवणे जमत नसेल, तर कागदावर त्याची नोंद ठेवावी. एखादी वस्तू ज्या ठिकाणाहून घेतली जाते, ती वस्तू काम झाल्यावर जागच्या जागी ठेवणे सोपे असते, पण आपण आळस करतो. त्यामुळे वस्तू कोठे ठेवली हे आठवत नाही, परिणामी आपण घरातल्या लोकांवर राग काढतो. हे चुकीचे आहे. त्याऐवजी वस्तू कोठे ठेवल्या, याची त्या वेळी नोंद करुन ठेवली तर पुन्हा सहज सापडू शकेल व शोधाशोध करण्यात तुमचा जो अनावश्यक वेळ जातो, तो जाणार नाही. आमचा हा सल्ला तुमचा वेळ वाचविणारा आहे.


सायकल चालवा

अलिकडे स्वयंचलित दुचाकी वाहने विकत घेणे सुलभ कर्ज पुरवठ्यामुळे सोपे झाले आहे. दुचाकी वाहन उत्पादकांमधील स्पर्धेमुळे सवलत देण्यातही चुरस दिसते. त्यामुळे मध्यमवर्गीयांचा ओढा दुचाकी वाहने खरेदी करण्याकडे वाढला आहे. पूर्वी सायकलीचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यात आता घरी १-२ दुचाकी वाहने असतात. त्याचा परिणाम सायकलींचा वापर हळूहळू कमी होऊ लागला आहे. दुचाकी वाहनांमुळे प्रदूषण वाढते हे माहिती असूनही रोज रस्त्यावर येणार्‍या दुचाकींची संख्या वाढत आहे. दुचाकीचा प्रवास आरामदायक असतो त्यामुळे त्याला मागणी वाढत आहे. परंतू सायकलमुळे व्यायाम होतो, प्रदूषण होत नाही. शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते याकडे आपण कळून सवरुनही दुर्लक्ष करतो. त्यामुळे लोकांनी विशेषत: तरुणांनी सायकलींकडे वळावे, यासाठी जनजागरण मोहिमा राबविल्या जातात. सायकल वापरा, असे डॉक्टरही सांगतात पण पूर्वी सायकल चालविणारे तरुण जे आज पालक म्हणतात, मला दुचाकी मिळाली नाही, माझ्या मुलांना तरी ती मिळावी, असा विचार करतात मात्र असा विचार करणे चुकीचे आहे. मुलांच्या मनावर सायकलीचे महत्त्व ठसविले पाहिजे. त्यासाठी स्वत: सायकल वापरावी.


थांबा आणि विचार करा

कोणतीही कृती करण्यापूर्वी जर तुम्ही विचार केला, तर तुमचा वेळ, पैसा व त्रास किती वाचतो, हे पाहिले तर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याचा सर्वांगिण विचार करा. त्याच्या परिणामांचा, दुष्परिणामाचा विचार करा. त्याला पर्याय काय आहेत का याचाही विचार करा. मनाला अनेक प्रश्न विचारा. त्यानंतरही ती कृती करणे योग्य असल्याचे तुमचे मत बनले, तर जरुर तशी कृती करा. कारण त्याच्या परिणामास सिध्द राहण्याची तुमची मानसिक तयारी झालेली असते. केवळ कृती करण्यापूर्वी थोडा विचार करण्यास तुम्ही वेळ दिल्याने पुढील अनेक समस्या सुटतात हे तुमच्या लक्षात येईल. थोडक्यात, विचार करण्याचे प्रभावी शास्त्र तुमच्या हाती आहे.


