विस्मीत करील अशी विश्वाची अवस्था......
जगाच्या रचनेकडे पाहिले तर बुध्दी काम करु शकणार नाही अशी रचना व त्याची व्यवस्ता केलेली दिसते. हे चंद्र, सूर्य, त्यांच्या गती, प्राणी, वनस्पती, पशू, पक्षी, माणसे वगैरेंची उत्पत्ती, सृजन यात काही व्यवस्थितपणार दिसतो की अव्यवस्थितपणा? म्हशीला माणूस झाला, असे कधी होते का? माणसापासून माणूसच व जनावरांपासून जनावरच निर्माण होते. त्यांचे अवयव सुध्दा कसे आहेत ? हाताच्या जागी हात, पायाच्या जागी पाय, डोळ्याच्या जागी डोळे !
आपल्या पुढे जेवण आले की आपण काय करतो ? प्रथम डोळे पाहाण्याचे काम करतात, नंतर हाताने घास घेतो. हाताला सांधे असल्यामुळे ते कोपरात वाकतात त्यामुळे आपण तोंडाकडे घास नेऊ शकतो. समजा हाताला सांधे नसतेच तर काय झाले असते? एका माणसाने दुसछयाला भरवाववे लागले असते. कारण हात तोंडापर्यंत न जाता तो सरळ डोक्याचा वर गेला असता. पण सांध्यांमुळे घास प्रथम नाकाजवळ जातो व त्याचा वास घेतल्यावर कळते की खाण्यास योग्य आहे हे कळले, की मग तोंडात जातो. आंबलेले अन्न असेल लगेच दुर्गंधी येते व आपण घास तोंडात टाकत नाही. खाण्यास योग्य असेल तरच तोंडात टाकतो.
शरीरात संवेदना असते. त्यामुळे एखादा निर्णय आपण लगेच घेऊ शकतो. समजा आपला हात विस्तवावर पडला व संवेदना नसती तर हात जळत जळत पूर्णपणे जळून गेला असता तरी कळाले नसते. इथे व्यवस्था आली. अगणित ठिकाणी रात्रंदिवस अशा प्रकारची व्यवस्था प्रतीतीला येते. आपले हे शरीर व इतर सृष्टीच्या पाठीशी योग्य प्रकारची व्यवस्था आहे. आता ही जर व्यवस्था असेल तर तिच्या पाठीशी कोणीतरी व्यवस्थापक असायला हवा !
शास्त्रीय दृष्टीने जरी विचार केला तरी ही व्यवस्था आहे की अव्यवस्था ? पृथ्वी आपल्या आसाभोवती चोवीस तासात २५ हजार मैल फिरते. प्रत्येक तासात १००० मैल गती झाली. अशा प्रकारे इतक्या वेगाने फिरत राहिलेली पृथ्वी अधिक विंहृवा थोडी कमी गतीने फिरली तर? त्या पृथ्वीवर एकही हिरवे पान दिसणार नाही. एका विशिष्ट कोनात पृथ्वी राहिलेली आहे. त्यामुळे सजीवाचे अस्तित्व आहे. अन्यथा इथे काही उगवणारच नाही. सूर्याचे जितके तापमान आहे ते जर अर्धे झाले तर आपण गोठून जाऊ व दुप्पट झाले तर आपण जळून जाऊ. म्हणून आवश्यक तेवढेच तापमान कोणी ठरविले? ह्या गोष्टी काय सांगतात, व्यवस्था की अव्यवस्था ?
या सृष्टीत असे अनंत गोल उभे आहेत. त्या खगोलांचा विचार केला तर मस्तक चक्रावून जाईल. एका चंद्रावर विजय मिळवला म्हणजे फार मोठा पराक्रम केला यात शंका नाही. ती एक अभिमानाची गोष्ट आहे. पण असे अनंत ग्रह तारे या विश्वात आहेत हे समजले तर आपल्या विजयाची मर्यादाही लक्षात येईल.
ह्या पृथ्वीपासून अडीच लाख मैल अंतरावर एक दुसरा सूर्य आहे व त्या सूर्यावरही अशा प्रकारचीच एक सूर्यमाला आहे. अशा अनेक सूर्यमाला आहेत. चंद्रावर जाऊन पोहचणे ही मानवाची समान्य उडी नाही. परंतु मानवाने फार मोठी उडी मारलेली आहे असे मानून, विश्वंभर नाहीच अशा भूमिकेप्रत आपण येणे आपल्या उथळपणाचे लक्षण आहे.
विज्ञान सांगते की, चंद्र पृथ्वीपासून २,४०,००० मैल दूर आहे. तो चंद्र जरा जरा जवळ म्हणजे दोन लाख मैल अंतरावर असता तर समुद्रात एवढ्या लाटा उसळल्या असत्या की त्या लाटांनी पृथ्वी बुडून गेली असती व मग मरीन ड्राईव्हवर मुंबईच्या समुद्र किनाछयावर एकही बंगला राहिला नसता. एवढेच नव्हे तर त्यात हिमालयही बुडून गेला असता. चंद्र इतका दूर ठेवलेला आहे तो अगदी योग्यच ठेवलेला आहे. त्यामुळे उत्पन्न होणाछया लाटा सहन करता येतात व भरती ओहटीचा आनंद लुटता येतो. आज समुद्र किनाछयावर राहण्याची इच्छा होते. दर्या किनाछयावर राहणाछया लोकांना आपण भाग्यवान म्हणतो.
हे सर्व कळल्यानंतर आपल्याला ह्या जगाचा व्यवस्थापक ईश्वर मानावा लागेल. आपल्या शरीराचा विचार करतांना असा विचार येतो की, रक्त, मज्जा, मांस, हाडे या सर्वांच्या निर्मितीमागे काही व्यवस्था आहे की नाही? व्यवस्था आहे असे वाटत असेल तर व्यवस्थापक हवा, त्याशिवाय सुटका नाही म्हणून ईश्वर सिध्द होतोच.
सामान्य शेतकरीही हा विचार करु शकतो. एक शिकलेला माणूस एका शेतकछयाकडे जातो तेव्हा तो शेतकरी एका झाडाची पूजा करुन त्याला पाण्याचा अभिषेक करीत असतो. शिकलेल्याला वाटते हा काय बावळटपणा? झाडात कसला आला देव? तो शेतकछयाला विचारतो, ‘तुम्ही कशाला ही पूजा करता? ही अंधश्रध्दा आहे.’ शेतकरी सांगतो, ‘मी तर काही जास्त शिकलेलो नाही परंतु आपल्याला एक प्रश्न विचारु का? तुम्ही कुठे राहता?’ ‘शहरात.’ ‘शहरात कुठे तळ मजल्यावर की वरच्या मजल्यावर?’ ‘पाचव्या मजल्यावर.’ ‘मग पाचव्या मजल्यावर पाणी कसे पोहचते?’ ‘मोटर लावून.’ ‘मग मला सांगा, ह्या झाडात अशी कोणती मोटर आहे की मुळाचे पाणी शेंड्यापर्यंत जाते व पाने सतत हिरवी राहतात ?’ तेव्हा शिकलेला म्हणाला, ‘हे सर्व केशाकर्षणामुळे होत असते.’ शेतकरी म्हणला, ‘हे मला समजत नाही, मला एवढेच समजते की हे केशवाकर्षणामुळे होते व त्यामुळेच मी याची पूजा करतो.’