जे करण्यासारखे आहे ते तरी करुन दाखवा.
इंग्लंडमधील एका चित्रकाराची गोष्ट मला आठवते. काही वर्षांपूर्वी मी ती गोष्ट वाचली होती. मला त्या चित्रकाराचे नांव आठवत नाही. त्याच्या हातापायांत संधिवात झाला होता. कित्येक वेळा त्याला अंथरुणात पडून रहावे लागे. पण चित्रकार होण्याची त्याला मोठी हौस. पण सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे बोटांत ब्रश पकडू शकेल अशी त्याची स्थिती नव्हती. त्यामुळे मुठीत ब्रश पकडून चित्रे काढण्याचा त्याने हळूहळू सराव केला. स्वत:च्या कल्पनेने त्याने पुâलांची सुंदर चित्रे काढली. त्याची कित्येक चित्रे बक्षिसपात्र ठरली होती. केवळ स्वत:च्या मनोबळाने आपल्या शारिरीक उणिवेला त्याने शुल्लक मानले. आपली हकीगत सांगतांना तो म्हणाला, ‘‘अर्थात, माझ्या शारिरीक उणिवेमुळे अनेक गोष्टी मी करु शकत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की, ज्या गोष्टी मी करु शकतो त्या नाकारण्याकरीता मी काहीतरी बहाणा काढावा. तुम्हांला वाटेल की, अमुक अमुक गोष्ट माझ्या हातून होण्यासारखी नाही. पण तुम्हाला करता येण्यासारखे नाही. पण तुम्हाला करता येण्यासारखे असेल ते करी कराल की नाही? तेवढे जरी मनुष्य करील तरी स्वत:ची दया करण्याची त्याच्यावर पाळी येणार नाही.’’
चित्रकाराच्या त्या दृष्टिकोनातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल. बNयाच गोष्टी करणे आपल्या शक्तीबाहेर असेल, पण जे करता येईल ते करण्यात आपल्याला कोण अटकावील? ते करण्याकरीता संधीच्या दिवसाची वाट पाहत आपण बसलो तर आपल्या परिस्थितीत कसली सुधारणा होणार आहे? बहुसंख्य लोक आपल्या प्रगतीच्या आड येऊ शकतील अशा गोष्टी शोधण्यातच आपला वेळ आणि शक्ती खर्च करतात. खरी गोष्ट अशी असते की, आपल्यात जे काही असते त्याच्या सहाय्याने आपण विकासाची सुरुवात केली पाहिजे. अशा गोष्टी मनात हेवा उत्पन्न करण्याशिवाय दुसरे काही करीत नाहीत. अगदी हलाखीच्या दशेतून जीवनाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींचे जीवनचरित्र आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की, ज्यांना मोठमोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले, त्यांनीच जीवनात काहीतरी मोठे साध्य केले आहे. जीवनात त्यांनी सर्वांपेक्षा अधिक संघर्षांना तोंड दिले आहे. संघर्षाशिवाय सिध्दी मिळत नसते. तशी मिळाल्यासारखी वाटली तरी त्याला कोणी सिध्दी मानीत नाहीत. पण संघर्षाला भिऊन ते जर संधीची वाट बघत राहिले असते, तर आज ते कोणाच्या स्मरणात राहिले असते? मिल्टन मिल्टन झाला, हेलन किलर झाली, बिथोवेन झाला, त्याचे कारण काहीतरी चमत्कार होऊन आपले आपोआप काहीतरी चांगले होईल अशी वाट पाहण्याऐवजी, अनेक अडचणी सोसूनही स्वत:ला जे शक्य झाले ते सर्व करण्याचा त्यांनी चंग बांधला. त्यानंतर त्यांना उच्च पदावर चढण्याकरीता कोणत्याही संधीची वाट पाहण्याची गरज पडली नाही.
तर मग, आपल्या नजरेसमोर आपण जे ध्येय ठेवले आहे, त्याच्या दिशेने पहिले पाऊल केव्हा टाकायचे ? त्याकरीता कोणत्यातरी संधीची वाट पाहायची, की त्यासंबंधीच्या कामगिरीला आत्तापासून सुरुवात करायची?
जीवनात सफल झालेल्या एक व्यक्तीला कोणीतरी विचारले, ’‘आपल्यासमोर संधी आलेली आहे हे कसे ओळखायचे?’’ त्या सफल व्यक्तीने उत्तर दिले, ‘पुष्कळ वेळा संधी समोर उभी ठाकल्याचे कळत नाही. पण माझे प्रयत्न अविरत चालूच असतात. ते चालू असतांना जर संधी समोर चालून आली तर आपोआपच ती पकडली जाते. तिला शोधायला मला जावे लागत नाही.’’
संधी मिळावी अशी इच्छा असेल तर सतत प्रयत्न चालूच ठेवा.