अहंकाराचा वारा न लागो
समाजात आपण बघतो, पद, पैसा, प्रतिष्ठा मिळाली की माणसे उन्मत्त होतात कोणाशी कसे बोलावे याचे ही त्यांना भान उरत नाही. संपत्तीच्या जोरावर इतरांना तुच्छ समजू लागतात व आपणच सर्वज्ञ अशा भूमिकेत वावरु लागतात व माहिती नसलेल्या गोष्टींवरही आपले मत मांडू लागतात. आजुबाजुला असणारे त्यांचे चाहतेही हाजी हाजी करुन त्याचे समर्थन करीत असतात. वास्तविक त्यांच्यावरील प्रेमामुळे ते आलेले नसतात तर त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीकडे पाहून ते त्याच्या भोवती गोंडा घोळीत असतात! परंतु संपत्तीच्या धुरामुळे त्यांना जणुकाही आंधळेपण आलेले असते. मला मान मिळतो, लोक मला नमस्कार करतात ते कोणामुळे, याचे भान आपल्याला यायला हवे. इराणमध्ये एका गाढवावरुन भगवंताची मुर्ती घेऊन जात होते. रस्त्यात उभे राहून सर्व लोक त्या मुर्तीला नमस्कार करीत होते. ते पाहून मुर्ती ज्या गाढवाच्या पाठीवर होती त्या गाढवाला वाटले की आज पहिल्यांदा लोकांना कळले की माझ्यातही काही आहे! आणि ते मनामध्ये खूष झाले. मुर्तीला, लोक पूहृल, हार चढवित होते नमस्कार करीत होते आणि गाढव समजत होते की हे सारे मलाच मिळते आहे! चालता - चालता मंदिरापर्यंत पोहचला. गाढवाच्या पाठीवरुन मुर्ती खाली उतरवून घेतली व त्याच्या मालकाला दोन रुपये दिले तेव्हा मालकाने गाढवाचे तोंड फिरविले आणि चाबकाचे खाडकन् दोन फटके मारले! गाढव पळत उकिरड्यावर गेले आणि तेव्हा समजले की, अरेरे! हे नमस्कार मला नव्हते तर! तात्पर्य, नमस्कार गाढवाला नव्हता तर त्याच्या पाठीवर जी भगवंताची मुर्ती होती तिला होती! माणसालाही भान हवे की, मला जो मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते ती कोणामुळे्य ज्याच्याकडून मिळाली त्याच्याविषयी कृतज्ञता नको का बाळगायला? पण बुध्दी मिळाली की स्वतरूला तो मोठा समजू लागतो व विचारतो, ‘दाखवा तुमचा देव कोठे आहे? पैसा विंहृवा सत्ता मिळाली की तो समजतो की मीच देव आहे व माझ्यामुळेच सर्व चालते!
वास्तविक वस्तू विंहृवा विद्या आली की अहंकार येणारच! तो आला तर बिघडत नाही, परंतु त्याचा त्रास मात्र होता कामा नये! एकदा गोपाळकृष्ण चिंताक्रांत होते. योगायोगाने नारद तेथे फिरत फिरत आले. गोपालकृष्णाने नारदांचे स्वागत केले. परंतु कृष्ण संचित आहेत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. नारदांनी कारण विचारले, तेव्हा गोपालकृष्ण म्हणाले, ‘नारदा काय करु? ह्या घरात तीन माणसे अत्यंत गंभीर स्थितीत आजारी आहेत. मोठा भाऊ बलराम त्याला बळाचा अहंकार झाला आहे. गरुडाला सामर्थ्याचा व सत्यभामेला सौदर्याचा गर्व झाला आहे. ते तिघेही कोणाला जुमानीतच नाहीत.’ नारद म्हणाले, ‘देवा एवढेच ना? एवढ्याश्या शुल्लक गोष्टींसाठी तुम्ही चिंताक्रांत? हे तीनही रोगी माझ्यावर सोपवा. गोपालकृष्ण म्हणाले, ‘ठिक आहे.’ नारद गंधमदन पर्वतावर निघून गेले. तेथे हनुमान बसले होते. नारदांनी हनुमंताला पाहून विचारले, ‘हनुमंता! अरे येथे एकटाच काय करीत बसला आहे?’ हनुमान म्हणाला, ‘नारद, काय करु? प्रभू रामचंद्राकडे काहीच काम राहिलेले नाही. म्हणून निरुपाय म्हणून येथे आलो आहे.’ नारद म्हणाले, ‘चल फिरायला जाऊ या!’ फिरत फिरत दोघेही द्वारकेजवळ आले. द्वारकानगरी प्रकाशात चमचम करीत होती. हनुमान म्हणाला, ‘नारदा! कोणते गांव आहे? कोण राजा आहे?’ नारद म्हणाले, ही द्वारकानगरी आहे व येथील राजा बलराम आहे.’ हनुमान म्हणाला, ‘काय? बलराम? माझ्या रामापेक्षा मोठो व बलवान? ‘हनुमंताने गर्जना केली, ‘चला, मला या बलरामाचा समाचार घेतलाच पाहिजे या जगात माझ्या रामापेक्षा कोणीहंी बलवान असणेच शक्य नाही!’ मग नारद व हनुमान बलरामाच्या महालाजवळ आले. बलरामाला अहंकारी अवस्थेत पाहून हनुमान म्हणाला, तुमचे बलराम हे नाव टाकुन द्या, नाही तर लढायला तयार व्हा!’ त्यावेळी, हनुमंताचे ते अक्राळ विक्राळ स्वरुप पाहून बलराम घाबरला. त्याने श्रीकृष्णाकडे निरोप पाठविला. श्रीकृष्णाने गरुडाला म्हटले, ‘गरुडा, ज्या त्या वानराला बोलावून आण.’ गरुडाने मनात म्हटले, माझ्यासारखा सामर्थ्यवानाला हे असले क्षुद्र काम? पण नाईलाज होता कारण काम होते प्रभूचे! म्हणून तो गेला व म्हणाला, ‘ए मर्वहृटा! काय ही वटवट लावली आहेस? चल श्रीकृष्ण तुला बोलवित आहेत.’ हे ऐकल्या बरोबर हनुमानाने खाडकन् त्याच्या थोबाडीत दिली आणि त्या आघाताने गरुड कृष्णापुढे येऊन पडला. श्रीकृष्ण म्हणाले, ‘असे! बरे जा आणि सांग की, प्रभुरामचंद्रांनी तुला बोलावले आहे.’ गरुड घाबरला व म्हणाला, ‘प्रभो! दुसछया कोणास तरी पाठवा. मी खरे बोललो तर थोबाडीत बसली, आता खोटे बोललो तर काय अवस्था होईल माझी?’ प्रभुरामचंद्रांचे नाव सांगितल्यावर असले काही घडणार नाही, असा विश्वास कृष्णाने गरुडाला दिल्यावर गरुड पुन्हा हनुमानाकडे जायला निघाला. तो गेल्यावर श्रीकृष्णाने सत्यभामेला बोलावून सांगितले की, हनुमान क्रोधित होऊन इकडे येत आहे तेव्हा मी प्रभुरामचंद्रांचा वेष धारण करतो, तू सीता बनून येथे माझ्याजवळ बैस. सौदर्यांच्या अहंकाराने पुहृगलेली सत्यभामा लगेच नटून थटून तेथे येऊन बसली. हनुमान दरबारात आला व प्रभुरामचंद्रांना पाहून त्याने साष्टांग नमस्कार घातला. पण त्याची नजर सत्यभामेकडे जाताच त्याने विचारले, ‘प्रभो! हे जवळ कोण बसले आहे?’ रामचंद्रांच्या वेशातील श्रीकृष्ण म्हणाले, ‘हनुमंता! काय तू एवढ्यात विसरुन गेलास? अरे ही तुझी सीतामाई नव्हे का? हनुमान म्हणाला, ‘छट्! ही काय सीतामाई आहे? माझी सितामाई किती तरी सुंदर आहे! तिच्या पासंगालाही हे सौदर्य पुरणार नाही!’ हे ऐकताच सत्यभामेचं गर्वहरण झाले. तात्पर्य प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की मला मिळालेली वस्तू, संपत्ती, बुध्दी हे स्वतरूसाठी वापरीनच परंतु ती भगवंताच्या कृपेने मिळाली आहे याचे भान ठेवीन व अहंकार येऊ देणार नाही.