खरेदीची बचतीशी तुलना नको

खरी बचत त्यागातून होते, त्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवले पाहिजेतच असे नव्हे. परंतू आपण केलेल्या खरेदीवरुन वाचविलेल्या पैशाचा विचार करुन स्वत:चीच फसवणूक नेहमी करीत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सेलचा विचार केला जातो. त्यामुळे या वस्तूची विंâमत वाढवून सांगितली जाते काय अशी शंका मनात आल्याखेरीज राहत नाही. त्यामुळे ‘आजच खरेदी करुन, भरपूर पैसे वाचवा’ विंâवा ‘अर्थसंकल्पानंतर विंâमती वाढतील, त्यापूर्वी खरेदी करा’ असे फलक जेव्हा तुम्ही वाचता, त्यावेळी मुळीच खरेदी करु नका. तुम्हाला त्या वस्तूची गरज भासेपर्यंत खरेदीसाठी प्रतीक्षा करा. म्हणजे असे ‘सेल’ मृगजळ असल्याचे जाणवेल. मग तुमचे कर्ज वाढविणाNया कथित बचतीच्या मृगजळामागे कशाला धावतात?


स्पष्ट व जाणिवपूर्वक बोला

मुख्य मुद्यावर, समस्येवर बोलण्याऐवजी अवांतर विषयावर बोलणे, तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा सांगणे, गरजेपेक्षा जास्त बोलत राहणे, वायफळ बोलत राहणे इत्यादी उत्तम सुसंवादाच्या मार्गातील अडथळे टाळावेत. त्या ऐवजी बोलतांना प्रत्येक शब्दाची निवड काळजीपूर्वक करा. शब्द तोलून मापून वापरा. स्वत:चे विचार स्पष्टपणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ द्या, व थेट तसेच अत्यंत प्रामाणिकपणे बोला. जर समोरची व्यक्ती तुमच्या बोलण्यात व्यत्यय आणत असेल, तर त्याचे बोलणे पूर्ण होईपर्यंत शांत बसा. संयम पाळा. तुम्ही जेव्हा दुसर्‍याचे  एकूण घेण्याची सवय अंगी बाणाल, तेव्हाच दूसरा  व्यक्तीही तुमचे बोलणे ऐकत राहतील.


टापटिपीसाठी रोज दहा मिनिटे खर्च करा

दररोज किमान दहा मिनिटे घरातील स्वच्छतेसाठी, नीटनेटकेपणासाठी, टापटिपीसाठी खर्च करा. घरात ठिकाठिकाणी जळमटे साठलेली असतात. फ्रीज, टीव्ही, फोन यावर धूळ साठली जाते, त्याकडे लक्ष देऊन वेळच्यावेळी स्वच्छ ठेवले पाहिजे. मुलांच्या खोलीतील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. त्या वस्तू उचलून जागच्या जागी ठेवल्या पाहिजे. टेबल, कपाटातील सामान व्यवस्थित आवरुन स्वच्छ ठेवा. स्वत:च्या कपड्यांना स्वत: इस्त्री करा. महात्मा गांधी तर स्वत:चे कपडे स्वत: धूत असत. गांधीजींनी स्वावलंबावर विशेष भर दिला होता. घरातील झाडलोट बायकांप्रमाणे पुरुषांनीही करावयास हरकत नाही. या बारिकसारीक टापटिपीतून किती आनंद मिळतो याचा अनुभव घ्या. हा अनुभव शब्दबध्द करता येणार नाही असा चकीत करणारा आहे. दिवसातील फक्त १० मिनिटाने उर्वरित २३ तास ५० मिनिटे आंनदात जाणार असतील तर दहा मिनिटे खर्च करायला काहीच हरकत नाही.


