सिध्दींचा पाया - तुमची मनोवृत्ती

Adv.Saurabh Rajput
0

 


सिध्दींचा पाया - तुमची मनोवृत्ती. 


एका मानसशास्त्राने म्हटले आहे की, कोणतीही सिध्दी पंचाहत्तर टक्के मानसिक स्थितीवर अवलंबून असते आणि पंचवीस टक्के प्रयत्नांवर अवलंबून असते. क्रिकेटच्या खेळात सुरुवातीचे दोन खेळाडू जर चारपाच धावा करुन बाद झाले असतील, तर त्या टीमचा उत्साह ओसरु लागतो. आणि तिसरा खेळाडूही काही धावा न काढता बाद होण्याचा बराचसा संभव असतो. पर अगोदरच्या खेळाडूंच्या देखाव्याचा स्वत:वर काहीही परिणाम होऊ न देता, तिसरा खेळाडू जर आत्मविश्वासाने खेळला तर बाकीच्या आठ खेळाडूंत तो उत्साहाचे वातावरण निर्माण करु शकेल. पहिल्या दोन खेळांडूइतकाच तो निष्णात असला, तरीसुध्दा त्याची मन:शक्ती विशेष काही साध्य करण्याकडे त्याला खेचून नेत असते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे लक्ष निश्चित करुन ते साध्य करण्याकरीता तुमची महत्त्वाकांक्षा जर तुम्ही कामाला लावाल, तर ते गाठण्याकरीता तुम्ही स्वत:ची योग्य मानसिक भूमिका तयार करु शकाल. यशाचा पंचाहत्तर टक्के वाटा या भूमिकेला असतो. आपले लक्ष गाठू शवूâ असे तुम्ही मानलेत की, मग तुमचे मन कां वूâ करणार नाही. ते कसे करायचे याचा रस्ता शोधण्याकडेच त्याची प्रवृत्ती होईल. त्याने दाखविलेला मार्ग जरी कठीण असला तरी तो कसा ओलांडायचा त्याची क्ऌप्ती तुमची महात्त्वाकांक्षा तुम्हाला दाखवील.


महत्त्वाकांक्षा अनेकांना असते, पण थोड्याच काळात ती फलद्रूप होईल किवा  झाली पाहिजे असे ज्यांना वाटते, अशा लोकांच्या वाट्याला बहुधा निष्फळताच येते. कोणतीही वस्तू तिची पुरी किम्मत दिल्याशिवाय हस्तगत करता येत नाही. जितकी उच्च महात्त्वाकांक्षा तुमची असते, तितकीच अधिक किम्मत तुम्हाला द्यावी लागते. प्रयत्नांच्या रुपात ती किम्मत चुकविण्याची जर तुमची तयारी नसेल तर, तुमच्या महत्त्वाकांक्षेचा सुरुवातीचा अर्धा भागही तुमच्या खिशात पडणे कठीण जाईल. तुमच्या पदरात फक्त दुसरा भाग, आकांक्षाच शिल्लक राहील. महत्त्वाकांक्षा म्हणता येणार नाही. महत्त्वाकांक्षा नसणारे लोक मात्र फळाच्या दिशेने इकडे तिकडे दोन चार दगड मारुन फळ पाडता येईल अशी अपेक्षा करतात. अशी अपेक्षा अवास्तव असते. अशा लोकांच्या इच्छेला महत्त्वाकांक्षा म्हणता येणार नाही. महत्त्वाकांक्षा कधीच लेचीपेची नसते. खडकाप्रमाणे ती मजबूत, समुद्रातल्या तुफानाला विंâवा वादळाला दाद न देणारी असते. वादळाच्या माराने गवताची पाती उडून जातात, खडक नाही उडून जात. त्याचप्रमाणे अडचणी आल्या की, इच्छा कुठल्याकुठे अदृश्य होतात. महत्त्वाकांक्षा अशा अडचणींना दाद देत नाही. विचार करा, क्रिकेटचा निष्णात खेळाडू शतक कसे झळकवितो? केवळ थोडे फटके लगावून त्याचे शतक कसे झळकवितो? केवळ थोडे फटके लगावून त्याचे शतक होते का? मुळीच नाही. एखाद्या जोराच्या फटक्यात चेंडू वुंâपणापलीकडे जाऊन आपल्याला चार धावा मिळतील असे जरी फलंदाजाला वाटले, तरी एखादा क्षेत्ररक्षक जोरात धावून तो चेंडू कुंपांनाच्या अलीकडे अडवितो आणि फलंदाजाला एकही धाव मिळत नाही. पण त्यामुळे तो कधी हताश होत नाही. नंतरचा चेंडूही तितक्याच जोमाने फटकाविण्याची तो तयारी ठेवतो. लहान सहान अपयशाकडे दुर्लक्ष करुन आपले उद्दिष्ट साध्य करण्याकडे तो घौडदौड करीत असतो. जगात अजून असा कोणी जन्मलेला नाही, की, ज्याचा प्रत्येक प्रयत्न पूर्णत: सफल झालेला आहे. निष्फळता, नंतर सफलता, पुन्हा निष्फळता, सफलता हा क्रम सदा चालूच असतो. निष्फळतेला तुच्छ मानून एका सफलतेनंतर दुसर्‍या सफलतेवर ली केन्द्रित करणे हे महत्त्वाकांक्षी मनुष्याचे लक्षण असते. एक एक, दोन दोन धावा काढून खेळाडू आपले शतक झलकावितो. मोठ्या यशात लहान सहान यश सामावलेले असते - आणि कमी अधिक निष्फळता पण.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)