नशिबाला दोष देण्याचा अधिकार कोणाचा ?

Adv.Saurabh Rajput
0

 


नशिबाला दोष देण्याचा अधिकार कोणाचा ?


खरे म्हटले तर, नशिबाला दोष देण्याचा अधिकार तुम्हांला विंâवा मलाही नाही. हा, बसच्या चाकाखाली पाय सापडून जर एखादा लंगडा झाला असेल, अचानक लागलेल्या आगीमुळे घर बेचिराख होऊन एखादा बेघर झाला असेल, काही व्याधीमुळे एखादा आपली स्मरणशक्ती गमावून बसला असेल. अशा लोकांनी नशिबाला दोष दिला तर ते क्षम्य ठरेल. पण अकल्पित आणि अनपेक्षित आपत्तीखेरीज इतर बाबतींत उठल्या सुटल्या नशिबाला दोष देणे कधीच उचित होणार नाही.


पण कमनशिबाचा फटका बसूनही जे आपल्या नशिबाला दोष देत नाहीत, तेच कित्येक वेळा अलौकिक सिध्दी मिळवीत असतात. जरा विचार करा, हेलन केलरसारखी व्यक्ती जीवनभर आपल्या नशिबाला दोष देत राहिली असती तर? केवळ दीड वर्षाची असतांना एका आजरात ती आपली दृष्टी, श्रवणशक्ती आणि वाचाशक्ती गमावून बसली होती. आपल्या आसपासच्या जगात काय चालले आहे याचे तिला काहीच भान नव्हते. पण वयाच्या नवव्या वर्षी तिला एक शिक्षिका मिळाली आणि तिचे शिक्षण सुरु झाले. आणि या आंधळ्या, बहिNया आणि मुक्या मुलीने काय काय सिध्दी साध्य केल्या ते तुम्हांला तरी माहित आहे का? दृष्टी नसतांनाही असंख्य डोळस माणसांच्या कितीतरी पटीने पुस्तके तिने वाचली आहेत. तिने स्वत: पुस्तके लिहिली आहेत. स्वत:च्या जीवनावर तिने एक चलत्चित्रही बनविले आहे. त्यात तिने स्वत: अभिनय केला आहे. कर्णेंद्रिये निकामी असूनही अनेक लोकांपेक्षा चांगल्या तNहेने तिने संगीताचा आस्वाद घेतला आहे. वाचाशक्ती नसूनही ठिकठिकाणी तिने भाषणे दिली आहेत. ती घोड्यावर रपेट करते आणि होडीही चालवू शकते. स्वत:च्या इंद्रियांना तिने इतके कार्यक्षम केले आहे की, आज जर तुमच्याशी शेकहॅण्ड केला तर पाच वर्षांनंतर तिने पुन्हा शेकहॅण्ड केल्यावर ती तुम्हाला बरोबर ओळखेल. तुम्हांला वाटेल ‘हे कसे शक्य आहे?‘ पण तिचे सर्वच जिवन एखाद्या सिनेमाच्या कथानकापेक्षाही अधिक रसभरित आहे. ते जाणून घ्यायचे असेल तर तिची आत्मकथाच तुम्ही वाचली पाहिजे.

हेल केलरने स्वत:च्या वैगुण्याबद्दल नशिबाला कधी दोष दिला नाही. पण स्वत:मध्ये इतकी गंभीर वैगुण्ये असूनही सर्वसाधारण मनुष्याची जीवन जगण्याचा तिने संकल्प केला. आणि ते पण कोणत्या वयात ? तुम्ही विश्वास ठेवाल? तिचे गुणवर्णन करतांना एका सुप्रसिध्द विनोदी लेखकाने एके ठिकाणी लिहिले आहे - ‘अठराव्या शतकात जन्मलेल्या सर्वात कौतुकास्पद महान व्यक्ती फक्त दोनच आहेत. एक नेपोलियन आणि दुसरी हेलन केलर.’ हेलन केलरविषयी हे जेव्हा लिहिले त्या वेळी ती फक्त पंधरा वर्षांची होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)