वाहतूकीचे नियम पाळा

वाहतूकीचे नियम न पाळल्याने वाहतुकीची कोंडी तर होतेच परंतू अनेकदा लहान-मोठे अपघात देखील होतात. अशा अपघातामुळे वाहन-चालक व त्याचे सहप्रवासी जखमी होतात तर काहीवेळा प्राणासही मुकावे लागते. अत्यंत दुर्लभ असा मनुष्य जन्म अपघातामुळे गमवावा लागणे, या सारखे दुसरे दुर्दैव नाही. वाहतूकीचे नियम पाळल्यावर अपघात होणारच नाहीत. असे छाती ठोकपणे म्हणता येत नसले तरी अपघात टळण्यास त्यामुळे निश्चितपणे मदत होते. वाहनाचे दिवे, ब्रेक नादुरुस्त असता कामा नयेत वेळ वाचविण्यासाठी किवा लांबचा वळसा टाळण्यासाठी आपल्याला अनेकदा ‘नो एंट्रीतून वाहन चालविण्याचा मोह होतो. पण असा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. पोलीस पकडतील, दंड करतील याची भीती न बाळगता किवा पोलीस नसल्याचा गैरफायदा घेऊन ‘नो एन्ट्री’ तून जाणे प्राणघातक ठरु शकते. स्वत:चा जीव लाखमोलाचा आहे, त्याचे जतन केले पाहिजे. जाण्याची घाई सर्वांनाच असते त्यामुळे सिग्नल तोडून जाण्यात कसला पुरुषार्थ? वाहतूकीची कोंडीत स्वत:चे वाहन आडवे तिडवे, घुसविण्यात कसला शहाणपणा? स्वत:ची काळजी घ्या.


घरात स्लीपरचा जोड ठेवा

आपण एकदा बूट घालून, सॅण्डल घालून घराबाहेर पडले की, जवळजवळ दिवसभर ते बूट आपल्या पायात असतात. त्यामुळे पाय जखडून, आवळून राहतात, पायांच्या बोटांची हालचाल होत नाही. त्यामुळे पायावरील ताण वाढत जातो. यासाठी घरी परतल्यावर पायातले बूट, मोजे त्वरित काढून ठेवा व पायात रबरी स्लीपर घाला. पादत्राणात कितीही सुधारणा होत राहिल्या तरी ‘जुने ते सोने’ या म्हणीप्रमाणे ‘स्लीपर’ ला पर्याय नाही. चांगला स्लीपरचा जोड नेहमी घरात ठेवा. स्लीपर वजनाला हलक्या असतात. पायात घातल्यावर त्यातून हवा खेळती राहू शकते. दिवसभर ताठून गेलेल्या पायांना स्लीपरमुळे आरामदायक वाटते. पाय तळावत नाही. उन्हाळा, पावसाळा किवा हिवाळा ऋतू असला तरी रबरी स्लीपर उपयुक्त ठरतात.


घरी येताच मुलांशी खेळा

दिवसभराची नोकरी करुन जेव्हा तुम्ही घरी परतता, त्यावेळी कितीही दमलेले असा, थकवा आलेला असो, मानसिक तणावाखाली असा काहीही असले तरी घरात मुलांना येतांना खाऊ घेऊन येत जा. मुलांबरोबर खेळा, त्यांच्याशी गप्पागोष्टी करा. ही मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात, तुम्हीही त्यांच्यावर तितकेच प्रेम करता, हे त्यांनाही कळू द्या. तुम्ही नोकरी निमित्ताने विंâवा व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असता, तेव्हा ही मुले तुम्ही घरी येण्याची चातकासारखी वाट पाहात असतात. मुलांचा घरी अभ्यास घ्या. त्यांची, त्यांच्या मित्रांची विचारपूस करा मुलांना आपण एकाकी आहोत, असे कधीही वाटणार नाही, याची काळजी घ्या. अलिकडे आईक-वडिल दोघेही नोकरी करतात. नोकरी निमित्त दोघेही घराबाहेर व मुले पाळणाघरात अशी स्थिती असते. अशाही परिस्थितीत मिळेल तेवढा वेळ मुलांसाठी खर्च करा.


