आत्मश्रध्दा वाढविण्याची रीत..!

Adv.Saurabh Rajput
0

 



आत्मश्रध्दा वाढविण्याची रीत..!


आत्मश्रध्दा वाढविली पाहिजे हे ठीक, पण ती वाढवायची कशी? त्या बाबतीत प्रथम आपण आपल्या मनाला बरोबर ओळखले पाहिजे. एखाद्या कोठारासारखे आपले मन असते. तुम्ही तुमच्या कोठारात ठेवता तेच पाहिजे तेव्हा तुम्हांला मिळत असते. कोठरात जर तुम्ही गहू साठवून ठेवले असतील तर त्यातून तुम्हांला तांदूळ मिळणार नाहीत. गहूच मिळतील. सोन्याच्या लगडी तुम्ही जर कोठाराकडे साचवायला दिल्या असतील तर पाहिजे तेव्हा तुम्हांला कोठारातून सोन्याच्या लगड्यात मिळतील. त्याच्यात तुम्ही लोखंडाची मोडतोड साठवून ठेवली असेल तर त्याच्यातून तुम्हांला सोने मिळणार नाही. मनरुपी कोठारात जे विचार तुम्ही भरुन ठेवाल त्याप्रमाणेच तुम्हांला प्राप्ती होईल. तसे पाहिले तर मनाच्या कोठारात दररोज आपण काहीना काही विचार साठवून ठेवत असतो. तेच विचार कालांतराने संक्षिप्त रुपात आठवणीचे रुप धारण करतात. जेव्हा एखादी नवीन परिस्थिती आपल्या समोर उभी राहते, तेव्हा मनात साठविलेली आठवण मनाच्या सपाटीवर तरंगत येते. निष्फलतेचेच विचार जर तुम्ही आपल्या मनात ठासून भरले असाल तर नव्या परिस्थितीत सफल होण्याची कसलीही आशा तुम्हाला राखता येणार नाही. तुमचे कठोर तुम्हांला सांगेल, ‘हे सर्व निरर्थक आहे, तुम्हांला आठवते? सुरुवातीला तसे करायला गेलात आणि चारी मुंड्या चीत झालात. दुसNया वेळेलाही तेच झाले. आणि तिसNया वेळेला पण.......’ या प्रमाणे तुमच्या कोठारातील निष्फलतेच्या विचारांच्या भांडारातून असेच विचार प्रगट होणार. पर एखाद्याने निष्फलतेच्या विचारांना तिलांजली देऊन लहान सहान सफलतेच्या विचारांनाही खूप प्राधान्य दिले अणि त्याच विचारांना आपल्या कोठारात त्याने जागा दिली असेल तर कोणत्याही नव्या परिस्थितीत त्याचे मन भूतकाळात जमा केलेले भांडवल बाहेर काढील, आणि म्हणेल, ‘पाहिलेत ? पहिल्या वेळी तसे घडले तेव्हा काय झाले ? भले थोडी अडचण पडली. पण एवंâदर परिणाम चांगला आला आणि दुसर्‍या वेळेला त्यात आणखी सुधारणा होती. तिसर्‍या वेळेला केलेल्या प्रयत्नांत ९५ टक्के यश आले. किती विश्वासाने तो प्रयत्न केला होता तो लक्षात आणा.’

आपल्या मनरुपी कोठाराला समृध्द करण्याकरीता आणि त्याच्यापासून चांगल्यात चांगला लाभ उठविण्याकरीता दोन गोष्टी खास करुन आपल्या लक्षात घेतल्या पाहिजेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)