यशस्वी होण्यासाठी क्षमता वाढवा.
मित्रांनो आज मी तुम्हांला अकबर आणि बिरबल ची एक गोष्ट सांगणार आहे. त्यातून तुम्हांला खुप काही शिकावयास मिळेल.
आपल्या रोजच्या जिवनात, कामात, जॉब मध्ये, व्यापारात आपण जे काही काम करता त्यासाठी सुध्दा ही गोष्ट खूप उपयुक्त आहे.
आपल्याला ब-याच ठिकाणी ब-याच लोकांकडून ऐकावयास मिळते की, मला चांगली नोकरी नाही, व्यापारात यश नाही. तर आपल्याला यशमिळविण्या कामी देखील या गोष्टीतील बोध कामाला येइल. चला तर मग पाहुया अकबर आणि बिरबल ची एक गोष्ट.
एके दिवशी राणी राजाला म्हणते तुम्ही या बिरबला का कामावर ठेवले त्याच्या जागी माझे भावाला कामावर ठेवा. तेव्हा राजा म्हणतो उदया त्याला दरबारात पाठवून दे. दुस-या दिवशी राणी चा भाउ दरबारात येतो. तेव्हा दरबाराच्या बाहेर खुप मोठया मोठयाने आवाज येत असतो. राजा राणीच्या भावाला विचारतो बाहेर कसला आवाज येत आहे ते बघून ये. तेव्हा तो परत येतो व राजाला सांगतो बाहेर खुप सारे लोक आलेले आलेले आहेत. राजा परत विचारतो ते कोण लोक आहेत घ् तेव्हा तो परत बाहेर जावून येतो व राजाला सांगतो बाहेर दुस-या राज्यातील व्यापारी लोक आलेले सामान घेवून आलेले आहेत.
तेव्हाच बाहेरून दरबारात बिरबल येतो तेव्हा दरबारात राजा, राणी, राणीचा भाउ व इतर लोक उपस्थित असतात. राजा बिरबलला विचातो बाहेर कसला आवाज येत आहे घ् तेव्हा बिरबल राजाला उत्तर देतो की, - हुजूर बाहेर गुजरात मधून तादळाचे व्यापारी आलेले आहेत. त्यांच्याजवळ चांगल्या प्रतिचा तांदळ आहे. आपल्या धाण्याच्या कोठारात तांदळाची फारच कमतरता झालेली होती. कमी भावात चांगला तांदळ मिळाला त्यामुळे मी सेनापती यांना आदेश देवून तांदळ घेवून घेतला. तेव्हा राणीला समजते की राजाने बिरबला का म्हणून आपल्या जवळ ठेवलेले आहे.
सदर गोष्टीतून आपल्याला हा बोध मिळतो की, आपण आपल्या मधील क्षमता विकसीत करून आपल्याला जे काही काम, नोकरी / व्यापार वगैरे करावयाचे असेल त्यासाठी आपण पहिले सक्षम झाले पाहीजे. आपल्यामधील क्षमता वाढविल्या पाहीजेत तेव्हा आपल्याला आपल्या मनाप्रमाणे काम / नोकरी मिळते.
आपण सुध्दा आपल्या आयुष्यात बिरबल प्रमाणे चतुर, चाणाक्ष राहुन, डॉक्याचा वापर करून काम केले पाहीजे. त्यामुळे समोरच्याला सुध्दा आपल्या शिवाय चांगला काम करणारा शिवाय चांगला पर्याय राहत नाही.
(आपल्याला जे काही काम नोकरी वागेरे करवायची असेल त्यासाठी प्रथम आपण सक्षम झाले पाहिजेल तसेच आपण जे काही काम करतो ते बिरबल प्रमाणे चांनाक्षपणे डोक्याचा वापर करून केले पाहिजे.)