घरात वृध्द माणसे हवीत

आजकाल एकत्र कुटूंबपध्दती लयाला जाऊन विभक्त कुटूंबपध्दतीचा प्रभाव वाढला आहे. ‘हम दो, हमारे दो’ या चौकोनी कुटूंबात वृध्द आई-वडिलांना जागा नसते, त्यामुळे जागोजागी वृध्दाश्रम निघालेले आहेत. ‘वृध्दाश्रम’ ही आता सामाजिक गरज झाली आहे. ही फार मोठी शोकांतिका होय. दोन पिढ्यांत केवळ वयाचे अंतर नसते तर वैचारिक अंतरही असते. त्यामुळे घरात धुसपूâस निर्माण होते. सासू-सुनांचे पटत नाही. हे तणाव वाढत जातात व त्याची परिणीती वृध्द मातापित्यांना वृध्दाश्रमाची वाट धरावी लागते, हे दुर्दैव! वास्तविक पाहता आपल्या जन्मदाता आई-वडिलांना वृध्दाश्रमाची वाट दाखविणाNया मुलांना व त्यांच्या बायकांना आपणही एक दिवस वृध्द होणार आहोत, याची जाणीव नसते. उद्या त्यांच्या मुलांनीही असे केले तर काय वाटेल हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. खरे सांगायचे झाल्यास घरात वृध्द माणसे असावीत. त्यामुळे आपण तरुण आहोत ही भावना मनात कायम राहते व आपण अधिक उत्साहाने काम करतो.


प्रकल्पांची पूर्वतयारी करा

कोणताही प्रकल्प हाती घेण्यापूर्वी तुम्हाला त्या प्रकल्पात रस आहे का? त्यासाठी पुरेसा वेळ देण्याची तुमची शारीरिक व मानसिक तयारी आहे का? हे प्रश्न स्वत:ला प्रामाणिकपणे विचारा. या प्रश्नांची उत्तरे जर होकारार्थी असेल तर तो प्रकल्प हाती घेण्याचा विचार करा. एकदा प्रकल्प हाती घेतल्यावर त्याची पूर्वतयारी करा. पूर्वतयारी झाल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरु करु नका. प्रकल्पासाठी किती खर्च येणार आहे! कच्चा माल स्वस्तात कसा मिळेल? कमीत कमी वाहतूक खर्च कसा होईल? आपण जे उत्पादन करणार आहोत त्याला कोणत्या बाजारपेठेत मागणी चांगली आहे? परदेशात त्याला मागणी येईल का? असा विविध प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. सव्र्हे करुन प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला पाहिजे. अशी सर्व तयारी झाल्यावरच प्रकल्पाच्या कामास प्रारंभ करावा.


दुस-या बाजूनेही विचार करा

जेव्हा एखाद्या हातून चूक घडते, तेव्हा नेहमी प्रकट होणाNया राग, नैराश्येच्या भावना टाळा. अशावेळी चूक का घडली? कशी टाळता आली असती? अशा चुकांची पुनरावृत्ती होऊ म्हणून कोणत्या प्रकारची दक्षता घेता येईल? अशा पध्दतीने विचार करा; म्हणजे प्रथदर्शनी आपले रागावणे, निराश होणे किती पोरकटपणाचे होते याची सहज कल्पना येईल. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे आपल्याला जरी माहित असले तरी व्यवसायात वागतांना आपल्याला त्याचा विसर पडतो व फक्त आपलीच बाजू हीच एकमेव असल्याचा दुराग्रह करतो. जेव्हा आपण दुसNया बाजूने विंâवा तटस्थपणे कोणत्याही घटनेकडे पाहतो तेव्हा त्याचे सर्व पैलू आपल्या लक्षात येतात व आपला दुराग्रह बर्फाप्रमाणे वितळून जातो.


