तुमचे ध्येय सतत डोळ्या समोर ठेवा

Adv.Saurabh Rajput
0


तुमचे ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवा.


जीवनात इच्छित सफलता हस्तगत करायची असेल तर दोन-तीन अति महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे, जीवनात तुम्हाला काय मिळवायचे आहे? अनेक लोकांना काहीना काही साध्य करण्याची क्षमता असते. पण स्वतःला खरोखरी काय मिळवायचे आहे, त्याची त्यांना स्पष्ट कल्पना नसते. फळ पाडण्याकरीता ते दगड मारतात, पण नेम धरून मारण्याचे त्यांना ठाऊक नसते. त्यामुळे दोन चार दगड मारुन 'काही जमत नाही' असे समजून आणि 'आपल्या नशिबातच नाही' असा मनाचा ग्रह करून घेऊन आपल्या प्रयत्नांना ते विराम देतात. आणि जेथे नेम धरुन दगड मारण्याचाच प्रयत्न ते सोडून देतात, तेथे स्वतः झाडावर चढून आपल्याला पाहिजे असलेले फळ काढण्याची प्रवृत्ती त्यांच्यात येणार कोठून ? पण त्यांची महत्त्वाकांक्षा जर निश्चित असेल. आपल्याला निश्चित काय साधायचे आहे त्याची स्पष्ट कल्पना त्यांना असेल, तर त्यांचे पुढचे काम सरळपणे पार पडेल. आपल्याला कोठे जावयाचे आहे ते नक्की ठरविलेले  असेल, तर त्या दिशेने आपल्याला जाता येते. पण बहुतेक वेळा आपल्याला कोठे जायचे आहे हेच कित्येकांना समजत नसते. आपल्या जीवनावर वर्तुळाचा फार प्रभाव असतो. दोनशे अडीचशे फुटांवर तुम्ही कोणाला तरी उभे करा, आणि त्याला सांगा, 'तू उभे राहायचे. त्यानंतर तुम्ही त्याचे डोळे बांधा. त्याला मोकळे सोडा. जर त्या जागेचे आवार मोठे असेल आणि तो जर बराच वेळ चालेल तर काय होईल? बहुतेक करुन एक चक्कर मारुन तो पुन्हा आपल्या मूळच्या जागेजवळ परत येईल. समोरच्या खांबाकडे पोहोचणार नाही. ध्येयविरहीत किंवा लक्षविरहीत मनुष्याचेही तसेच असते. लक्ष्याचा अभावामुळे कुठे जायचे ते त्याला कळत नाही. जणू त्याचे डोळे बंद केल्यासारखे असतात. तो गती घेतो खरा, पण प्रगती करुन शकत नाही. गती घेतल्यानंतरही, तो मूळ ज्या ठिकाणी तो परत येतो, म्हणजेच जेथल्या तिथेच तो राहतो. जीवनात आपल्याला जे साध्य करायचे आहे त्याचे स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर सतत राहिलेच पाहिजे. आणि ते साध्य करण्याकरीता जाज्वल्य महत्त्वाकांक्षा असणे आवश्यक आहे. अर्थात लक्ष्य वेगवेगळे असू शकते. फक्त आर्थिक समृध्दीहीच एक महत्त्वाकांक्षा असते असे नाही. कोणाला उत्तम चित्रकार होण्याची महत्त्वाकांक्षा असते. कोणाला विज्ञानक्षेत्रात नाव कमविऱ्याची किंवा भविष्य उज्ज्वल करण्याची महत्त्वाकांक्षा असते. कोणाला विज्ञानक्षेत्रात नाव कमविण्याची किंवा भविष्य उज्ज्वल करण्याची महत्त्वाकांक्षा असते. कोणाला नमुनेदार वास्तू उभी करण्याची महत्त्वाकांक्षा असते. पर यापैकी काहीही साध्य करण्याकरीता सतत डोळ्यासमोर विशिष्ट हेतू आणि तो पार पाडण्याची इच्छा असेल तरच ते शक्य होते. धनवान होण्याची तुमची महत्त्वाकांक्षा असेल तरीही त्याबद्दल संकोच बाळगण्याचे कारण नाही.'पैसा हातचा मळ आहे', 'पैशाने कोणी सुखी होत नाही' इत्यादी बोधवाक्यांचे काही जण सतत उच्चारण करीत असतात. पण त्यांनाही आपला जीवन-व्यवहार सुरळीत चालण्याकरीता पैसा लागतोच. तुम्हाला लोकोपयोगी व्हायचे असेल तरी त्याकरीता तुमच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त असावा लागतो. बर्मा किंवा सिलोनसारखे देश विकसनशील देशांना मदत करु शकत नाहीत. अमेरिकेसारखे देशच ते कार्य करु शकतात. ज्याच्याकडे जे असते तेच तो देऊ शकतो. मागासलेल्या लोकांना आर्थिक साहाय्य करण्याची जर तुम्हाला इच्छा असेल आणि आर्थिक दृष्ट्या तुम्ही समृध्द असाल तरच ते शक्य होते. ज्याच्याकडे फक्त एकच शर्ट होता, आणि तो रात्री धुवून दुसऱ्या दिवशी घालीत असे, त्या अॅण्ड्र्यू कार्नेगीने मोठा झाल्यावर कोट्यावधी डॉलर्स दान केले. कारण पैशाचा केवळ संग्रह करणे हा सामाजिक गुन्हा आहे, असे तो समजत असे. असंख्य लोकांना तो मदत करु शकला कारण तशी मदत करण्याची त्याची क्षमता होती. कोणीतरी दिवंगत झाल्याचे आपण ऐकतो. त्यावेळी कधीकधी आपण आश्चर्य प्रगट करतो- 'असे? तो हयात असल्याचेही मला माहीत नव्हते. त्याच्या मृत्यूची बातमी कळल्यावर समजले की, तो अजूनपर्यंत हयात होता.' असे का होते? कारण मृत्यू पावलेली व्यक्ती असून नसून सारखीच होती. तिच्या जीवनात काही ध्येय नव्हते.  अर्थात, ते प्राप्त करण्याचा प्रश्नच नव्हता. वेगळे असे तो मनुष्य काहीच नव्हता. त्यामुळे आसपासच्या लोकांना त्याची काहीच माहिती नव्हती. अशा व्यक्तीला भूतकाळ नसतो, वर्तमानकाळ नसतो, मग भविष्यकाळ तरी कोठून असणार? तुम्हाला या व्यक्तीसारखे व्हायचे नाही याची मला खात्री आहे. तसे असते तर हे पुस्तक वाचण्यात तुम्ही आवड दाखविली नसती. ते वाचण्यात तुम्हाला उत्साह वाटला नसता. जीवनात काहीतरी साध्य करावे असे तुम्हाला वाटते, ते, हे पुस्तक वाचण्याच्या तुमच्या इच्छेवरून स्पष्ट होते.

  • जरा जुने

    तुमचे ध्येय सतत डोळ्या समोर ठेवा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)