अपंगांची जिद्द
चीनमध्ये हाने एकनान नावाचा एक चित्रकार होऊन गेला. नशिबाला दोष देण्याकरिता त्याच्याकडे पुरेसे कारण होते. जन्मत:च त्याला हात पाय नव्हते. पण त्याच्या मनात दुर्दम्य इच्छा होती की, आपण चित्रकार व्हावे. आपल्याला हात पाय नाहीत याबद्दल त्याने कोणत्याही प्रकारची लाचारी मानली नाही. त्याची जी परिस्थिती होती त्यातूनच त्याने मार्ग शोधून काढण्याचे ठरविले. स्वत:च्या इच्छेप्रमाणे चित्रकार होण्याचा मार्गही त्याने शोधून काढला. तोंडात लांब पेन्सिल धरुन चित्र काढण्याचा त्याने प्रयत्न केला. सतत प्रयत्न करुन तोंडात धरलेल्या पेन्सिलीने चित्रे रंगविण्याचीही त्याच्यात ईर्षा उत्पन्न झाली. पण चित्रे रंगवायची कशी? त्याचाही मार्ग त्याने शोधून काढला. स्वत:ची जीभ रंगात बुडवून तिच्या सहाय्याने तो आपली चित्रे रंगवू लागला. अशा तर्हेने नशिबाला दोष देण्याऐवजी स्वत:च्या आवडत्या क्षेत्रात मोठ्या मेहनतीने त्याने प्राविण्य संपादन केले. आणि आपल्या देशात एक महशूर कलाकार म्हणून नाव मिळविले.
याच संदर्भात मला माईट नावाच्या एका मुलाची गोष्ट आठवते. जन्मापासून त्याची वाढ खुंटलेली होती आणि तो अगदी ठेंगणा-खुजा झाला होता. पण लहानपणापासून तो, पुढे एक मोठा लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून होता. पण या ठेंगुजीरावांना लष्करात नोकरी कोण देणार? लष्करात नोकरी मिळविण्याकरीता उमेदवाराची विशिष्ट उंची असावी लागते. तया ठिकाणी पासष्ट सेन्टिमीटर उंचीच्या माईटचा विचार कोण करणार? शेवटी खूप प्रयत्न केल्यावर लष्करात जवानांचे सामान उचलण्याची नोकरी त्याला मिळाली. लष्करात नोकरी मिळाल्याने आपली महत्त्वाकांक्षा पुरी होण्याची त्याला आशा वाटू लागली. आपल्या गुणांच्या आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्याने जवानाच्या (लष्करी शिपायाच्या) जागेपर्यंत बढती लढवायला पाहिजेत या विषयीची चर्चा वरच्या अधिकार्यांशी करण्याची प्रत्येक संधी ती घेत राहिला. असे करताकरता आपल्या हुशारीच्या आणि चाणाक्षपणाच्या जोरावर तो मेजरच्या हुद्द्यापर्यंत जाऊन पोहोचला. लहानपणी पाहिलेले स्वप्न त्याने प्रत्यक्षात उतरविले. आपल्या खुजेपणाच्या व्यंगाबद्दल त्याला आपल्या नशिबाला विंâवा ईश्वराला दोष देता आला असता आणि निष्क्रिय जीवन जगण्याकरता त्याला आपल्या खुजेपणाच्या व्यंगाचे निमित्त करता आले असते. पण त्याची महत्त्वाकांक्षा त्याला तसे करु देत नव्हती. ती त्याला सारखी पुढे ढकलत होती. परिणामी त्याचे खुजेपण ही त्याच्या जीवनातील एक क्षुद्र बाब झाली होती.
या उदाहरणांवरुन समजते की, ज्यांच्याकडे नशिबाला दोष देण्याकरीता सबळ कारण असते त्यांच्यापैकी कित्येक लोक नशिबाला आपल्या कतृत्वशक्तीच्या आड येऊ देत नाहीत. या प्रकरणाच्या सुरुवातीला जगू, चंदू, मनोहर आणि तैय्यब या ज्या व्यक्ती आपण पाहिल्या त्या फक्त नशिबाने बलवत्तर होत्या असे काही नाही. तसेच त्यांच्या गोष्टी सांगता सांगता फक्त त्यांच्या दृष्टिकोनातच. जगू, चंदू, गिरीधारी यांनी सफलतेची जाज्वल्य इच्छा धरली होती आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा चंग बांधला होता. पण त्यांची चर्चा करणार्यांनी सफलतेची फक्त इच्छा केली होती. त्यामुळे झाडाच्या पानांच्या पोळ्या होतील आणि तलावाच्या पाण्याचे तूप होईल याची ते वाट पाहात राहिले. पर जगूने विंâवा चंदूने सफलता मिळण्यापूर्वी काय केले होते ते शोधून काढण्याचा त्यांनी जर प्रयत्न केला असता आणि त्यापासून बोध घेतला असता तर ते सुध्दा जगू, चंदूप्रमाणे सफल झाले असते.
अरेबियन नाईट्समधील सिंदबादची गोष्ट ज्यांनी वाचली असेल त्यांनी सफलतेचे रहस्य आणि तात्पर्य बरोबर ओळखले असते. सिंदबादच्या महालासमोर उभा राहून हिंदबाद नावाचा मजूर स्वत:शीच पण मोठ्याने बोलत होता. ‘हा सिंदबाद किती नशीबवान, केवढी संपत्ती त्याच्याकडे आहे!’ त्याचे ते बोलणे सिंदबादने ऐकले. त्याने त्याला बोलावले आणि आपल्या सात सफरींची कथा त्याला सांगितली, वस्तुत: हिंदबाद आणि सिंदबाद यांच्या मूळच्या क्षमतेत किवा परिस्थितीत काही फरक नव्हता. पर सिंदबादने समृध्दीचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्याची महत्त्वाकांक्षा धरली. त्याकरीता त्याने कसून मेहनत घेतली. मनुष्याचे नशीब त्याच्याबाबतीत काही करीत नसते. त्याच्यातला पुरुषार्थच सर्व काही करीत असतो. याचा उत्तम बोधपाठ अरेबियन नाइट्सच्या या कथेतून मिळतो.