बोलू नका, करा

जी गोष्ट इतरांना करणे सहजासहजी जमणार नाही, ती गोष्ट मी करुन दाखवितो, असा आपल्याला गर्व असतो. जेव्हा इतर लोक तुम्हाला तसे करण्यास सांगतात, तेव्हा तुम्ही ते करणे अपेक्षित असते. जर तुम्ही बोलल्याप्रमाणे वागला नाही, तर तुमचा दुर्बलपणा उघडकीस येईल, वायफळ बडबडता, बेजबाबदारपणे बोलता, असा ठपका तुमच्यावर येईल. जर तुम्हाला खरोखरच इतरांच्यावर प्रभाव पाडण्याची इच्छा असेल, तर तुम्ही काय करणार आहात ते बोलून दाखवू नका. तर प्रत्यक्षात करुन दाखवा. त्यामुळे समोरच्यांनाही आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. आणि जरी तुम्ही काही कारणास्तव करु शकला नाही, तर त्याबद्दल कोणीही तुम्हाला दोष देणार नाही. म्हणून न बोलता जे करायचे ते करुन दाखवा.


डबे, बरण्यांवर चिठ्ठ्या लावा

प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकघरात अनेक लहान मोठे डबे, काचेच्या विंâवा प्लॅस्टिकच्या बरण्या असतात. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किराणा सामान आणल्यावर ते विविध डबे, बरण्यांतून भरुन ठेवले जाते. मात्र स्वयंपाक करतांना कोणत्या डब्यात कोणती वस्तू आहे हे पटकन आठवत नाही त्यामुळे प्रत्येक डबा, बरणी उघडून बघत बसावी लागते. त्यात वेळ तर वाया जातोच, पण स्त्रियांना मनस्तापही तितकाच होतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक डब्यावर, बरणीवर चिठ्ठी लावून त्यावर त्यात कोणता पदार्थ आहे ते लिहावे. अनेकांना हा प्रकार हास्यास्पद वाटणे स्वाभाविक आहे कारण आपल्या भारतीयांना टापटिपीचे महत्त्व अद्याप कळलेले नाही. चिठ्ठ्यावर नावे लिहिण्यास एकदाच वेळ जाईलही पण प्रत्येकवेळी करावी लागणारी शोधाशोध व त्यामुळे येणारा मानसिक ताण तरी थांबेल. काळजी एकच घ्यायची की, पुढील महिन्यात सामान भरतांना चिठ्ठी पाहूनच तो तो पदार्थ त्या त्या डब्यात भरावा. ज्यांना हे शक्य होणार नाही, त्यांनी पारदर्शक डबे, बरण्यांचा वापर करावा.


जीवनात विनोद हवा

‘टवाळा आवडे विनोद’ असे समर्थ रामदास स्वामींनी म्हटले असले तरी त्यांनी कोणत्या संदर्भात असे म्हटले होते, हे पाहावे लागेल. मात्र निखळ विनोदाला समर्थांचा आक्षेप नसावा, असे वाटते. विनोद हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रुक्ष जीवनात विनोदाचा शिडकावा आवश्यक आहे. विनोदामुळे म्हणण्यापेक्षा विनोद समजल्यावर माणूस खळखळून हसतो. उत्तम आरोग्यासाठी हसणे तितकेच महत्त्वाचे असल्याने हसण्याचा मुद्दा हसण्यावारी नेण्याची चूक करु नये. विनोद म्हणजे एक प्रकारचे शक्तीवर्धक टॉनिक होय. जगात विनोद न कळणारे असू शकतात. मात्र ज्यांना तो कळतो, त्यांच्यात विनोद न आवडणारे शोधूनही सापडणार नाहीत. काहींना उशीरा विनोद कळतात. आपल्याकडे सरदारजींवर अनेक विनोद खपविले जातात. विनोदामुळे माणसाला दु:खद प्रसंगातही आधार वाटतो. त्यामुळे विनोदी वक्ता, विनोदी लेखक, विनोदी अभिनेता सर्वाधिक लोकप्रिय होतात. जीवनात विनोद हवाच, हे लक्षात ठेवा


