महत्त्वाचे काय? लायकी की कामाविषयीचा आपला दृष्टिकोन ?

Adv.Saurabh Rajput
0

 


महत्त्वाचे काय? लायकी की कामाविषयीचा आपला दृष्टिकोन ?


सध्याचा जमाना स्पर्धेचा आहे. कामाच्या बाबतीत तुम्ही जी कुशलता मिळवली आहे, तेवढी कुशलता किवा  त्याहूनही जास्त कुशलता असणारेही अनेक लोक असतात. स्वतंत्र व्यवसाय करण्याऐवजी एखादी नोकरी पत्करण्याचे तुम्ही ठरविता. त्या नोकरीत आपली कारकीर्द घडविण्याचा तुम्ही विचार करीत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मनुष्यात कितीही क्षमता असो, कितीही लायकी असो, कितीही मनोबळ असो, पुढे जाण्याची कितीही जिद्द असो पण कामाच्या बाबतीत तो मागेच पडेल. ज्याच्याविषयी आपण यापूर्वीही उल्लेख केलेला आहे त्या अँड्र्यू कार्नेगरच्या म्हणण्याप्रमाणे, माणसाच्या सफलतेत त्याची लायकी, क्षमता, हुशारी इत्यादी गोष्टींचा फक्त पंधरा टक्के इतकाच भाग असतो; बाकीचा, पंचाऐंशी टक्के भाग त्याच्या कामाविषयीच्या दृष्टिकोनावर आधारलेला असतो.


एक मनुष्य दर महिना दोनशे रुपये पगार घेतो, दुसरा दरमहा हजार रुपये पगार घेतो, तिसरा महिना तीन हजार, चौथा महिना पाच हजार. या सर्वांमध्ये फरक कुठे असतो? उघडच आहे की, जो मनुष्य सर्वात मोठी जबाबदारी घेण्याची तयारी दाखवितो तो सर्वांत जास्त पगार घेतो. ऑफिसमधला एखादा शिपाई कारकुनाचे काम करतो, तो कारकुनाच्या जागेवर बसतो आणि त्याप्रमाणे कारकुनाचा काम करतो, तो कारकुनाच्या जागेवर बसतो आणि त्याप्रमाणे कारकुनाचा पगार घेतो. जो कारकुन एखाद्या ऑफिसरची जबाबदारी घेण्याची तत्परता दाखवतो तो ऑफिसरच्या जागेकरीता निवडला जातो, आणि त्याला ऑफिसरचा पगार मिळतो. जो ज्या प्रकारचा पगार मिळविण्याची ईर्षा धरतो त्याला त्या पगाराचा अनुरुप अशी स्वत:ची लायकी दाखवावीच लागते. दोन हजार रुपये पगार मिळविण्याची ज्याची लायकी असते त्याला पाचशे रुपये पगाराची नोकरी देऊ करण्याची कोणाला हिंमत होणार नाही. ज्या पगाराचे तुमचे लक्ष्य असेल त्याला अनुरुप अशी जबाबदारी घेण्याची तयारी ठेवा, स्वत:पुढे होऊन ती जबाबदारी स्विकारा म्हणजे मग जगातली कोणतीही शक्ती तुमचा विकास रोखून धरु शकणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)