हेचि दान देगा देवा
भगवंताने जग निर्माण केले तेव्हाच ते चालविण्याची व्यवस्था पण त्याने कोणालाही वाछयावर सोडले नाही. लहान किडा मंगुीपासून महाकाय प्राण्यांपर्यंत सर्वांची व्यवस्था त्याने करुन ठेवली. कारण, त्याचे सर्व सृष्टीवर सारखेच प्रेम आहे. माणूस मात्र लोभापायी या प्रेमाच्या अनुभवाला पारखा ठरला व फक्त पैशाच्याच मागे लागला व पैसा कमावणे हेच त्याचे ध्येय झाले. त्यामुळे तो नातीगोती, प्रेमसंबंध, मैत्री संबंध हे सुध्दा विसरला व प्रत्येक गोष्ट पैशात मोजू लागला. अर्थातच त्यामुळे त्याच्यातला भाव निघून जात चालला आहे. वास्तविक, मंदिरात जायचे ते भगवंतावरील प्रेमामुळे! पण आज बरेचसे लोक मंदिरात जातांना दिसतात ते एक तर भीतीतून विंहृवा काहीतरी मागणी घेऊन! मी जर मंदिरात नाही गेलो तर मी कमावलेली संपत्ती टिकेल की नाही ही भीती असते विंहृवा जीवनात काही कमी आहे म्हणून काहीतरी स्वार्थाचे मागण्यांसाठी मी भगवंताकडे जातो. आपली दृष्टी केवळ पायाजवळच असते. आपल्याला वाटते, मी आता देवाची भक्ती केली आहे मग मी जे मागेल ते देवाने दिले पाहिजे, मागणी पूर्ण नाही झाली तर लगेच या जगात देव आहे की नाही अशी शंकाही उपस्थित करतो! भगवंताला सगळ्यांचेच बघायचे असते. आपल्या मागणीत दुसछयाचा तोटा होऊ शकतो. म्हणूनच भगवंत आपली मागणी मान्य करतोच अस नाही. एका गावात एक माणूस होता. त्याला दोन मुली होत्या. त्याने दोन्ही मुलींचे लग्न केले. एक वुंहृभाराला दिली व एक शेतकछयाला दिली. एके दिवशी शेतकछयाची मुलगी देवाला प्रार्थना करु लागली. देवा गेल्यावर्षी खूपच कमी पाऊस पडला. पिण्याला सुध्दा पाणी मिळेनासे झाले आहे. जनावरांचे खूप हाल होत आहेत म्हणून लवकर पाऊस पाड! त्याच वेळेस वुंहृभाराकडे दिलेली तिची सख्खी बहीण पण देवाला प्रार्थना करीत असते, देवा या वर्षीची ही आमची सर्वात मोठी भट्टी आहे. लगेच जर पाऊस आला तर सर्व भट्टी वाया जाईल व आमचा मोठा तोटा होईल. म्हणून अजून आठ दिवस तरी पाऊस पाडू नकोस! अशा परिस्थितीत देवाने ऐकायचे कुणाचे? देवाला तर सर्वच सारखे आहेत. एकाची मागणी पूर्ण केली तर दुसछयाचे नुकसान होते. एका डॉक्टरच्या पत्नीला हिछयाची कुडी करण्याची इच्छा होते व त्याप्रमाणे ती मंदिरात जाऊन भगवंताला प्रार्थना करते की मला हिछयाची कुडी लवकर मिळू दे. आता डॉक्टर पत्नीची इच्छा पूर्ण करायची असेल तर भगवंताला कितीतरी लोकांना आजारी पाडावे लागेल. तरच डॉक्टराचा धंदा होईल व मगच पत्नीला हिछयाची कुडी बनवता येईल! माझ्या मागणीत दुसछयाचा तोटा आहे हे आपण विसरतो. एका माणसाने सावकाराकडून कर्ज घेतले. एका वर्षात परत पेहृडीन असे आश्वासन दिले व स्मशान भूमीत लाकडाचे दुकान टाकले. वर्ष झाले तरी पैसे देईना तेव्हा सावकार त्याच्याकडे गेला व पैशाची विचारणा केली तेव्हा त्याने सांगतिले की माझी तुमचे पैसे परत करण्याची खूप इच्छा आहे परंतू काय करु! या वर्षी धंदाच चांगला झाला नाही! आता याचा धंदा व्हायचा म्हणजे भगवंताला किती लोकांना मारावे लागेल? कारण लोकांना मारले तरच याचा धंदा होईल व कर्ज पेहृडू शकेल! थोडक्यात आपल्या मागणीत स्वार्थ असतो. त्यामुळे आपली प्रत्येक मागणी भगवंत पूर्ण करीलच असे नाही. तो सर्व जगाचा विचार करतो.