मनाची दारे, खिडक्या उघडा

संकुचित मनोवृत्तीची माणसे आपल्याला पावलोपावली भेटतात, पण मोठ्या मनाची माणसे शोधावी लागतात. वाडा संस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती आल्यापासून शहरे व गावे मोठी होत गेली पण माणसे मात्र लहान होत राहिली. माणसाचे मन मोकळे असावे मनात कोणाबद्दलही कायम स्वरुपी राग, द्वेष, बाळगू नये. माणूस हा एकमेव प्राणी आहे की, जो बोलू शकतो. बोलण्यामुळे, चर्चेमुळे, सुसंवाद साधल्यामुळे परस्परांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होते. घराची दारे, खिडक्या उघड्या ठेवल्याने जशी हवा खेळती ाहते, त्याप्रमाणे मनाची दारे, खिडक्या उघड्या ठेवल्याने विचार खेळते राहतात. नवीन विचार स्विकारण्याइतपत मन प्रगल्भ होते. त्यामुळे दोन पिढ्यांमध्ये, सासू-सुनांमध्ये होणारा संघर्ष टळण्यास मदत होते. तुमच्या मनाची दारे, खिडक्या तुम्ही बंद केल्या तर तुमच्या मनात काय आहे, हे इतरांना कळणार नाही. त्यामुळे माणूस घाणे असल्याचा गैरसमज विनाकारण पसरु लागेल. त्यात तुमचेच नुकसान असते. मन मोकळे ठेवल्यास तुमच्या व्यक्तीमत्त्वाची छाप समोरच्यावर पडू शकते. तेव्हा सदैव मनाची दारे व खिडक्या उघड्या ठेवा.


गिफ्ट चेक द्या!

आपण लग्न समारंभात, वाढदिवसानिमित्त मित्रांना, नातेवाईकांना भेट वस्तू देतो. लग्नात दिल्या जाणाNया भेट वस्तूंना ‘आहेर’ म्हणतात. अशावेळी सर्वसाधारणपणे घड्याळ, फोटो प्रेâम, कपबशांचा सेट, डिनर सेट, टीव्ही, प्रिâज आदी वस्तू देतो. भेट मिळालेली वस्तू असल्याने घेणारा ती नाकारु शकत नाही. पण एकापेक्षा अनेकजण जेव्हा एकाच प्रकारची वस्तू आणतात, उदा. ५-६ जणांनी भिंतीवरील घड्याळ भेट म्हणून दिले तर वनरुम किचनमध्ये राहणारा यजमान ५-६ घड्याळे ठेवणार कोठे? याचा विचार भेट देणारी व्यक्ती कधीच करत नसते. किंबहुना तसा विचार करण्याची त्याला गरज देखील नसते. दोन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसाला त्याला १० ड्रेस मिळाले तर त्यापैकी तो जेमतेम २ विंâवा ३ ड्रेस वापरु शकेल. बाकीचे ड्रेस वापरण्यापूर्वीच त्याची उंची वाढल्याने आपोआप वाया जातील. तेव्हा भेट देणार्‍यांनी  तरी अशी वाया जाणारी भेट का द्यावी? त्यापेक्षा बँकांचे गिफ्ट चेक विंâवा रोख रक्कम बंद पाकिटातून द्यावी. लग्न समारंभात खर्च बराच झालेला असतो. यजमानास खरी गरज पैशाची असते. आपण भेट म्हणून भेटवस्तूच्या विंâमती इतकी रोख रक्कम दिली तर त्याचा त्यालाही उपयोग होईल.


वेळ लागेल, खर्च वाढेल हे गृहीत धरा

घरात नवे फर्निचर घ्यायचे असेल, सहलीला जायचे असेल, वाहनाची दुरुस्ती असेल विंâवा खरेदीला जायचे असेल तर मानवी स्वभावामुळे आपण यासाठी किती वेळ लागेल? किती खर्च होईल असे विचार आपल्या मनात येतात. तेव्हा अशाप्रकारचे संभ्रम निर्माण करणारे विचार मनात येतात. मनात वाईट विचार येतात. जीपने गावाला जाऊ लागल्यावर बसला अपघात होणार तर नाही ना, असा विचार येतो. सुरुवातीच्या काळात मनात असे विचार येतात. हे आपण गृहीत धरले पाहिजे. म्हणजे मनस्ताप होणार नाही. नेहमी चांगलेच घडेल अशी अपेक्षा बाळगा. 


