परिपक्वता म्हणजे काय ?

Adv.Saurabh Rajput
0


परिपक्वता म्हणजे..ती नाही ज्यावेळी आपण मोठमोठया गोष्टी बोलतो, तर परिपक्वता म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतो… हे बऱ्याच ठिकाणी वाचलं किंवा ऐकलं आहे आपण.. तरपरिपक्वता म्हणजे… सखोल विचार करणं समजून घेणं परिपक्वता म्हणजव समज सारासार विचार करणं तर्कशुद्ध विचार करणं परिपक्वता म्हणजे आयुष्य जगण्याची कला विचार आणि कृतीमध्ये ताळमेळ ( म्हणजे यात दिखावा नसतो, जसे विचार तशी कृती, लोक सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः म्हणजे… असं नसतं) यात व्यक्तीचं स्वतःचे विचार, भावना यांवर नियंत्रण असतं, त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय घेतला, किंवा भावनेच्या भरात काहीतरी बोललं असं नाही होत, परिपक्वता म्हणजे केवळ ज्ञान मिळवणं नाही तर त्या ज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करता येणं, परिपक्वता म्हणजे दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःमध्ये बदल करणं परिपकवता या दोन प्रकारच्या असतात "शारीरिक परिपक्वता"- आपल्या पायांवर स्वतःची चालण्याची क्षमता "मानसिक परिपक्वता"- आपल्या समजदारीने जगाला समजण्याची क्षमता परिपक्वतेला वय नसतं, किंवा ती कधी येते / यायला हवी असे काही नियम नसतात.. बऱ्याचदा आपण असं बघतो की खूप कमी वयातील एखादे मूल परिपकव असेल किंवा एखादा ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा परिपकव असेलच असं नाही… शेवटी परिपक्वता ही आपण आपल्यात विकसित करण्याची गोष्ट आहे, त्यासाठी याची जाणीव हवी की आपल्या विकासासाठी आपण काही करणं अपेक्षित आहे.. आलेल्या अनुभवातून जो शिकतो, जो प्रत्येक परिस्थिती विना पूर्वग्रहित दृष्टिकोनाने हाताळतो, स्वतःची चूक असेल तर तीसुद्धा मान्य करण्याची, ती सुधारण्याची ज्याची क्षमता असते तो परिपक्वतेच्या प्रक्रियेत सक्रिय आहे असे म्हणता येईल.. व्यक्ती जेवढे अनुभव जास्त घेईल, त्यातून शिकेल तेवढी ती व्यक्ती जास्त परिपकव होत जाते, वाढ विकास आणि परिपक्वता या तीन वेगळ्या गोष्टी आहेत वय वाढते पण वाढत्या वया बरोबरच आपल्या मेंदूचा बुद्धीचा विकास व्हावा अशी अपेक्षा असते तसेच आपल्या सर्व अवयवांच्या क्षमतेचा वयाबरोबर विकास व्हावा अशी अपेक्षा असते आणि विकासाची जेव्हा सर्वोच्च पातळी प्रत्येक व्यक्ती गाठते, तेव्हा ही व्यक्ती परिपक्व झाली किंवा प्रगल्भ झाली असे म्हणता येईल. मात्र या परिपक्वतेची पातळी प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असू शकते. एखाद्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासाला आनुवंशिक मर्यादा असू शकतात आणि त्यामुळे याची सर्वोच्च बुद्धिमत्तेची पातळी, त्याच्या दृष्टीने जेव्हा परिपक्वते ला पोहोचते तेव्हा इतरांच्या दृष्टीने मात्र कदाचित तो बौद्धिक दृष्ट्या अपंग किँवा subnormal ही असू शकतो. पण सामान्यतः सर्व (आर्थिक, कौटुंबिक,सामाजिक,भावनिक,सांस्कृतिक) परिस्थितीचे यथा योग्य आणि स्वतःची क्षमता कुवत यांचे वास्तविक भान बाळगत जी व्यक्ति येणाऱ्या समस्यांना यशस्वी पणे हाताळते ती परिपक्व समजायल हरकत नसावी.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)