आयुष्य कसे जगावे ?
आपल्याला हे आयुष्य एकदाच मिळाले आहे ते भरभरून जगा. ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे की हे आयुष्य ही आपल्याला मिळालेली देणगी आहे. त्यामुळे आपला रोजचा दिवस उदासवाणा न घालवता आनंदात कसा घालवता येईल ह्याचा विचार करा. काही ना काही छंद जोपासणे, एखाद्या चांगल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे असे आपण करू शकतो. दिवसातला फावला वेळ वाया न घालवता काहीतरी चांगले काम । करणे केव्हाही चांगले. अनेक वेळा | आपण भविष्यात घडू शकणाऱ्या | अगदी क्षुल्लक गोष्टींचा खूप बाऊ करतो आणि त्याबद्दल खूप विचार करत राहतो. परंतु असे न करता ज्या गोष्टीची आपण चिंता करत बसलो आहोत ती गोष्ट खरंच तितकी । महत्वाची आहे का याचा मनाशी गांभीर्याने विचार करा. ती गोष्ट इतकी चिंता करण्याएवढी महत्वाची नाही हे आपल्या मनाला समजवा आणि चिंता करण्यातून बाहेर पडा. भविष्याच्या चिंतेचा मनातल्या मनात विचार करून कुढत राहू नका. याचा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर निश्चित वाईट परिणाम होणार. मनात कुढण्याऐवजी तुमची चिंता जवळच्या व्यक्तींना बोलून दाखवा. अनेक वेळा कोणी उपाय सांगितले नाहीत तरी नुसत्या बोलण्याने देखील मन हलके होते. चिंता कमी होते. कोणाशी बोलणे काही कारणामुळे शक्य नसेल तर तुमचे चिंतेबद्दलचे विचार एखाद्या डायरीत लिहन काढा. किंवा तुमच्या मोबाईलला एक फ्रंट कॅमेरा असतो, तर स्वतःशीच स्वतःसाठी या विषयी बोलणारा एक व्हिडीओ बनवा. त्यामुळे देखील मनाला दिलासा मिळतो. पुढे सकारात्मक विचार करण्यासाठी प्रेरणा मिळते. तर अशा प्रकारे भविष्याविषयीच्या चिंतेच्या गर्तेत न सापडता विविध उपायांनी तुम्ही स्वतःला त्यातून बाहेर काढू शकता. स्वतःला चिंतेत गर्क होण्यापासून रोखा आणि आनंदी रहा.