एखाद्याची महत्त्वाकांक्षा ओघळून का जाते?

Adv.Saurabh Rajput
0


एखाद्याची महत्त्वाकांक्षा ओघळून का जाते ?


आपल्या जीवनात एक मोठी करुणता असते. शाळेत आपल्याला अनेक वेळा निबंध लिहावे लागतात. त्यांत 'मी मोठा होईन तेव्हा' किंवा 'माझी महत्त्वाकांक्षा' या विषयावरही केव्हातरी निबंध लिहावा लागतो. कित्येक विद्यार्थी पुढे आपण कोणीतरी मोठे होण्याचे स्वप्न पाहात असतात. त्याचा उल्लेख ते आपल्या निबंधात करतात. त्यांच्यापैकी काही जण खरोखरच जीवनाच्या उच्च शिखरावर पोहोचण्याची ईर्षा बाळगतात. त्या बाबतीत ते सदा: ते सदा जागृत असतात आणि तशी निष्ठाही बाळगतात. तरीपण काही काळ लोटल्यावर त्यांची सर्व महत्त्वाकांक्षा उन्हाळ्याच्या दिवसांत बर्फ वितळावा तशी वितळून जाते. असे का होते? मध्यंतरी असे काय घडते, की ज्यामुळे जीवनात शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खऱ्या त्याचे एक कारण असू शकते, अर्थाने जीवनांत सफल झालेल्या व्यक्ती सात टक्केच असतात. पाकीच्या नव्वद पंचाण्णव टक्के व्यक्ती झालेल्या असतात. त्यामुळे आपल्या आसपास बहुमतातल्या निष्फळ झालेल्या असतात. त्यामुळे आपल्या आसपास बहुमतातल्या निष्फळ झालेल्या व्यक्तींचाच घोळका असतो. अशा लोकांनी सफल होण्यासाठी एक तर प्रयत्नच केलेला नसतो किंवा अर्धवट प्रयत्न करुन शेवटी नशिबाला दोष देत एकमार्गी आणि कंटाळवाणे जीवन जगण्याचे त्यांनी ठरविलेले असते. जे लोक आपल्या जीवनात विशेष काही करु शकलेले नसतात ते दुसऱ्यांनाही विशेष काही करता येणार नाही असेच मानत असतात. आपण निष्फळ झालो तसेच दुसरेही निष्फळ होणार अशी त्यांची खात्री असते. यामागे दुसरेही कारण असू शकते. आपण आपले स्वप्न साकार करण्यात अपयशी झालो आहो, तेव्हा दुसऱ्यांना त्यांत यश मिळालेले पाहणे त्यांना सहन होत नाही, कारण काही असो, पण कोणी जर जीवनात उच्च शिखर गाठण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांच्या त्या उत्साहावर विरजण घालणाऱ्यांची संख्या कमी नसते. तुम्हांला काही महत्त्वाकांक्षा असेल आणि ती गाठण्यासाठी जर तुमची उत्कट श्रध्दा असेल तर त्यावर विरजण घालणाऱ्यांना जवळपास थारा देऊ नका. ते लोक तुम्हांला किंवा तुमच्याविषयी दुसऱ्यांना काय सांगतात ते मनावर घेऊ नका. त्यांच्या कारवायांना सहज जरी मान तुकवाल तरी तुमच्या महत्त्वाकांक्षेतला पहिला भाग 'महत्त्व' निघून जाईल आणि शिल्लक राहील फक्त 'आकांक्षा. कालांतराने तीही नाहीशी होईल. टीकेची जगात असे कोणतेही कार्य नसते की, त्यावर विरजण घालून त्यात अडथळा आणणारे कोणी ना कोणी असणार नाहीत. त्या संबंधीच्या अनेक गोष्टी आपल्या कानावर येतात. जे सफल होण्याच्या बाबतीत कृतीनिश्चयी असतात ते कोणाच्या किंवा चेष्टेची पर्वा करीत नाहीत. आपले जे ध्येय ठरविलेले असते त्यालाच ते चिकटून असतात. महत्त्वाकांक्षी लोक जेव्हा सफल होतात, तेव्हा त्यांच्याविषयी अनुदारपणाने बोलणारे बहुतेक लोक आपण पूर्वी काय बोलत होतो ते सोयीस्करपणे विसरून जातात आणि नंतर म्हणतात, त्यांना तर त्यांच्या नशिबाने हात दिला आहे. आपण जो पुरुषार्थ करण्यात मागे पडलो तो पुरुषार्थ दुसऱ्यांनी करून दाखविला याचे ते नावही घेत नाहीत. कशाला घेतील? कारण त्यांच्या वाट्याला जी निष्फळता आलेली असते ती केवळ पुरुषार्थाच्या अभावामुळेच. या निर्भेळ सत्याचा स्विकार करणे त्यांना आवडत नाही. आपण जे करु शकलो नाही ते दुसरी व्यक्ती करु शकली यातले रहस्य काय? त्याला 'नशिबवान' मध्येच घुसडून देणे त्यांना सोपे वाटते. कारण त्यामुळे स्वतःवर झालेला आघात त्यांना हळवा करता येतो. पण जीवनात सफल झालेल्या व्यक्तीला जर तुम्ही आपली महत्त्वाकांक्षा सांगितली तर ती तुमचा कधी अवसानघात करणार नाही. कारण जाणत असते की, ज्या रीतीने ती सफल झालेली असते त्या रीतीने दुसरी कोणतीही व्यक्ती सफल होऊ शकतेच. त्यामुळे तुम्हांला निरुत्साही करण्याऐवजी ती व्यक्ती तुम्हाला बहुमोल सल्लाच देते. प्राचीन काळी गुहावासियांपैकी कोणी चाक शोधून काढले असेल आणि असलेल्या शक्तीविषयींचे आपले विचार दुसऱ्यांना सांगितले असतील. त्या वेळी इतर गुहावासीय त्याला म्हणाले असतील, 'अरे जा. ते शक्यच नाही. तुम्ही किंवा मी कधी गुहावासी नव्हतो आणि त्या जमान्यात जन्मलेले नव्हतो, तेव्हा त्या वेळी काय झाले असेल ते आपण सांगू शकत नाही. तरीपण तसे अनुमान खोटे असेल असे मानण्याचे कारण नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)