एका कवितेत कवीने लिहीले आहे. बेडूक भगवंताकडे प्रार्थना करतो व चिखलाचा पाऊस पाडावयास सांगतो. त्यावेळेस हंस देवाला प्रार्थना करतो व मोत्याचा पाऊस पाडावयास सांगतो. देव दोघांचे ऐकत नाही व पाण्याचा पाऊस पाडतो. त्यामुळे बेडकाला चिखल मिळतो व हंसाला मोती! म्हणून भगवंताकडे काय मागायचे याचे सुध्दा ज्ञान असायला हवे. संतांना ते ज्ञान होते. तुकाराम महाराजांना त्यांनी मागितले ते भगवंताने दिले असते. परंतु त्यांनी भगवंताकडे गाडी, बंगला, पत्नी, मुले, संपत्ती इत्यादी गोष्टी मागितल्या नाहीत त्यांना माहीत होते की या सर्व क्षणिक आहेत! त्यांनी म्हणूनच देवाकडे, ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ हे माग मागितले. कितीही संकटे आणि कितीही आनंदाचे प्रसंग आले, जीवनात कितीही चढ उतार आले भगवंता, तुझा विसर पडू देऊ नकोस. तुला योग्य वाटेल तेच कर. आमच्या कामना पूर्ण झाल्या नाहीत तरीही आमचे तुझ्यावरील प्रेम घटणार नाही. याला ‘कामना रहितम्’ प्रेम म्हणतात. कुठलीही आकांशा नाही, स्वार्थ नाही, तरीही प्रेम करतो. नुसतेच प्रेम करीत नाही तर प्रतिक्षण वर्धनाम्.... प्रत्येक क्षणाला वाढणारे प्रेम करतो. या प्रेमामुळेच संत ‘ठेविले अनंती तैसेची राहावे’ असे जीवन जगले. त्यांच्याही जीवनात संकटे आली, सुख आले परंतु ते विचलीत झाले नाहीत. आपण मात्र थोडासा जरी झटका बसला की विचलीत होऊन जातो व देवा तू आहेस कुठे, अशी विचारणा करतो. मी तुझी एवढी भक्ती करतो पण मलाच त्रास का? मला दुरूख का? असे प्रश्न आपण भगवंताला विचारतो. तुकाराम महाराजांची पत्नी अतीशय खट्याळ होती. संधी मिळेल तेव्हा त्यांच्याशी भांडण करण्याची संधी सोडत नसे परंतु तुकाराम महाराज कधीही विचलीत झाले नाही. उलट त्यांनी भगवंताला सांगितले, ‘देवा ! तुजे माझ्यावर किती प्रेम ! तू मला अशी पत्नी दिलीस की जिच्यामुळे मला तुझी आठवण काढण्याची रोज संधी मिळते! जर दुसरी एखादी पत्नी असती तर तिच्यातच आसक्त होऊन प्रपंचात गढुन गेलो असतो व तुझी आठवण सुद्धा काढू शकलो नसतो !’ एकनाथ महाराजांची पत्नी मात्र अतिशय सोज्वळ, सुस्वभावी व त्यांना प्रत्येक कृतीत आनंदाने मदत करणारी होती. त्यांनी सुद्धा देवाला धन्यवादच दिले व सांगितले, ‘देवा! तुझे माझ्यावर कितीरे प्रेम! मला कामाचा ताण पडू नये म्हणून सुंदर पत्नी दिलीस, की जी सदोदीत माझ्या बरोबर असते व माझ्या प्रत्येक कामात सहभागी होते. म्हणूनच मी तुझे काम उत्साहाने करू शकतो. याउलट नरसिंह मेहताची पत्नी काही दिवसातच वारली. तेव्हा त्यांनीही भगवंताला धन्यवादच दिले व सांगितले, ‘देवा, तू माझ्यामागे काही बंधन ठेवण्याचा त्रागा करत नाहीत विंहृवा नाराजीही व्यक्त करीत नाही ! आपण देवाला म्हणूनच सांगितले पाहिजे, की देवा मला काय मागावे हे कळतच नाही व मी मागितलेले मला योग्य रस्त्याला नेईल की नाही हेही माहीत नाही. त्यामुळे त्यामुळे मला काय हवे नको ते तु ठरव व त्याप्रमाणेच सर्व काही पाठव. मी तुझ्यावर फक्त निष्काम, निरपेक्ष प्रेम करीन ! तु मला जे काह दिलेस तेच इतके प्रचंड आहे की मी अजून काय मागू !
म्हणूनच, आमचे मागणे हेच, ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा !’