
| ज्ञान ही शक्ती; पण केव्हा?
इंग्रजीत एक म्हण आहे, 'Knowledge is power.' ज्ञान ही शक्ती आहे. पण ज्ञानाला आपण शक्तीरान केव्हा मानू शकू? जेव्हा आपण तिच्यातून काहीतरी साध्य करू शकू तेव्हा तिचा प्रत्यक्षात विचारपूर्वक उपयोग करू तेव्हा. ते केले नाही तर त्या ज्ञानाला कवडीचीही किंमत नाही. एकदा एका प्रयोगशाळेत पी.एच.डी. डिग्री संपादन केलेल्या कर्मचाऱ्याला विजेच्या दिव्याच्या गोळ्याचे घन सेंटिमीटरमध्ये माप काढायचे होते. अनेक वर्षे त्याने कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले असल्यामुळे त्याच्या ज्ञानात काही कमतरता नव्हती. त्याने फुटपट्टीने विजेच्या दिव्याचे निरनिराळ्या त-हेने माप घेतले. नंतर स्वतःला माहीत असलेल्या फॉर्म्युल्यांनी निरनिराळे गुणाकार त्याने कागदावर केले. पण त्याचे बरोबर माप कसे काढायचे ते त्याच्या लक्षात येईना. तेवढ्यात त्याच्या हाताखालचा एक मदतनीस त्या ठिकाणी आला. साहेब घोटाळ्यात पडले असल्याचे पाहून त्याने विचारले, “साहेब तुम्ही काय करीत आहात?" "मी या दिव्याच्या गोळ्याचे घन माप काढीत आहे. पण ते बरोबर कसे काढायचे ते माझ्या पीट लक्षात येत नाही." । मदतनीस थोडा विचारात पडला. मी या वाक्यात काय शब्द वापरले आहेत? 'थोडा विचारात पडला.' अर्थात स्वतःच्या बुध्दीला त्याने चालना दिली, आणि दोनच मिनिटांत तो म्हणाला. "साहेब एक काम करा."
"काय?" "दिव्याच्या गोळ्याच्या वरचा भाग कापून काढा. नंतर त्यात पाणी भरा. गोळ्याचा भाग पुरेपूर पाण्याने भरल्यावर पाणी मेजरिंग - ग्लासमध्ये ओता. लगेच तुम्हाला पाण्याचे, म्हणजेच गोळ्याचे घन सेंटिमीटरमध्ये माप मिळले.""अरे! हे तर मला सुचलेच नाही! तू अगदी सोप्या उपाय सुचविलास, "पी.एच.डी. साहेब म्हणाले. तात्पर्य हे की, तो साहेब खूप अधिक शिकलेला होता. त्याने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची पदवी मिळविली होती. त्याला खूप ज्ञान होते. त्याला बुध्दी कमी होती अशी कल्पनाही करता येणार नाही. पण त्याच्या कमी शिकलेल्या मदतनीसाने तो प्रश्न सोडविण्याकरीता आपल्या बुध्दीला विचाराच्या ऐरणीवर घातले. आणि प्रश्न कसा सोडविता येईल ते शोधून काढले. अर्थात साहेब कमी बुध्दीमान होता आणि मदतनीस अधिक बुध्दीमान होता. या दोहोंपैकी एकही गोष्ट मला सुचवायची नाही, पण त्या दोघांपैकी एकाने आपल्या विचारशक्तीचा उपयोग करुन त्या प्रश्नावर तोड काढली ही गोष्ट मात्र खरी.
जगातला महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन याला एकदा, 'मैलात किती फूट असतात' या माहितीची गरज पडली, तेव्हा त्याने त्याला भेटायला आलेल्या एका गृहस्थाला विचारले, "मैलाचे फूट किती?" त्या गृहस्थाने उत्तर दिले, "५,२८०. पण तुमच्यासारख्या विद्वानाने मला हे का विचारावे? तुम्हांला खरोखरच माहीत नव्हते?" आईन्स्टाईन म्हणाला, "मला खरोखरच माहीत नव्हते. पण ते मला माहीत असण्याचे कारणच काय? अशा लहानसहान गोष्टी मी माझ्या डोक्यात भरुन ठेवीत नाही. अशा गोष्टींची गरजच लागली तर संदर्भग्रंथ असतातच; त्यात पाहायचे." यात, तो बुध्दीमान वैज्ञानिक आपल्याला एक महत्त्वाचा पाठ शिकवतो. तुमची बुध्दी विचार करण्याकरीता वापरा. त्यात शुल्लक गोष्टी ठासून भरु नका.
प्रकृतीचे रडगाणे गाऊ नका