‘पण माझ्या वयाकडे तरी पहा! या वयात मी काही करु शकेन असे मला वाटत नाही‘

Adv.Saurabh Rajput
0



‘पण माझ्या वयाकडे तरी पहा!

या वयात मी  काही करु शकेन असे मला वाटत नाही‘


एक विद्यार्थी एम.ए. पास होऊन कॉलेजातून बाहेर पडला. तीन चार जणांनी त्याला सल्ला दिला की, त्याने पी.एच.डी. करीता प्रबंध लिहावा. पी.एच.डी. ची पदवी मिळविण्याकरीता एखादा विषय निवडून त्यावर नविन संशोधन करुन प्रबंध तयार करायचा असतो. हे काम विद्यार्थी आपल्या फावल्या वेळातही करु शकतो. तेव्हा या विद्याथ्र्याने आपला दुसरा व्यवसाय सांभाळून पी.एच.डी. करीता प्रबंध तयार करण्याचे ठरविले.

पण झाले असे की, प्रबंधाकरीता कॉलेजमध्ये एक दोन वर्षे तो फॉर्म भरु शकला नाही. त्या बाबतीत त्याला उत्कट इच्छा नव्हती, असेही असेल कदाचित. नाहीतर, कॉलेजात जाऊन संबंधित प्रोफेसरांची भेट घेणे, पी.एच.डी. करीता फॉर्म भरणे या गोष्टी करणे अवघड नव्हते. ते आजही तसे नाही.

त्या बाबतीत विचार करता करता तो तीस वर्षांचा झाला. अर्थात, पी.एच.डी. होण्याचा विचार त्याच्या मनातून पार पुसून गेलेला नव्हता. पण त्याचबरोबर त्याला वाटे, ‘कॉलेज सोडल्याबरोबर मी पी.एच.डी. करीता काम केले असते तर बरे झाले असते. आता मी तिसावे वर्ष गाठले. आता त्या गोष्टीला थोडा उशीरच झाला.’

थोड्याच दिवसांनी दुसर्‍या एका मित्राशी त्याची भेट झाली. तो मित्र ही पी.एच.डी. करीता प्रबंध लिहीत होता. त्याचे वय बत्तीस तेहतीस वर्षाचे असेल. ते पाहून आपल्या विद्याथ्र्याला वाटले, ‘या वयातही पी.एच.डी. करीता काम करायला हरकच नाही.‘

पण या विचाराबरोबर ‘पी.एच.डी. चा प्रयत्न करण्याकरीता तीस हे वय तसे जास्तच आहे’ हा विचारही त्याच्या मनात मधून मधून डोकावू लागला. फॉर्म भरायला आज जाऊ, उद्या जाऊ असे करता करता एक एक दिवस निघून गेला. ‘एक दिवस गेला म्हणून काय मोठे बिघडले’ असा विचार करता करता त्याचे वय चौतीस पस्तीस वर्षांचे झाले. त्या दरम्यान त्याच्या मित्राने पी.एच.डी. डिग्री मिळविलीसुध्दा. ते पाहिल्यावर त्याला वाटले, ‘मी नसतो का पी.एच.डी. झालो? त्याच्यापेक्षा मी काही कमी हुशार नव्हतो.

त्याच्या भावना ओळखून त्याच्या दुसर्‍या एका मित्राने त्याला विचारले, ‘‘मग तू पी.एच.डी. चा प्रयत्न का नाही केलास? अजूनही तू ते करु शकतोस.

‘‘हां, तू म्हणतोस ते खरे आहे. पण वयाची पस्तीस वर्षे गेल्यावर ते आता करण्यात काय अर्थ आहे? प्रबंध पुर्ण करायला चार पाच वर्षे लागतीलच. याचा अर्थ थेट चाळीसाव्या वर्षी मला डॉक्टरेट मिळेल. हा फारच उशीर झाला.

तात्पर्य काय की, तीस वर्षाचा असतांना त्याला वाटत होते ‘पंचविसाव्या वर्षीच मी पी.एच.डी. करीता प्रबंध लिहायला सुरुवात करायला हवी होती. आता त्या बाबतीत उशीर झाला आहे.‘ पस्तिसाव्या वर्षी त्याला वाटले, ‘मी तिसाव्या वर्षी तरी सुरुवात करायला पाहिजे होती.‘ पुढे चाळीसाव्या वर्षी त्याला वाटले, ‘पस्तिसाव्या वर्षी जरी सुरुवात केली असती तरी ठीक झाले असते‘ आणि पंचेचाळीसाव्या वर्षी त्याला वाटले, ‘चाळीसाव्या वर्षी जर मी प्रबंध लिहायला घेतला असता तर आज मी नक्कीच पी.एच.डी. झालो असतो.

त्याच्या मित्राने कमी अधिक वयाचा विचार न करता प्रबंध पुर्ण केला आणि तो पी.एच.डी. झाला. पण या महाशयांनी ‘आता खूप उशीर झाला आहे.’ अशी प्रत्येक वेळी स्वत:ची फसवणूक करुन जीवनभर आपण पी.एच.डी. होऊ न शकल्याची विफलताच अनुभवली.

या गोष्टीतून महत्त्वाकांक्षा बाळ महत्त्वाचा बोध घेतला पाहिजे. काही करायचे असेल तर कित्येक जण मनात म्हणतात, ‘त्यांत काही अर्थ नाही. त्या गोष्टीला माझे वय लहान आहे. (किवा माझे वय होऊन गेले आहे.)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)