मनातून वाईट विचार काढा

जेव्हा तुम्ही विमानातून, रेल्वेतून विंâवा बसमधून प्रवास करता, व्याख्यानासाठी उभे राहता, आजारी नातेवाईकास भेटण्यास रुग्णालयात जाता, हाताखालच्या सहकाNयावर रागावता, त्यानेळी मनात पुन्हा पुन्हा नकारात्मक, वाईट विचार येतात, त्यामुळे मानसिक ताण वाढत जातो. विमानाचे अपहरण विंâवा विमान कोसळले तर? व्याख्यान देतांना श्रोत्यांनी नासक्या अंड्याचा मारा केला तर? अशा नकारात्मक विचारामुळे आपली अस्वस्थता अधिक वाढते. तेव्हा मनातून अशा प्रकारचे वाईट विचार काढून टाका आणि सर्व काही ठीक होईल. असा आशावादी दृष्टीकोन कायम बाळगा. त्यामुळे तुमच्या मनावर ताण पडणार नाही. घडणाNया गोष्टी टाळता येत नाहीत. पण वाईटच घडेल असा विचार करुन तुम्ही आज अस्वस्थ का होता?


योग्य साधने वापरा

योग्य प्रकारची साधने वापरल्याखेरीज कोणतेही काम पूर्णक्षमतेने, गतीने व अधिक सुरक्षितपणे व कमी खर्चात होत नाही. तुम्ही साधने विकत घ्या, भाड्याने आणा नाहीतर उधार आणा पण त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे का? त्याची गुणवत्ता याचा प्रथम विचार करा. अशा प्रकारच्या साधनांचा वापर कसा करावा हे शिकण्यासाठी पुरेसा वेळ खर्च करा. अल्पकाळासाठी भाड्याने साधने आणणे स्वस्तात पडू शकते. परंतू अनेकदा अशी साधने विकत घेणे फारसे खर्चिक नसते. व ती साधने तुम्हाला हवे तेव्हा पुन्हा वापरु शकता. गुणवत्तेसाठी उत्तम प्रतीची साधने वापरा.


पेरआढावा घ्या

आपणपैकी अनेकांना माहिती असेल की, वनात जात असतांना ठराविक अंतरानंतर सिंह मागे पाहतो. त्यावरुनच ‘सिंहावलोकन’ हा शब्द तयार झाला आहे. आपल्या मार्गक्रमणाचा तो अशाप्रकारे आढावाच ाघेत असतो. आपल्यामागे कोणी शत्रू येत नसल्याची खात्री करुन घेतो. सिंहाची ही सवय मनुष्यानेही अंगी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण एखादा प्रकल्प हाती घेतो, एखादी जबाबदारी स्विकारुन तहानभूक हरपून काम करतो, त्यावेळी ठराविक काळानंतर आपण आपल्या कामाचा पेâरआढावा घेणे आवश्यक आहे. पेâर आढावा घेण्याची सवय असणे हा भावी यशाचा पाया आहे. हा पेâर आढावा सर्वसाधारणपणे ३ महिन्यांनी, ६ महिन्यांनी विंâवा दरवर्षी घ्यावा. त्यामुळे आपण होतो कोठे? व आज कोठे आहोत? हे आपल्याला कळू शकते. वर्षापूर्वी आपण जे उद्दिष्ट ठरविले होते, ते साध्य झाले का? न झाल्यास आपण कमी कोठे पडलो, आणखी कोणत्या सुधारणा करणे अपेक्षित आहे याचे स्पष्ट चित्र आपल्याला कामाचा पेâरआढावा घेतल्यावर मिळतो व त्याआधारे पुढील वाटचाल करतांना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची कल्पना येते. म्हणून वेळोवेळी घ्यावा हे उत्तम !















टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)