जीवन हे जीवन असते; मृत्यू हा मृत्यू असतो !

Adv.Saurabh Rajput
0




 जीवन हे जीवन असते; मृत्यू हा मृत्यू असतो !


जीवनात तुम्ही सफल कसे व्हाल ? या विषयावर एक वक्त्याणे दोन तास भाषण केले. भाषण संपल्यावर एक तरुण त्या वक्त्याजवळ गेला आणि म्हणाला ‘‘तुम्ही जे बोललात ते सर्व मी लक्ष देऊन ऐकले पण तुम्ही सांगितलेल्या क्लूप्त्या माझ्या उपयोगी पडण्यासारख्या नाहीत.’’


ते ऐकल्यावर व्याख्यात्याने त्याला विचारले, ‘‘का?’’


‘‘वरचेवर माझ्या छातीत दुखते. त्यामुळे माझ्या मनात त-हेत-हेचे विचार येतात. त्या विचारांमुळे काही नविन करायला मी कचरतो. या बाबतीत तुमचा सल्ला काय आहे?’’


‘‘तो तुमचा नुसता अंदाज झाला. तुम्हाला माहीत आहे का अनेक वेळा आपले अंदाज चुकीचे असण्याचा संभव असतो. तुम्ही एक काम करा. शहरात जो तुम्हाला सर्वात निष्णात हृदयरोगतज्ञ वाटतो त्याचा सल्ला घ्या. ज्या डॉक्टरच्या रोगनिदानावर तुमचा विश्वास असेल त्यालाच जाऊन भेटा. त्याने जर तुम्हाला सांगितले की, हा तुमचा निव्वळ संशय आहे तर तुमच्या हृदयात काहीतरी बिघाड झाला आहे ही तुमची समजूत तुमच्या डोक्यातून कायमची काढून टाका. आणि तसे नसेल व तुमच्या हृदयात कुठेतरी बिघाड झाला असेल तर त्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उपचार करा. पण त्या गोष्टीबद्दल चिंता करायचे सोडून द्या. ‘मला बरे वाटत नाही’ अशीच जर तुम्ही स्वत:ची समजूत करुन घ्याल तर तुमच्यात कसलाही रोग नसतांना सुध्दा सदा आजारी असल्यासारखे रहाल.’’


त्या तरुणाच्या चेहर्‍यावर थोडासा तजेला पाहून थोडा वेळ थांबल्यावर तो व्याख्याता पुढे त्याला म्हणाला, ‘‘हे पहा, जीवन असते आणि मृत्यू हा मृत्यू असतो. त्यांच्यात सरभेसळ करता कामा नये. त्या दोन्ही गोष्टी निरनिराळ्या आहेत. तुम्ही जगत असता तेव्हा सतत जगण्यासंबंधीचाच विचार करीत रहा. जगण्यामरण्याचा एकाच वेळी विचार कराल तर तुम्ही अर्धवट जगाल. जीवनात जितके क्षण तुम्ही मरणाचा विचार कराल तितके क्षण जीवनातून बाद करुन तुम्ही ते मृत्यूच्या स्वाधीन कराल. जीवनात अशा तर्‍हेचा काट घडवून आणण्याची खरोखरी काही आवश्यकता आहे का ?’’


त्या वक्त्याने दिलेला सल्ला सर्वांनाच सारखा लागू पडतो. तुम्ही जर स्वत:च्या तब्येतीचेच रडगाणे गात रहाल तर लोकांचा आदर गमावून बसाल. तब्येतीची काळजी करणारा सतत तिलाच आपल्या बोलण्याचा विषय बनवतो. सुरुवातीला ऐकणारा कदाचित थोडा सहनुभुती दाखवील. ती एकूण बोलणारा आपल्या तब्येतीच्या विषयाची आणखी लांबट लावील. त्यामुळे ऐकणारा वंâटाळून जाईल. असे करुन तब्येतीची सतत काळजी करणारा लोकांचा आदर गमावून बसेल. लोक त्याला टाळण्याचा प्रयत्न करतील. शेवटी त्याला स्वत:चीच दया करण्याची पाळी येईल....... असा मनुष्य जीवनात काही करु शकेल असे तुम्हाला वाटते का ?.......

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)