तुम्ही कोणाला बढती द्याल ?
ज्यांना जीवनात पुढे येण्याची तीव्र आकांक्षा असेल त्यांनी आपल्या कामाविषयी आदराची भावना राखणे जरुर आहे. समजा की, तुमची स्वत:ची एक वंâपनी आहे, तर पुढे दिलेल्या कोणत्या प्रकारच्या कर्मचार्यांना तुम्ही बढतीसाठी लायक ठरवाल ?
१. एक कर्मचारी असा आहे की, त्याचा वरचा अधिकारी थोडा बाहेर गेला की, तो लगेच आराम करतो आणि एखादे मासिक वाचण्यात वेळ घालवतो. दुसरा एक कर्मचारी आपल्या वरच्या अधिकार्यांच्या गैरहजेरीत कित्येक लहान सहान गोष्टी करुन टाकतो, की ज्यामुळे त्या अधिकार्याला दुसर्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देता येते. या दोन कर्माच्यार्यापैकी बढतीसाठी तुम्ही कोणाला पसंत कराल ?
२. एक कर्मचारी म्हणतो, ‘हे काम मला करावे लागते म्हणून ते मी करतो. पण मला त्यात रस नाही.‘ तेच दुसरा कर्मचारी म्हणतो, ‘एखादे नवीन काम आले की, ते करण्यात मला मजा वाटते. आणि ते कठीण असले तरी मला वाटते, हे मी का करु शकणार नाही ?’
३. खादीभंडार किवा तशाच प्रकारच्या एखाद्या दुकानात काम करणार्या एखाद्या सेल्समेनला तुम्ही आपल्या नोकरीत ठेवाल ? त्या सेल्समेनला गिर्हाइक बघितल्यावर वाटते, ‘झाले, आता बसल्या जागेवरुन उठून उभे रहावे लागणार !’ की खाजगी मालकीच्या एखाद्या स्टोअरमधल्या सेल्समेनला तुम्ही नोकरीकरीता पसंत कराल ? कित्येक वेळेला असा सेल्समेन, एखादे गिराहीक दुकानाच्या दुकानाच्या बाहेर उभे राहून दुकानाच्या दिशेने पाहत असते तेव्हा झटदिशी पुढे जाऊन म्हणतो, ‘या साहेब, आत या. तुम्हांला पसंत पडतील अशा पुष्कळ वस्तू आमच्या दुकानात आहेत.‘
४. एक मनुष्य आपल्या हाताखालच्या माणसाला म्हणतो, ‘हरे राम, वरुन एका मागून एक काम येतच आहे. आपल्या कामात ही आणखी भर.‘ पर दुसरा एक अधिकारी म्हणतो, ‘आपल्या खात्यात आधीच भरपूर काम आहे, आणि त्यात हे नवीन काम आले आहे, पण काही हरकत नाही, तेही काम आपण करुन करू त्यातच आपले कौशल्य दिसणार आहे ना!’
५. एक कर्मचारी वरच्या अधिकार्याने त्याच्यावर सोपवलेले काम केल्यानंतर त्याला म्हणतो, ‘घ्या हे काम करुन टाकले आहे, पर असली कामे पुन्हा कधी काढू नका.’ तशाच प्रकारच्या कामाबद्दल दुसरा एक कर्मचारी म्हणतो, ‘हे काम नवीन होते म्हणून सुरुवातीला नीट समजले नाही. पण नंतर काम करण्यात मजा वाटली. त्यामुळे मला हुरुप वाटला की, अशा तर्हेचे कामपण मी करु शकतो. फारशी अडचण पडली नाही.’