दुस-याला महत्त्व देण्यापेक्षा स्वत:ला महत्त्व द्या.

Adv.Saurabh Rajput
0

 


दुस-याला महत्त्व देण्यापेक्षा स्वत:ला महत्त्व द्या.

अनेक लोक दुस-यांबरोबर आपली तुलना करतांना दुस-याजवळ काय आहे त्यावर आपली नजर स्थिर करतात. आणि तसे काही माझ्यापाशी नाही, एवढ्यातच समाधान मानतात. कबूल, पण दुस-याकडे काय आहे त्याचाच तुम्ही विचार का करता? तुमच्याकडे काय आहे त्याचा तुम्ही विचार करा ना! तुमच्याकडे जे आहे त्याचा विकास करुन तुम्हाला काय साध्य करायचे आहे ते निश्चित करा. बहुतेक वेळा असे होते की, तुमच्यात जे आहे ते उंच पहाडाच्या बर्फाच्या शिखराऐवढेच तुम्हाला दिसते. तुमच्यातील शक्ती आणि क्षमता विकसविण्याची जेव्हा तुम्हाला संधी मिळते, तेव्हाच त्याचे स्वरुप पूर्णपणे प्रगट होते. मनुष्यप्राणी हजारो वर्षापासून आकाशातील वीज पहात आलेला होता. पण त्या विजेचा उपयोग करुन घेण्याचा जेव्हा त्याने विचार केला आणि त्या दिशेने प्रयत्न करण्याकडे वळला, तेव्हाच तिचा कशा त-हेने उपयोग करता येईल त्या दिशेने प्रयत्न करण्याकडे वळतो. पण दुस-याची शक्ती, दुस-याची परिस्थिती, दुस-याची क्षमता, दुस-याची बुध्दी, दुसर्‍याचे  चातुर्य यांवरच तुम्ही जर तुमचे लक्ष केन्द्रित कराल तर त्या बाबतीत सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला (म्हणजेच तुम्ही स्वत:ला) विसरुन जाल. केवळ दुस-यात या सर्व गोष्टी पहाण्याने त्या तुम्हाला प्राप्त होण्याचा संभव नसतो. त्यांनी जे काही साध्य केलेले असते, ते स्वत:तील गुणविशेष ओळखून प्रगट करण्याचा प्रयत्न करुन हे सर्व आपोआप झाले असे समजू नका. त्यांनी मिळविलेल्या सिध्दीला आणि नैपुण्याला तुम्ही फक्त परिणामाच्या स्वरुपात पाहाता. पण तो कशाचा परिणाम आहे हे तुम्ही जाणत नसल्याने गैररितीने स्वत:शी तुलना करुन तुम्ही त्यांना अवास्तव महत्त्व देता, जे वास्तविक तुम्ही स्वत:ला द्यायला हवे.


तुम्ही लक्ष्य नक्की केलेले असेल तरच तुमची महात्त्वाकांक्षा ते गाठण्याचे तुम्हाला बळ देईल. रेल्वे-स्टेशनच्या तिकिटाच्या खिडकीवर जाऊन तुम्ही म्हणाल, ‘मला एक तिकिट द्या’ तर तिथला कर्मचारी तुम्हाला तिकिट देणार नाही. कोणत्या स्टेशनचे तिकिट पाहिजे ते तुम्ही सांगाल तरच तुम्हाला तिकिट मिळेल. ते असेल तरच तुम्हाला प्रवास करता येईल. नाहीतर तुमचे जीवन ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी तुम्हाला घालवावे लागेल. त्याबद्दल दोष कोणाला द्याल? अर्थात, तुम्हाला कोणत्या स्टेशनला जायचे आहे ते नक्की सांगाल तरच त्या ठिकाणचे तिकिट तुम्हाला मिळेल. ते सांगू शकला नाहीत तर स्टेशनमास्तर, त्याची इच्छा असूनही तुम्हाला मदत करु शकणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे लक्ष नक्की ठरविलेले नसेल तरच तुम्ही ध्येय गाठू शकतात. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)