कृतीला वजन असते
भारताच्या संविधानसमाजात खूप चांगले विचार सांगणारे लोक आपण पाहतो, वेगवेगळ्या ठिकाणी भाषणे, व्याख्याने इत्यादी चालतात तेथेही चांगले विचार ऐकायला मिळतात. ते लोकांना पटतातही ! परंतु त्याचे परिणाम मात्र सामाजिक किवा वैयक्तीक जीवनात तितकेसे दिसत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे सांगणार्यांच्या जीवनात कृती नसते किवा तो जसे बोलतो त्याच्या विरुध्द जीवन जगत असतो. दारु पिऊ नये, विडी सिगारेट पिऊ नये. त्याने वाईट परिणाम होतात. शरीराचे आरोग्य बिघडते इ. आपल्या मुलाला सांगणारा बापच थोड्या वेळाने आपल्या मुलाला दुकानात सिगारेटचे पाकीट आणायला पाठवतो! सहाजिकच मुलगा विचार करतो, वडील सिगरेट पितात ती कशी लागते ते आपणही पिऊन पाहू, यासाठी त्यातूनच त्याला सिगरेटची सवय लागते. संताच्या, महापुरुषांच्या जीवनात उक्तीप्रमाणे कृती असते त्यामुळेच त्यांच्या बोलण्याला वजन असते. एकनाथ महाराजांकडे एक बाई आली व तिने सांगितले, माझा मुलगा खूप गुळ खातो, कितीही सांगितले तरी अजिबात ऐकत नाही. तेव्हा त्याला तुम्ही सांगा, तुम्ही सांगितलेले तो निश्चितच ऐकेल ! महाराजांनी एक महिन्यानंतर त्या मुलाला घेऊन यायला सांगितले. महिना झाल्यानंतर ती बाई परत आली. नाथांनी मुलाला समोर बसविले व सांगितले, ‘आजपासून गुळ खाऊ नकोस.’ बाईने विचारले, ‘फक्त एवढेच जर सांगायचे होत तर एक महिना कशा करता घेतलात ? एकनाथ महाराज उत्तरले, ‘मी एक महिना अगोदर माझ्या स्वतरूच्या जेवणातला गुळ बंद केला. त्यामुळे मला आता गुळ खाऊ नकोस असे सांगता आले. म्हणूनच आता तुमचा मुलगा माझे निश्चित ऐकेल! अशा तछहेने महापुरुषांच्या जीवनात कृती असते. आपल्या जीवनात कृती नसल्यामुळे आपण बोललेले कोणी ऐकत नाही. एखादे काम खूप चांगले असते ते आपल्याला पटतेही पण स्वतरू न उचल्यामुळे आपल्या बोलण्याचा प्रभाव पडत नाही.