विचारांचे एक निराळेच बळ

Adv.Saurabh Rajput
0




विचारांचे एक निराळेच बळ


तर मग सफलतेचे रहस्य काय? त्याचा उगम मुनष्याच्या विचारात होत असतो. जो मनुष्य सतत सफलतेचाच विचार करतो त्याच्या वाट्याला सफलता येते. ज्यांना निष्फलतेची सतत भीती वाटते त्यांचा पिच्छा निष्फलता कधीच सोडत नाही. कोणी विचारतील, ‘तुम्ही म्हणता सफलता हा मनुष्याच्या विचारसरणीचा शुभ परिणाम आहे. या संबंधात अधिक स्पष्टीकरण कराल का?’ आपल्या शरीराची जर विंâमत काढली तर ती किती होते ते तुम्हांला माहीत आहे का? शरीरात जवळ जवळ सत्तर टक्के पाणी असते. पाणी आपल्याला पुâकट मिळते म्हणून त्याची विंâमत धरत नाही. त्या खेरीज काही रासायनिक द्रव्ये आपल्या शरीरात असतात. त्यांत फॉस्फरस असतो, पण तो अगापेटीतील काडीच्या टोकावर राहील इतकाच. त्याचप्रमाणे वॅâल्शियम, लोखंड, वगैरे पदार्थ शरीरात असतात. त्या सर्वांची जर विंâमत काढली तर आजच्या बाजारभावाप्रमाणेही बारापंधरा रुपयांच्यावर ती होणार नाही. यावरुन लक्षात येईल की, शरीरात जी द्रव्ये असतात त्यांची विंâमत अगदी अत्यल्प असते. खरी विंâमत असते ती शरीरात असलेल्या जीवाला आणि बुध्दीत निर्माण झालेल्या विचारांना. तुम्ही बसला आहात त्या खोलीच्या आसपास थोडी नजर टाका. खोलीत जी खुर्ची आहे ती सुताराच्या डोक्यातील विचारातून निर्माण झालेली आहे. दरवाजाला जो पडदा आहे त्यावरचे डिझाईन कोणातरी आर्टिस्टच्या डोक्यामधून उद्भवले आहे. थोडक्यात म्हणजे कोणतीही गोष्ट घडविण्यास कोणत्या व्यक्तीच्या डोक्यात आलेले विचार कारणीभूत असतात. तुम्ही जो रेडिओ पाहता, पंखा पाहता, टेलीव्हिजन पाहता, या सर्व गोष्टी आल्या कोठून? त्या घडविण्याची मूळ कल्पना आली कोठून? या प्रश्नाचे उत्तर आहे, मानवी विचारातून. या सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या माणसाच्या डोक्यातून उद्भवलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)